AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 6.8 लाखात घर घेऊन या लॅम्बोर्गिनी! ही इलेक्ट्रिक कार फुल चार्जिंगमध्ये 300 किलोमीटर दामटा

BYD Atto 1 Electric Car: हो अगदी लॅम्बोर्गिनीसारखी दिसणारी ही इलेक्ट्रिक कार सध्या भाव खाऊन जात आहे. ही इलेक्ट्रिक कार फुल चार्जिंगमध्ये 300 किलोमीटर दामटता येते. या कारची अनेक देशात एंट्री होत असल्याने दिग्गज कंपन्या सावध झाल्या आहेत.

अवघ्या 6.8 लाखात घर घेऊन या लॅम्बोर्गिनी! ही इलेक्ट्रिक कार फुल चार्जिंगमध्ये 300 किलोमीटर दामटा
हटके इलेक्ट्रिक कारImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 29, 2026 | 2:42 PM
Share

BYD Atto 1 Electric Car: इलेक्ट्रिक कार तयार करणारी कंपनी BYD ने एक खास कार बाजारात उतरवली आहे. ही कार सर्वात किफायतशीर हॅचबॅक Atto 1 कार असल्याचा दावा करण्यात येत आहे. चीन आणि फिलीपिन्सनंतर आता ही कार दक्षिण-मध्य पूर्व आशियातील बाजारात एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही कार लॅम्बोर्गिनी ऊरससारखी दिसते. तिला काही भागात सीगल असे नाव देण्यात आले आहे. या कारची चीनपासून ते जपानपर्यंत मोठी चर्चा सुरू आहे. ही कंपनी आता इतर देशातील बाजारपेठेत मुसंडी मारण्याची तयारी करत असल्याने दिग्गज कंपन्या सावध झाल्या आहेत.

इंडोनेशियात BYD Atto 1 ही कार दोन व्हेरिएंट्समध्ये सादर झाली. डायनॅमिक आणि प्रिमियम ही दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. प्रिमियम व्हेरिएंट अत्यंत आकर्षक आहे. कंपनीने बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची सोय देण्यात आली आहे. ही कार कमी किंमत आणि आकर्षक फीचर्समुळे कार प्रेमींसाठी एक खास पर्याय ठरली आहे. तर बाजारातील इतर कंपन्यांना तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.

रेंज आणि बॅटरीची कामगिरी

कामगिरी पाहता Atto 1 अत्यंत दमदार आहे. हिच्या स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये 30 kWh ची बॅटरी मिळते. तर ही कार एकदा फुल चार्ज झाल्यावर 300 किमीपर्यंत धावते. तर प्रिमियम व्हेरिएंटमध्ये 38.88 kWh चा बॅटरी पॅक आहे. एकदा फुल चार्ज झाल्यावर ही कार 380 किमी (NEDC) पर्यंत पल्ला गाठते. विशेष म्हणजे ही कार 40 kW च्या DC फास्ट चार्जरच्या मदतीने अगदी कमी कालावधीत चार्ज करता येते. ही कार शहरी ग्राहकांना खुणावत आहे.

कॉम्पॅक्ट डिझाईन

Atto 1 ला BYD ने अत्याधुनिक e-Platform 3.0 तयार केली आहे. या कारची लांबी 3,925 mm इतकी आहे. त्यामुळे अत्यंत निमुळत्या आणि अरूंद गल्ल्यांमध्ये ही कार चालवणे अत्यंत सोपे आहे. या कारचा आकार भारतात विक्री होणाऱ्या टाटा टियागो EV आणि सिट्रोएन eC3 सारखी आहे. त्यामुळे ही एक फॅमिली हॅचबॅक कार मानली जाते. इंडोनेशियातील या कारची सुरुवातीची किंमत भारतीय चलनात 6.8 लाख इतकी आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 8.2 लाखांच्या जवळपास आहे. जर भारतात ही कार दाखल झाली तर अनेक दिग्गज कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Follow Us
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?