AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंगल चार्जवर 120KM रेंज, EeVe India ची Soul EV स्कूटर भारतात लाँच

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. वाहन कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.

सिंगल चार्जवर 120KM रेंज, EeVe India ची Soul EV स्कूटर भारतात लाँच
Soul EV
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 6:41 PM
Share

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करत आहेत. (EeVe India launched Soul EV scooter at price of 1.39 lakhs)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. वाहन कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, या सेगमेंटमध्ये EeVe इंडिया या भारतीय कंपनीने एंट्री केली आहे. कंपनीने त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. पुढील पाच वर्षांत देशातील ईव्ही मार्केटचा 10 टक्के बाजार हिस्सा काबीज करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 120KM ची रेंज देते असा कंपनीचा दावा आहे.

EeVe India च्या Soul EV ची किंमत

EeVe India या भारतीय कंपनीने या Soul EV ची भारतीय बाजारपेठेत किंमत 1,39,000 हजार रुपये (रस्त्यावर) इतकी ठेवली आहे. मात्र, इतर बाइक्सप्रमाणे यावरही ईएमआयचा पर्याय उपलब्ध असेल आणि अनेक राज्य सरकारे EV वर सबसिडीही देत ​​आहेत. त्यामुळे ही स्कूटर आणखी कमी किंमतीत खरेदी करता येईल.

3-4 तासात बॅटरी पूर्ण चार्ज

या स्कूटरमधील बॅटरीच्या चार्जिंग क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास, यातली बॅटरी 100% चार्ज होण्यासाठी 3-4 तास लागतात. या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 60 किलोमीटर आहे. भारतात पहिल्यांदाच उच्च दर्जाच्या युरोपियन तंत्रज्ञानाने बनवलेल्या स्कूटर्स लाँच केल्या जात आहेत. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर उत्तम ड्रायव्हिंग एक्सपीरियन्स प्रदान करेल.

Soul EV चे फीचर्स

Soul EV च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात अँटी थेफ्ट लॉक सिस्टम, जीपीएस नेव्हिगेशन, यूएसबी पोर्ट, कीलेस एक्सपीरियन्स, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड, सेंट्रल ब्रेकिंग सिस्टम, जिओ टॅगिंग आणि जिओ फेन्सिंग यांचा समावेश आहे. ही पूर्ण लोड केलेली IoT सुसज्ज स्कूटर आहे. ही स्कूटर अॅडव्हान्स्ड लिथियम फेरस फॉस्फेट (LFP) बॅटरीसह सुसज्ज आहे. या स्कूटरमधील बॅटरी रिमूव्हेबल आहे. या स्कूटरवर तीन वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.

Ola S1 चे फीचर्स

Ola S1 ची दिल्लीतील ऑन-रोड किंमत 85,099 रुपये आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 121 किमीची रेंज देते. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड 90kM प्रति तास इतका आहे. ही स्कूटर नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोडसह येते, यात पाच कलर व्हेरियंट देण्यात आले आहेत. यासोबतच यात 8.5 kW क्षमतेची मोटर देण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर या स्कूटरची किंमत 99,999 रुपये आहे.

Bajaj Chetak चे फीचर्स

बजाज चेतकची दिल्लीतील ऑन-रोड किंमत 1,00,000 रुपये आहे, तर प्रीमियम व्हेरिएंटची किंमत 1.15 लाख रुपये आहे. इको मोडवर ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 90KM ची रेंज देते. ही स्कूटर केवळ 5 तासांत पूर्णपणे चार्ज होते, तर 60 मिनिटांत 25 टक्के चार्ज होते. बॅटरीवर सात वर्षांची वॉरंटी आहे.

इतर बातम्या

नवीन वर्षात Toyota च्या गाड्या महागणार, Fortuner आणि Innova Crysta चा समावेश

Tesla च्या भारतात 7 ईव्ही लाँच होणार, केंद्र सरकारची मंजुरी, जाणून घ्या लाँचिंग कधी

13 लाखांची Mahindra Scorpio अवघ्या 3.8 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

(EeVe India launched Soul EV scooter at price of 1.39 lakhs)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.