भारतीय मार्केटवर अधिराज्य गाजवणारी Maruti Suzuki Swift क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?

भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत आहेत.

भारतीय मार्केटवर अधिराज्य गाजवणारी Maruti Suzuki Swift क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?
Maruti Suzuki Swift
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 7:30 PM

मुंबई : भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात. Maruti Suzuki Swift ही कार त्याचंच एक उदाहरण आहे, असं म्हणता येईल. (Crash Test : best selling car Maruti Suzuki Swift is completely failed in Global NCAP safety Rating)

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझीकसाठी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) ही कार आतापर्यंतची सर्वात मोठी पॉवर प्लेयर ठरली आहे. कंपनीने आतापर्यंत या कारच्या 24 लाखांहून अधिक मॉडेल्सची विक्री केली आहे. ही कार गेल्या काही वर्षांपासून भारतातील बेस सेलिंग कार ठरत आहे. तसेच 2020 मध्येदेखील या कारने भारतीय मार्केटमध्ये दमदार प्रदर्शन केलं आहे. परंतु भारतीयांच्या पसंतीस उतरलेली ही कार सेफ्टीच्या (सुरक्षिततेच्या) बाबतीत खूपच मागे पडली आहे.

स्विफ्ट 2020 मध्ये भारतात सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. 2020 मध्ये या कारच्या 1,60,700 युनिट्सची विक्री झाली आहे. भारतीय बाजारात स्विफ्टची स्थिती दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. तर दुसऱ्या बाजूला ही कार सुरक्षिततेच्या बाबतीत खूपच कमजोर ठरली आहे. तरीदेखील या कारची मागणी मोठी आहे. या कारला सुरक्षिततेच्या बाबतीत खूपच कमी रेटिंग मिळालं आहे.

Global NCAP रेटिंगमध्ये केवळ 2 स्टार

ग्लोबल एसीएपी (Global NCAP) रेटिंगमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट या कारला केवळ 2 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच ही कार जास्त वजन उचलण्यात सक्षम नसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या कारची सुरुवातीची किंमत (एक्स शोरुम) 5.19 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारमध्ये बीएस-6 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 83 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन 5-स्पीड मॅनुअल आणि 5-स्पीड AMT गियरबॉक्सच्या पर्यायासह सादर करण्यात आलं आहे.

Maruti Suzuki Swift चं फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हॅचबॅक कार 2021 Maruti Swift चं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे. नवीन मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये नवीन फ्रंट फॅसिआसह (front fascia) सदर करण्यात आली आहे. कारमध्ये स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले देण्यात आला आहे. मारुती सुझुकीने नवीन स्विफ्ट फेसलिफ्टसह क्रूझ कंट्रोल देखील सादर केला आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5,73,000 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे.

Maruti Suzuki Swift या हॅचबॅक कारला आता फेसलिफ्ट लुक देण्यात आला आहे. मारुती सुझुकी स्विफ्टचा (Maruti Suzuki Swift) मिडलाईफ मेकओव्हर करण्यात आला आहे. या नव्या लुकसह स्विफ्ट लवकरच मारुतीच्या विविध शोरुम्समध्ये पाहायला मिळेल. फेसलिफ्टेड स्विफ्टने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर जपान आणि युरोपसारख्या निवडक बाजारात या कारची विक्री सुरु झाली आहे. आता भारतातही या कारची विक्री सुरु करण्यात आली आहे.

इतर बातम्या

ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये Renault Triber पास की नापास?

5 लाखांहून कमी किंमतीत दमदार फीचर्स, Hyundai ची छोटी SUV बाजारात धुमाकूळ घालणार?

कोरोना काळातही Mahindra च्या ‘या’ कारची घोडदौड सुरुच, बुकिंग्सचे रेकॉर्ड मोडीत

(Crash Test : best selling car Maruti Suzuki Swift is completely failed in Global NCAP safety Rating)

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.