AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ethanol Fueled Car : इथेनॉलवर धावणार कार! लवकरच लागणार मुहूर्त

Ethanol Fueled Car : इंधनाचे बहुविविध पर्यायांवर सध्या देशात भर देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहे. यापूर्वी त्यांनी हायड्रोजन कारचा वापर केला होता. आता 100 टक्के इथेनॉलवर धावणारी कारचे ते उद्धाघाटन करणार आहेत.

Ethanol Fueled Car : इथेनॉलवर धावणार कार! लवकरच लागणार मुहूर्त
| Updated on: Aug 26, 2023 | 5:14 PM
Share

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : देशात पेट्रोल-डिझेलला (Petrol Diesel) पर्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार खास प्रयत्न करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या तर त्यासाठी खास आग्रह आहे. त्यामुळे देशात ईव्ही वाहनाचं मोठे मार्केट तयार झालं आहे. पण दळणवळणासाठी एकाच पर्यायावर न राहता बहुविविध पर्याय शोधण्यावर भर देण्यात येत आहे. देशातील रस्त्यावर पहिल्यांदाच 100 टक्के इथेनॉलवर कार (Ethanol Fueled Car) धावेल. मीडिया रिपोर्टनुसार ही कार टोयोटाची इनोव्हा अथवा केमरी असू शकते. यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी हायड्रोजन कारचा प्रवास केला होता. अनेक भाषणात गडकरी यांनी आपण पेट्रोल-डिझेलच्या कारचा प्रवास बंद केल्याचे सांगितले आहे. ते इलेक्ट्रिक कार, हायड्रोजन अथवा पर्यायी इंधनाचा वापर करणाऱ्या कारचा वापर करतात.

या दिवशी कार रस्त्यावर

दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान गडकरी यांनी या कारची माहिती दिली. 29 ऑगस्टला टोयोटाच्या कारच्या उद्धघाटन करणार असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात जाहीर केले होते. ही कार 100 टक्के बायोइथेनॉलवर धावेल. या कारचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, ती इथेनॉलसह हायब्रिड प्रणालीवर 40 टक्के वीज निर्मिती करेल, त्याचाही प्रवासासाठी वापर करता येईल. ही कार जगातील पहिली BS6 फेज-2 इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स-इंधन कार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हायड्रोजन कार

अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांवर केंद्र भर देत आहे. ग्रीन एनर्जी कारसाठी खास प्रोत्साहन देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यासाठी आग्रही आहेत. टोयोटाच्या फ्लेक्स-इंधन पायलट प्रकल्पाला त्यामुळेच हिरवा कंदिल मिळाला. त्यांनी टोयोटा मिराई या हायड्रोजन कारचे उद्धघाटन केले होते.

कसे तयार होते इथेनॉल

स्टार्च आणि साखरेच्या किण्वातून इथेनॉल तयार होते. हे एक प्रकारचे अल्कोहोल असते. पेट्रोलमध्ये मिसळून ते वापरण्यात येते. ऊसाच्या रसापासून, मका, बटाटे, कुजलेला भाजीपाला, स्टार्चयुक्त पदार्थातून इथेनॉल तयार करण्यात येते.

देशभरात इथेनॉल पंप

देशभरात इथेनॉल पंप सुरु करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या योजनेवर काम सुरु आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याची योजना आहे. त्यासाठी 1,000 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. दोन वर्षांनी देशभरात असे पंप मोठ्या प्रमाणात उभारण्यात येतील.

असा झाला फायदा

पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळून 41,500 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलन वाचले आहे. तसेच, हरित वायू उत्सर्जनात 27 लाख टनांनी घट झाली असून शेतकऱ्यांना 40,600 कोटींचा फायदा झाला आहे. आता 20% इथेनॉल मिश्रणासह पेट्रोलच्या पुरवठ्यामुळे वार्षिक 4 अब्ज डॉलर वाचण्याचा अंदाज आहे. सध्या पेट्रोलमध्ये 10.17 टक्के इथेनॉल मिसळले जात आहे, जे 2020-21 मध्ये 8.10 टक्के आणि 2019-20 मध्ये 5 टक्के होते. 2013-14 मध्ये तो 1.53 टक्के होता. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यासाठी 1000 कोटी लिटर इथेनॉलची गरज पडणार आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा