AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honda Hornet 2.0 की Yamaha MT 15 V2, कोणती बाईक अधिक दमदार? जाणून घ्या

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने अद्ययावत OBD2B--कम्प्लायंट Hornet 2.0 लाँच केले आहे. बाजारात या बाईकची टक्कर Yamaha MT 15 V2 शी आहे. Honda Hornet 2.0 vs Yamaha MT 15 V2 बाईकपैकी कोणती बाइक तुम्हाला कमी किंमतीत अधिक फीचर्स देत आहे.

Honda Hornet 2.0 की Yamaha MT 15 V2, कोणती बाईक अधिक दमदार? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Feb 20, 2025 | 3:49 PM
Share

भारतीय बाजारपेठेत देशातील दुचाकी कंपनी होंडा इंडियाने नवीन बाईक बाजारात आणली आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने अद्ययावत OBD2B-कम्प्लायंट Hornet 2.0 लाँच केले आहे. कंपनीने ही बाईक अपडेटेड स्टाइलिंग, टेक्नॉलॉजी आणि चांगल्या सेफ्टी फीचर्ससह लाँच केली आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 1.56 लाख रुपये आहे.

ही बाईक आता HMSI रेड विंग आणि बिंगबिंग डीलरशिपवर उपलब्ध असेल. बाजारात या बाईकची टक्कर Yamaha MT 15 V2 शी आहे. Honda Hornet 2.0 vs Yamaha MT 15 V2 बाईकपैकी कोणती बाईक तुम्हाला कमी किंमतीत जास्त फीचर्स देत आहे आणि कोणाचे मायलेज चांगले आहे. त्याचा संपूर्ण तपशील येथे वाचा.

Honda Hornet 2.0 विरुद्ध Yamaha MT 15 V2 फीचर्स

Honda Hornet 2.0 मध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. बाईकमध्ये आक्रमक नवीन ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय अ‍ॅडव्हान्स टीएफटी डिस्प्ले सोबतच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि सेफ्टी फीचर्सही देण्यात आले आहेत. बाईकमध्ये नवीन एलईडी लाइटिंग सेटअप देखील देण्यात आला आहे. यात नेव्हिगेशन सपोर्ट, इनकमिंग कॉल अलर्ट आणि एसएमएस नोटिफिकेशनचा सपोर्ट आहे. Yamaha MT 15 V2 मध्ये सिंगल पॉड एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि साइड स्लंग एक्झॉस्ट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देखील आहे.

Honda Hornet 2.0 vs Yamaha MT 15 V2 रंग पर्याय

Honda Hornet 2.0 4 नवीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये Igneous Black, Radiant Red Metallic, Athletic Blue Metallic आणि Mat Axis Gray Metallic यांचा समावेश आहे. तर MT 15 V2 चा रंग सायन ब्लू आणि रेसिंग ब्लू आहे. या बाईकमध्ये सर्वात जास्त मेटॅलिक ब्लॅक असून टँक एक्सटेन्शनवर ग्रे डेकल सह ब्लॅक बॉडी पॅनेल आहेत.

Honda Hornet 2.0 vs Yamaha MT 15 V2 इंजिन

ही बाईक OBD2B-compliant सोबत येते. यात 184.40 सीसीचे सिंगल सिलिंडर 4 स्ट्रोक इंजिन आहे. हे इंजिन जास्तीत जास्त 12.50 किलोवॅट पॉवर आणि जास्तीत जास्त 15.7 न्यूटन टॉर्क जनरेट करते. MT 15 V2 मध्ये 155 सीसी सिंगल सिलिंडर, लिक्विड कूल्ड इंजिन आहे. यात 6 स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे. हे इंजिन 10,000 आरपीएमवर 18.4 बीएचपीपॉवर आणि 7,500 आरपीएमवर 14.2 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

Honda Hornet 2.0 vs Yamaha MT 15 V2 किंमत किती?

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या बाईकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 1.56 लाख रुपये आहे. ही बाईक सिंगल व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली असली तरी 4 कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. ही बाईक सर्व होंडा रेड विंग आणि बिंगबिंगमध्ये उपलब्ध आहे. तर, किंमतीच्या बाबतीत Yamaha MT 15 V2 बाइकचा मेटॅलिक ब्लॅक कलर ऑप्शन सर्वात किफायतशीर असून त्याची किंमत 1,70,086 रुपये आहे.

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.