रेनॉल्टच्या किगरची 3 मार्चपासून डिलीव्हरी, आधुनिक फिचरसह सुसज्ज असेल कार

रेनॉल्टच्या किगरची 3 मार्चपासून डिलीव्हरी, आधुनिक फिचरसह सुसज्ज असेल कार, 8 इंचाची टचस्क्रीन, वायरलेस चार्जर आदी फिचर्सची 5.45 लाख रुपयांत घेता येणार मजा (Delivery of Renault Kigar from March 3, equipped with modern features)

  • Updated On - 12:22 pm, Sun, 28 February 21
रेनॉल्टच्या किगरची 3 मार्चपासून डिलीव्हरी, आधुनिक फिचरसह सुसज्ज असेल कार
रेनॉल्टच्या किगरची 3 मार्चपासून डिलीव्हरी

नवी दिल्ली : अलिकडेच मार्केटमध्ये दाखल झालेल्या रेनॉल्ट कंपनीच्या किगर या स्पोर्ट्स कारची येत्या 3 मार्चपासून डिलीव्हरी सुरू केली जाणार आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.45 लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांना इतक्या कमी किंमतीत 8 इंचाची टचस्क्रीन, वायरलेस चार्जर आदी फिचर्सचा आनंद घेता येणार आहे. किगर ही स्पोर्ट्स कार सीएमएफ-ए-प्लस प्लॅटफॉर्मवर आधारीत आहे. रेनो किगर भारतीय बाजारपेठेत सहा रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध असेल. यात कॅसपियन ब्लू, रेडियंट रेड, मूनलाईट सिल्व्हर, प्लेनेट ग्रे, आईस कूल व्हाईट आणि महोगेनी या रंगांचा समावेश आहे. (Delivery of Renault Kigar from March 3, equipped with modern features)

कुणासोबत असेल किगरची टक्कर?

भारतीय बाजारात रेनोची किगर ही हटके स्पोर्ट्स कार दाखल होतेय. त्यामुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. या कारची अनेक वैशिष्ट्ये असून ही कार मार्केटमध्ये ह्युंडाई वेन्यू, निसान मॅग्नाईट, किओ सोनेट, महिंद्रा एक्सयूव्ही 300 आणि मारुती सुझुकी विटारा ब्रिजा या स्पोर्ट्स कारना टक्कर देणार आहे. रेनॉल्ट किगरमध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 99 बीएचपी आणि 160 एनएमचा टॉर्क तयार करतो.

जाणून घ्या कारची शानदार वैशिष्टे

रेनॉल्ट कंपनीने ही कार दोन इंजिन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. यातील पहिल्या पर्यायात 1.0 लिटर टर्बोचार्ज्ड 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन 100 पीएसची पॉवर आणि 160 एनएमचा टार्क जनरेट करतो. दुसऱ्या पर्यायात 1.0 एलचे पेट्रोल इंजिन मिळणार आहे. हे इंजिन 72 पीएसची पॉवर आणि 96 एनएमचा टार्क जनरेट करतो. कंपनीने या दोन इंजिनच्या पर्यायांबरोबरच 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसुद्धा दिले आहे.

रेनॉल्ट किगरची लांबी 3991 मिलिमीटर, रुंदी 1750 मिलिमीटर आणि उंची 1600 मिलिमीटर आहे. तसेच व्हिलबेस 2500 मिलिमीटर आणि ग्राऊंड क्लिअरेन्स 205 मिलिमीटर आहे. अद्भुत अशा रायडिंगचा अनुभव घेण्यासाठी कारमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स यांसारखे ड्रायव्हिंगचे तीन मोड देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात ही कार आरएक्सई, आरएक्सएल, आरएक्सटी आणि आरएक्सझेड अशा चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. कंपनीने या कारमध्ये 40 लिटर इतकी क्षमता असलेल्या फ्युअल टँकची व्यवस्था केली आहे. ही कार मार्केटमध्ये नक्कीच लोकप्रिय ठरेल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे. (Delivery of Renault Kigar from March 3, equipped with modern features)

 

इतर बातम्या

1 मार्चपासून तुमचं आर्थिक गणित बदलणार, गॅस सिलेंडर ते बँकेच्या कामात होणार मोठे बदल

हिरो होंडाची अनोखी टेक्नॉलॉजी, आता मोटारसायकलवर ड्रोनही स्वार होणार

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI