Hyundai Grand i10 Nios क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?

भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत आहेत.

Hyundai Grand i10 Nios क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?
Hyundai Grand i10 Nios
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 10:40 PM

मुंबई : भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात. Hyundai Grand i10 Nios ही कार त्याचंच एक उदाहरण आहे, असं म्हणता येईल. (Crash Test : Hyundai Grand i10 Nios is completely failed in Global NCAP safety Rating)

देशातील आघाडीची कार निर्माती कंपनी ह्युंदायसाठी Grand i10 Nios ही कार पॉवर प्लेयर ठरली आहे. कंपनीने आतापर्यंत या कारच्या हजारो युनिट्सची विक्री केली आहे. 2020 मध्ये या कारने भारतीय मार्केटमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे. परंतु भारतीयांच्या पसंतीस उतरलेली ही कार सेफ्टीच्या (सुरक्षिततेच्या) बाबतीत खूपच मागे पडली आहे.

ग्रँड i10 Nios ला फ्रंट सुरक्षेच्या बाबतीत खूपच खराब रेटिंग मिळालं आहे. तसेच चाईल्ड प्रोटेक्शनच्या बाबतीतही ही कार खूप मागे पडली आहे. या कारच्या क्रॅश टेस्टदरम्यान या कारचं स्पीड 64 किमी प्रति/तास इतकं ठेवण्यात आलं होतं. परंतु ही कार सुरक्षेच्या बाबतीत खूप मागे असल्याचे क्रॅश टेस्ट अहवालावरुन स्पष्ट होतंय. Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 2 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.

Global NCAP रेटिंगमध्ये Maruti Suzuki Swift ला 2 स्टार

ग्लोबल एसीएपी (Global NCAP) रेटिंगमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट या कारला केवळ 2 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच ही कार जास्त वजन उचलण्यात सक्षम नसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या कारची सुरुवातीची किंमत (एक्स शोरुम) 5.19 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारमध्ये बीएस-6 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 83 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन 5-स्पीड मॅनुअल आणि 5-स्पीड AMT गियरबॉक्सच्या पर्यायासह सादर करण्यात आलं आहे.

कंपनीने आतापर्यंत या कारच्या 24 लाखांहून अधिक मॉडेल्सची विक्री केली आहे. ही कार गेल्या काही वर्षांपासून भारतातील बेस सेलिंग कार ठरत आहे. तसेच 2020 मध्येदेखील या कारने भारतीय मार्केटमध्ये दमदार प्रदर्शन केलं आहे. परंतु भारतीयांच्या पसंतीस उतरलेली ही कार सेफ्टीच्या (सुरक्षिततेच्या) बाबतीत खूपच मागे पडली आहे. स्विफ्ट 2020 मध्ये भारतात सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. 2020 मध्ये या कारच्या 1,60,700 युनिट्सची विक्री झाली आहे. भारतीय बाजारात स्विफ्टची स्थिती दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. तर दुसऱ्या बाजूला ही कार सुरक्षिततेच्या बाबतीत खूपच कमजोर ठरली आहे.

इतर बातम्या

देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कारवर बंपर डिस्काऊंट, कमी किंमतीत शानदार फीचर्स आणि मायलेज

कमी किंमतीत दमदार फीचर्स, Volkswagen Polo Comfortline TSI भारतात दाखल

सेकेंड हँड कार मार्केटमध्ये मारुतीच्या ‘या’ SUV ला मोठी मागणी, पुरवठा करणं अवघड

(Crash Test : Hyundai Grand i10 Nios is completely failed in Global NCAP safety Rating)

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.