5

Hero MotoCorp चा Exchange Carnival सुरु, मोफत वॉशिंग, पॉलिशिंगसह बंपर डिस्काऊंट ऑफर्स

हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) कंपनीने यावर्षी 100 मिलियन (10 कोटी) युनिट्स वाहनांची विक्रमी विक्री पूर्ण केली आहे.

Hero MotoCorp चा Exchange Carnival सुरु, मोफत वॉशिंग, पॉलिशिंगसह बंपर डिस्काऊंट ऑफर्स
Hero MotoCorp
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 5:12 PM

मुंबई : हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) कंपनीने यावर्षी 100 मिलियन (10 कोटी) युनिट्स वाहनांची विक्रमी विक्री पूर्ण केली आहे. या यशाबद्दल कंपनीने विशेष एक्सचेंज आणि सर्विस बेनिफिट्सची घोषणा केली आहे. चार दिवस चालणाऱ्या या एक्सचेंज कार्निव्हलमध्ये (Exchange Carnival) ग्राहक बरेच लाभ घेऊ शकतात. (Hero MotoCorp announces service and exchange carnival, started from 4th march)

कंपनीच्या म्हणण्यानुसार हा एक्सचेंज कार्निव्हल 5 मार्चपासून सुरू झाला आहे, जो 8 मार्चपर्यंत चालणार आहे. यात हिरो मोटोकॉर्प त्यांच्या ग्राहकांना अनेक फायदे देत आहे, ज्याचा लाभ ग्राहक सहजपणे घेऊ शकतात. या ऑफरअंतर्गत ग्राहक केवळ 100 रुपये प्लस जीएसटीवर अनेक पेड सर्व्हिसेसचा लाभ घेऊ शकतात.

त्याशिवाय सर्व ग्राहकांना रोड साईड सहाय्य खरेदीवर (रोड साइड असिस्टन्स पर्चेस) 100 रुपयांची सवलत, जॉयराईड (वार्षिक देखभाल करार) खरेदीवर 100 रुपयांची सवलत आणि सर्व ग्राहकांना मोफत वॉशिंग, पॉलिशिंग आणि नायट्रोजन सुविधांवर सवलत देण्यात येत आहे.

कार्निव्हलच्या शेवटच्या दिवशी जबरदस्त ऑफर मिळणार

भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी वाहन उत्पादक कंपनीने म्हटलं आहे की, या चार दिवसीय सर्व्हिस कार्निव्हलमध्ये कंपनी त्यांच्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या एक्सचेंज ऑफर्स देत ​​आहे. या कार्निव्हलचा शेवटचा दिवस म्हणजेच 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कंपनी त्यांच्या स्कूटर लाइनअपवर विशेष एक्सचेंज आणि पर्चेस ऑफर देणार आहे. या ऑफरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही जवळच्या हिरो डीलरशिपला भेट देऊ शकता.

फेब्रुवारीत हिरोच्या 5.05 ला दुचाकींची विक्री

दुचाकी वाहन निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पने गेल्या महिन्यात 5,05,467 मोटारसायकली आणि स्कूटर्सची विक्री केली. 2020 मध्ये याच कालावधीत कंपनीने विक्री केलेल्या वाहनांपेक्षा यामध्ये 7 हजार युनिट्सची भर पडली आहे. तर जानेवारीत हिरोने 4.67 लाख दुचाकींची विक्री केली होती.

दुचाकींच्यी विक्रीत ‘हिरो’ नंबर वन

भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टू-व्हीलर ब्रॅन्ड्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) हा देशातील सर्वाधिक विक्री होणारा ब्रँड ठरला आहे, तर होंडा (Honda) आणि टीव्हीएस (TVS) अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहेत. हिरो मोटोकॉर्प कंपनी भारतातील दुचाकींच्या बाजारावर वर्चस्व गाजवत आहे. हिरो मोटोकॉर्प कंपनीने जानेवारी 2021 मध्ये 4.67 लाख दुचाकींच्या विक्रीची नोंद केली आहे.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हिरोने केलेल्या विक्रीच्या तुलनेत यंदा 4.2 टक्क्यांनी घट झाली आहे, कंपनीने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 4.88 लाख दुचाकी वाहनांची विक्री केली होती. विक्रीत 4.2 टक्क्यांची घट झाली असली तरीदेखील जानेवारी महिन्यात सर्वाधिक दुचाकी विकणाऱ्या कंपन्यांच्या यादीत हिरो मोटोकॉर्प पहिल्या स्थानावर आहे.

इतर बातम्या

BS6 सह Kawasaki Ninja 300 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Bajaj Platina 110 चं ABS व्हर्जन लाँच, प्रवास अधिक सुरक्षित होणार

‘ही’ इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, किंमत खूपच कमी

(Hero MotoCorp announces service and exchange carnival, started from 4th march)

Non Stop LIVE Update
कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?
कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस