iPhone 12 वर मिळवा तब्बल 20 हजार रुपयांची सूट… काय आहे ऑफर जाणून घ्या…

आघाडीची ई-कॉमर्स वेबसाइट ॲमेझॉनवर अत्यंत वाजवी दरात ग्राहक आयफोनची खरेदी करु शकणार आहेत. आयफोन 12 वर सुमारे 20,000 रुपयांची सूट मिळणार आहे. या लेखाच्या माध्यमातून आयफोन 12 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.

iPhone 12 वर मिळवा तब्बल 20 हजार रुपयांची सूट... काय आहे ऑफर जाणून घ्या...
iPhone 12 वर मिळवा तब्बल 20 हजार रुपयांची सूट
Image Credit source: Social Media
रचना भोंडवे

|

Jul 01, 2022 | 4:37 PM

जर तुम्ही आयफोन 12 (iPhone 12) खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. कारण ॲमेझॉनने आपल्या वेबसाईटवर आयफोन 12 वर भरघोस ऑफर उपलब्ध करुन दिली असून याच्या माध्यमातून युजर्स खरेदी करुन पैशांची बचत करु शकणार आहेत. ॲप्पल आयफोन 12 वर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटबद्दल (discount) वेबसाइटवर अधिकृत माहिती देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अत्यंत कमी किमतीत ई-कॉमर्स वेबसाइट ॲमेझॉन (Amazon) वर खरेदी करता येणार आहे. या फोनवर सुमारे 20,000 रुपयांची सूट मिळणार आहे. सोबतच एक्सचेंज ऑफरसह सिटी बँक कार्डवरही अतिरिक्त डिस्काउंट देण्यात आले आहे.

काय आहे ऑफर?

या स्मार्टफोनचे 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 69,900 रुपयांऐवजी 58,999 रुपयांना खरेदी करता येईल. यावर 16 टक्के डिस्काउंट दिली जात आहे. या फोनला अॅमेझॉनवर 5 पैकी 4.6 रेट केले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार हा स्मार्टफोन EMI वर देखील खरेदी करता येणार आहे. यासाठी तुम्हाला दरमहा 2,777 रुपये द्यावे लागतील. यामध्ये ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही मिळेल. याशिवाय 9,150 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जाईल. एक्सचेंज आणि फ्लॅट डिस्काउंटसह, फोनवर सुमारे 20,000 रुपयांची सूट मिळेल. सिटी बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 1,500 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट दिली जाईल.

कॅमेरा फीचर्स

फोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिसप्ले आहे. तसेच त्यात सिरॅमिक शील्ड प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यात A14 बायोनिक चिप देखील आहे. कोणत्याही फोनमध्ये दिलेली ही सर्वात वेगवान चिप आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सिस्टम आहे. त्याचा पहिला सेंसर 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेंसर आहे आणि दुसरा 12 मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा TrueDepth फ्रंट कॅमेरा आहे. फोन IP68 वॉटर रेझिस्टन्स बनवला गेला आहे. हे MagSafe अॅक्सेसरीजला सपोर्ट करते.

Apple iPhone 12 स्पेसिफिकेशन्स

  • परफॉर्मेंस – ॲप्पल A14 बायोनिक
  • स्टोरेज – 64 जीबी
  • कॅमेरा – 12 MP + 12 MP
  • भारतात किंमत – 79900
  • डिसप्ले – 6.1 इंच (15.49 सेमी)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें