Honda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?

वाहन निर्मात्या कंपन्यांनी जून महिन्यात विविध मॉलेडल्सवर डिस्काऊंट जारी केले आहेत. या बाबतीत होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया ही कंपनी आघाडीवर आहे.

Honda च्या 'या' शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?
Honda Shine
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 3:42 PM

मुंबई : अनेक वाहन निर्मात्या कंपन्यांनी जून महिन्यात त्यांच्या विविध मॉलेडल्सवर डिस्काऊंट जारी केले आहेत. या बाबतीत होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India) ही कंपनी आघाडीवर आहे. ही जपानी दुचाकी निर्माता कंपनी कम्यूटर सेगमेंट व्हीकल्सवर 3500 रुपयांची सवलत देत आहे. (Honda Offering up to Rs 3,500 casback on Honda Shine, Unicorn and X Blad)

कंपनीने होंडा अ‍ॅक्टिव्हा, ग्रॅझियासारख्या (Grazia) स्कूटर्सवर कॅशबॅक ऑफर देऊ केली आहे, यात आता शाईन (Shine) आणि एक्स ब्लेड (X Blade) या दोन बाईक्सचादेखील समावेश करण्यात आला आहे. ही ऑफर हा संपूर्ण महिनाभर (जून) उपलब्ध आहे.

ग्राहकांना या ऑफरसाठी एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करावी लागेल. म्हणजेच या कार्डद्वारे तुम्हाला 40,000 रुपये स्वाइप करावे लागतील, त्यानंतरच तुम्हाला ही ऑफर मिळेल. आपण डीलरशिपला भेट देऊन किंवा ऑनलाइन हे करू शकता. परंतु आपल्याला प्रथम डीलरशिपवर जाऊन एकदा या ऑफरची पुष्टी करावी लागेल. होंडा युनिकॉर्न या बाईकवरदेखील कंपनीने ऑफर देऊ केली आहे.

होंडा युनिकॉर्नमध्ये 163 सीसी क्षमतेचं इंजिन दिले गेले आहे, जे 12.73 एचपी पॉवर आणि 14 एनएम टॉर्क जनरेट करतं. आपल्याला या इंजिनमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स मिळेल. यामध्ये तीन तीन रंग उपलब्ध आहेत, ज्यामध्ये मॅट अॅक्सिस, ग्रे मेटॅलिक, पर्ल Igneous ब्लॅक आणि Imperial रेड मेटॅलिकचा समावेश आहे. HMSI कंपनी एक्स ब्लेडवरसुद्धा डिस्काऊंट देत आहे.

होंडाच्या सर्व दुचाकी बीएस 6 era सह येतात. यावर तीन वर्षांची वारंटी मिळते, तर पुढील तीन वर्षांसाठी ग्राहकाला अतिरिक्त प्रीमियम घ्यावा लागतो. होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया ग्राहकांसाठी सातत्याने अधिकाधिक क्षमतेच्या मोटरसायकल्स ऑफर करत आहे.

होंडाच्या 650cc, 500cc वाहनांच्या किंमतीत वाढ

परंतु या मोटारसायकल्सच्या किंमती खूप जास्त आहेत, अशा परिस्थितीत कंपनीने कोणती नवी रणनीती आखली आहे, ही बाब सध्या तरी स्पष्ट नाही. HMSI 650cc आणि 500cc वाहनांच्या किंमती वाढवत आहे. अशा परिस्थितीत जर एखादा ग्राहक अशी बाईक घेण्याचा विचार करीत असेल तर त्याला पुन्हा एकदा विचार करावा लागेल. कंपनी येत्या काळात मेड इन इंडिया बाईक बाजारात सादर करु शकते. या दुचांकींची किंमतदेखील कमी असेल, असे म्हटले जात आहे.

इतर बातम्या

पावसाळ्यात आपल्या बाईकची अशी घ्या काळजी, या 5 महत्वाच्या गोष्टींची करा तयारी

अवघ्या 1200 रुपयात घरी न्या Bajaj ची शानदार बाईक, एक लीटर पेट्रोलमध्ये 90 किमी मायलेज

PHOTO | एका लिटर पेट्रोलमध्ये 104 किमी धावतील या बाईक, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

(Honda Offering up to Rs 3,500 casback on Honda Shine, Unicorn and X Blad)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.