3 महिन्यांसाठी सायन फ्लायओव्हर वीकएंडला बंद ! गाड्यांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचे हाल होणार

मुंबई पोलीस उपायुक्त (वाहतूक) कार्यालयाच्या आदेशनुसार सायन फ्लायओव्हर ऑक्टोबर 15 रात्री ते 9 जानेवारी या कालवधीत प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील.

3 महिन्यांसाठी सायन फ्लायओव्हर वीकएंडला बंद ! गाड्यांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचे हाल होणार
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 11:00 PM

मुंबई (देवश्री भुजबळ) : मुंबईचा महत्त्वाचा असलेला सायन फ्लायओव्हर हा पुढचे तीन महिने दर वीकएंडला म्हणजेच शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवार पहाटेपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे मुंबईकरांना ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर पुढच्या काही वीकेंड्सला ट्रॅफिक जॅमला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागणार. आज सकाळपासूनच या मार्गावर गाड्यांचा लांब रंग लागल्याने प्रवाशांचे झाले. शनिवारी संध्याकाळी कार्यालयातून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची परेशानी झाली. वीकएंड म्हणून दादर, परळ, सायन, माहीम, माटुंगा परिसरात बाहेर पडलेले लोक ट्रॅफिकमुळे हैराण झाले.

शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत वाहतूक बंद

मुंबई पोलीस उपायुक्त (वाहतूक) कार्यालयाच्या आदेशनुसार सायन फ्लायओव्हर ऑक्टोबर 15 रात्री ते 9 जानेवारी या कालवधीत प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. अधिसूचनेनुसार एमएसआरडीसीमार्फत सायन फ्लायओव्हरचे नादुरुस्त बेअरिंग व सांधे बदलण्याचे काम करण्यात येणार आहे.

पर्यायी रस्त्याची सोय कशी आहे ?

ट्रॅफिक पोलिसांनी अवजड वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला आहे. चार आणि दोन चाकी वाहनांसाठीसुद्धा पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे याच रस्त्यात सायन हॉस्पिटल येते व सायन हॉस्पिटल येथून येणाऱ्या गाड्या सायन जक्शनला डावीकडे जाऊन सुलोचना शेट्टी मार्गाने माहीम बंदराच्या दिशेने मार्गक्रमण करतील.

ट्रॅफिममध्ये फसण्याची शक्यता 

येणारे सण बघता मुंबईकर शनिवार-रविवारी दादर मार्केटला खरेदीसाठी करण्याची शक्यता आहे. पुढचे तीन महिने वीकेंड्सला सायन हायवेने प्रवास करायचा असल्यास ट्रॅफिक मध्ये वेळ खर्च करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

इतर बातम्या :

कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश बंदी, तर तुळजापुरात संचारबंदी

आधी तोरा मिरवला पण शेवटी वठणीवर आले, पाकड्यांच्या जर्सीवर आता सन्मानाने दिसतोय ‘इंडिया’

चालत्या कारची स्टेअरिंग अचानक लॉक झाली आणि महिला डॉक्टरने जीव गमावला, नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री?

(Sion flyover will be closed for 3 months on every weekend may cause heavy traffic)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.