AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

900 किमी रेंज आणि फक्त 15 मिनिटांत चार्ज! बाजारात आली दमदार इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त…

एका चार्जमध्ये 900 किमी रेंज, 15 मिनिटांमध्ये चार्ज होणारी सर्वात जबरदस्त इलेक्ट्रिक कार. 9 एअरबॅग्स आणि जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

900 किमी रेंज आणि फक्त 15 मिनिटांत चार्ज! बाजारात आली दमदार इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 21, 2026 | 1:41 PM
Share

Xiaomi SU7 : चिनी तंत्रज्ञान कंपनी Xiaomi ने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार Xiaomi SU7 ला नव्या अवतारात सादर केले आहे. नव्या जनरेशनमधील ही SU7 इलेक्ट्रिक सेडान मोठ्या अपग्रेडसह बाजारात आली असून ती Standard, Pro आणि Max अशा तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

चीनमध्ये या कारची सुरुवातीची किंमत सुमारे 30 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. Pro व्हेरिएंटची किंमत सुमारे 34 लाख रुपये असून Max व्हेरिएंटसाठी सुमारे 41 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बाजारात या कारचा मुकाबला Tesla Model 3 सारख्या कारशी होणार आहे.

आकर्षक डिझाइन आणि प्रीमियम इंटीरियर

नवीन Xiaomi SU7 चे डिझाइन अत्यंत आकर्षक ठेवण्यात आले आहे. फास्टबॅक सेडान स्टाइल, नव्या फ्रंट फेसियामध्ये रिवाइज्ड ग्रिल आणि 4D मिलीमीटर-वेव्ह रडार देण्यात आला आहे, ज्यामुळे एरोडायनामिक्स अधिक सुधारतो. हेडलाइट्स वॉटर-ड्रॉप स्टाइलमध्ये असून टेललाइट्स हेलो डिझाइनमध्ये आहेत. यामध्ये कॉस्टल ब्लू, ब्लेजिंग रेड, विरिडियन ग्रीन, इंडिगा स्टोन ग्रीन, कॅपरी ब्लू आणि क्रिमसन सनसेट रेड असे नवीन रंग पर्याय उपलब्ध आहेत.

इंटीरियर पूर्णपणे रिडिझाइन करण्यात आले असून ते आता लक्झरी C-सेगमेंट सेडानप्रमाणे वाटते. केबिनमध्ये सॉफ्ट-टच प्रीमियम मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. मोठा टचस्क्रीन डिस्प्ले, व्हेंटिलेटेड आणि हीटेड सीट्स, अधिक स्पेस आणि उत्तम कम्फर्ट यामुळे ही कार फॅमिली आणि लक्झरी दोन्हीसाठी योग्य ठरते.

फीचर्स आणि सेफ्टी

या कारमध्ये LiDAR सेंसिंग आणि Xiaomi Hyper Autonomous Driving सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय 360° प्रोटेक्शन, मोठा इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हॉइस कंट्रोल आणि कनेक्टेड कार फीचर्सही उपलब्ध आहेत.

फास्ट चार्जिंगमुळे केवळ 15 मिनिटांत सुमारे 670 किमीपर्यंत रेंज वाढवता येते. सेफ्टीसाठी 2,200 MPa स्टीलने मजबूत केलेली बॉडी, 9 एअरबॅग्स, आर्मर्ड केज स्ट्रक्चर, बॅटरी फायर/एक्सप्लोजन प्रिव्हेन्शन सिस्टम आणि 16 अॅक्टिव्ह सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

रेंजबाबत बोलायचे झाल्यास: Standard व्हेरिएंट – 720 किमी. Pro व्हेरिएंट – 902 किमी. Max व्हेरिएंट – 835 किमी एका चार्जमध्ये जाते. Xiaomi ची Xiaomi SU7 ही नवीन इलेक्ट्रिक कार दमदार रेंज, आधुनिक फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात मोठी स्पर्धा निर्माण करू शकते.

Follow Us
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून...
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे