आता कारमध्येही फेस आयडी आणि फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार, चावीशिवाय सगळी कामं होणार

जेनेसिसने जाहीर केले आहे की, त्यांनी स्मार्ट कारसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे स्मार्टफोनमधील फेस आयडी तंत्रज्ञानासारखेच आहे. त्याचे नाव फेस कनेक्ट टेक्नॉलॉजी आहे.

आता कारमध्येही फेस आयडी आणि फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार, चावीशिवाय सगळी कामं होणार

मुंबई : जेनेसिसने जाहीर केले आहे की, त्यांनी स्मार्ट कारसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे स्मार्टफोनमधील फेस आयडी तंत्रज्ञानासारखेच आहे. त्याचे नाव फेस कनेक्ट टेक्नॉलॉजी आहे, ते चेहरे ओळखू शकते, चावीशिवाय या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण कारचा दरवाजा उघडू शकतो. जेनेसिसचे म्हणणे आहे की, नवीन तंत्रज्ञान ग्राहकांना त्यांच्या वाहनांना बेस्ट ड्रायव्हिंग एक्सपीरियन्ससाठी पर्सनलाइज करण्यात मदत करेल. (Face ID and fingerprint sensor in cars? Genesis promises smartphone like technology)

फेस कनेक्ट टेक्नॉलॉजीने ड्रायव्हरची ओळख पटवली की, ते त्याच्या प्रोफाईलशी सिंक होईल, ड्रायव्हरची सीट आणि स्टीयरिंग व्हील, हेड-अप-डिस्प्ले (एचयूडी), साइड मिरर आणि इन्फोटेनमेंट सेटिंग्ज ऑटोमॅटिकपणे अॅडजस्ट होतील. या तंत्रज्ञानामध्ये, आपल्याला नियर इन्फ्रा रेड कॅमेरा देखील मिळेल जो कोणत्याही परिस्थितीत आपला चेहरा ओळखेल. जरी तुमचा फेस प्री रजिस्टर नसला तरीदेखील या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार तुमचा चेहरा डिटेक्ट करेल.

या तंत्रज्ञानाच्या मदतनीने कंपनी दावा करते की, ड्रायव्हर्सना नेहमीच त्यांच्यासोबत स्मार्ट की बाळगण्याची गरज नाही. जरी कोणी कारमध्ये स्मार्ट की सोडली तरी फेस आयडी तंत्रज्ञानाचा वापर करून वाहन लॉक केले जाऊ शकते. जेनेसिसने म्हटले आहे की, फेस कनेक्ट प्रणाली प्रत्येक वाहनात दोन व्यक्तींचा डेटा साठवू शकते. रजिस्टर्ड चेहरे कोणत्याही सुरक्षिततेच्या जोखमीशिवाय वाहनात एन्क्रिप्ट केले आणि साठवले जातात. ते ड्रायव्हरच्या सोयीनुसार कोणत्याही वेळी डिलीट केले जाऊ शकतात आणि व्हॉईस असिस्टंट वापरून नवीन प्रोफाइलची नोंदणी केली जाऊ शकते.

फेस आयडी तंत्रज्ञान पुरेसे वाटत नसेल, तर जेनेसिसकडे स्मार्टफोनसारखे दुसरे तंत्रज्ञान आहे जे फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन प्रणाली आहे. हे स्मार्टफोन किंवा स्मार्ट की ची मदत न घेता बायोमेट्रिक माहितीवर आधारित वाहनावर पूर्ण नियंत्रण ठेवण्यास ड्रायव्हर्सना मदत करू शकते. या दोन्ही सिस्टिम्समध्ये रजिस्टर्ड कोणतीही व्यक्ती चेहऱ्याची ओळख पटवून किंवा बायोमेट्रिक पद्धतीने कार सुरु/बंद करु शकतो. फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनचा वापर वाहनातील पेमेंटसाठी आणि वॉलेट मोड जारी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

जेनेसिसने म्हटले आहे की, हे नवीन तंत्रज्ञान त्यांच्या आगामी मॉडेल GV60 मध्ये लागू करण्याची योजना आखत आहे, जे लवकरच लॉन्च होणार आहे. नंतर, इतर जेनेसिस मॉडेल देखील त्यांच्या वैशिष्ट्यांचा भाग म्हणून हे अॅप्लिकेशन मिळवतील.

इतर बातम्या

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची कमाल! दोन दिवसांत तब्बल 1100 कोटींची कमाई

होंडा एन7एक्स मिडसाईज एसयुव्ही 21 सप्टेंबरला लॉन्च होणार, ह्युंडाई क्रेटा आणि किया सेल्टोससारख्या कारशी असेल स्पर्धा

PHOTO | डस्टर ते हॅरियर पर्यंतच्या बेस्ट मिडसाईज एसयूव्हीवर मोठी सवलत, जाणून घ्या तपशील

(Face ID and fingerprint sensor in cars? Genesis promises smartphone like technology)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI