AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुचाकीप्रेमींसाठी खुशखबर; केटीएमच्या दोन शानदार बाईक्स लाँच

दोन्ही बाईक्सच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर KTM RC 125 ची किंमत 1,81,913 रुपये (एक्स-शोरूम किंमत दिल्ली) आहे. तसेच KTM RC 200 ची किंमत 2,08,717 रुपये (दिल्ली एक्स शोरूम) आहे. कंपनीने जाहीर केले आहे की ही एक प्राथमिक किंमत आहे.

दुचाकीप्रेमींसाठी खुशखबर; केटीएमच्या दोन शानदार बाईक्स लाँच
केटीएमच्या दोन शानदार बाईक्स लाँच
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 7:21 AM
Share

नवी दिल्ली : दुचाकीप्रेमींसाठी खुशखबर आहे. तुमचा आनंद द्विगुणित करणाऱ्या नव्या हटके बाईक्स तुमच्या भेटीला आल्या आहेत. केटीएमने ‘केटीएम आरसी 125’ आणि ‘केटीएम आरसी 200’ या दोन बाईक्स लाँच केल्या आहेत. कंपनीने या दोन्ही बाईक्सची किंमत जाहीर केली आहे. दोन्ही बाईक्सचे लुक आणि मेकॅनिकल अपडेट केले आहेत. जुन्या एडिशनच्या तुलनेत, नवीन बाईकमध्ये एक मोठा गिअरबॉक्स आहे. फिकट मिश्रधातूची चाके देण्यात आली आहेत. तसेच लाइट ब्रेकचा वापर करण्यात आला आहे. यात वक्र रेडिएटर आहे, जे त्याची शक्ती वाढवण्याचे काम करते. (Good news for bike lovers; KTM launches two fantastic bikes)

दोन्ही बाईक्सच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर KTM RC 125 ची किंमत 1,81,913 रुपये (एक्स-शोरूम किंमत दिल्ली) आहे. तसेच KTM RC 200 ची किंमत 2,08,717 रुपये (दिल्ली एक्स शोरूम) आहे. कंपनीने जाहीर केले आहे की ही एक प्राथमिक किंमत आहे. लवकरच या किमतीमध्ये वाढ होणार आहे. दोन्ही बाईक्सचे बुकिंग खुले करण्यात आले असून उत्पादन सुरु आहे. KTM RC 200 ची डिलिव्हरी लवकरच सुरू होईल आणि KTM RC 125 ची डिलिव्हरी पुढील महिन्यापासून म्हणजेच नोव्हेंबरपासून सुरू होईल.

ही आहेत हटके वैशिष्ट्ये

KTM RC 125 बाईकमध्ये 124.7सीसी इंजिन आहे, जे 15hp पॉवर आणि 124Nm टॉर्क जनरेट करण्यास मदत करते. दुसरीकडे KTM RC 200 मध्ये 199.5 सीसी इंजिन आहे, जे 26 बीएचपी पॉवर आणि 19.5 एनएम टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिनमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स वापरण्यात आला आहे.

KTM RC 125 आणि KTM RC 200 वजन

KTM RC 125 चे वजन 150 किलो आहे, तर दुसऱ्या एडिशनचे म्हणजेच KTM RC 200 चे वजन 151 किलो आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत, नवीन मॉडेलमध्ये 13.7 लिटरची टाकी आहे. जुन्या मॉडेलमध्ये 9.5 लिटरची टाकी होती.

KTM RC 125 आणि KTM RC 200चे स्वरूप

लुकबद्दल बोलायचे तर, नवीन केटीएम बाईकमध्ये नवीन हेडलॅम्प वापरण्यात आले आहेत, तर आरसी 200 मध्ये एलईडी सेटअप आहे, तर आरसी 125 मध्ये हॅलोजन सेटअप आहे. बाईक्सला एलईडी डे टाईम रनिंग लाइट्सदेखील मिळतील, जे टेल लाइट्सपेक्षा वेगळे असतील. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा वापर या बाईक्समध्ये करण्यात आला आहे. या दोन्ही बाईक्स दुचाकीप्रेमींची चांगलीच पसंती मिळवतील, असा विश्वास कंपनीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. (Good news for bike lovers; KTM launches two fantastic bikes)

इतर बातम्या

गृह कर्जावर घेतलेले घर विकत असाल तर कराचा भार पेलावा लागेल; जाणून घ्या यावर उपाय

3 महिन्यांसाठी सायन फ्लायओव्हर वीकएंडला बंद ! गाड्यांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचे हाल होणार

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.