मोस्ट अवेटेड Hyundai Alcazar SUV भारतात दाखल, जाणून घ्या कींमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Hyundai Alcazar एसयूव्ही आज अधिकृतपणे भारतात लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत 16.30 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे.

मोस्ट अवेटेड Hyundai Alcazar SUV भारतात दाखल, जाणून घ्या कींमत आणि फीचर्स
Hyundai Alcazar Launched
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 4:15 PM

मुंबई : बहुप्रतीक्षित Hyundai Alcazar एसयूव्ही आज अधिकृतपणे भारतात लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत 16.30 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे, तर या कारच्या टॉप व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 19.99 लाख रुपये मोजावे लागतील. या दोन्ही किंमती एक्स शोरुम आहेत. ही कार भारतीय बाजारात टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लस या दोन गाड्यांना तगडी स्पर्धा देईल. (Hyundai alcazar launched in India at 16.30 lakh rupees, check features)

दरम्यान, ह्युदायकडून सांगण्यात आले आहे की, लाँचिंगपूर्वीच या कारसाठी 4000 हून अधिक बुकिंग्स प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 55 टक्के लोकांनी डिझेल व्हेरिएंटला पसंती दर्शवली आहे. ह्युंदाय Alcazar ही एसयूव्ही क्रेटावर आधारित आहे, जी 2015 मध्ये लाँच करण्यात आलेली मिड-साईज एसयूव्ही आहे. क्रेटाने भारतीय बाजारात ह्युंदायला मोठं नाव मिळवून दिलं आहे. अल्काझारचा व्हीलबेस 2760 मिमी इतका आहे, तर आपल्याला यामध्ये 180 लीटर बूट स्पेस मिळते.

व्हेरिएंट्स

Alcazar ही कार कंपनीने तीन वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये Prestige, Platinum आणि Signature चा समावेश आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. ग्राहकांना पेट्रोलमध्ये मिळणारं बेस व्हेरिएंट 7 सीटर पर्याय असेल आणि हे व्हेरिएंट मॅन्युअल ट्रांसमिशनसह येईल. त्याच वेळी, डिझेल इंजिनचे बेस मॉडेलदेखील सारखंच आहे. यानंतर तुम्हाला Prestige 6 सीट ऑप्शन आणि नंतर Prestige (O) मध्ये 7 सीट ऑप्शन मिळेल. एकूण 6 सिंगल आणि दोन ड्युअल टोन कलरसह ही एसयूव्ही सादर करण्यात आली आहे.

कलर आणि इंजिन पर्याय

सिंगल टोन कलरमध्ये तुम्हाला Phantom ब्लॅक, पोलर व्हाइट, Starry नाइट, Taiga ब्राऊन, Titan ग्रे आणि टायफून सिल्व्हर हे रंग मिळतील. डुअल टोन कलरमध्ये तुम्हाला पोलर व्हाइट, फँटम ब्लॅक रूफ आणि टायटन ग्रे हे रंग मिळतील. या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला 2.0 लीटरचं पेट्रोल इंजिन मिळेल, जे 152 hp पॉवर आणि 191Nm टॉर्क देईल. यामध्ये तुम्हाला 1.5 लीटर डीझेल इंजिन मिळेल, जे 115hp पॉवर 250Nm टॉर्क देईल. पेट्रोल इंजिन 14.2 किलोमीटर प्रती लीटर मायलेज देतं. तर डिझेल इंजिन तुम्हाला 18.1 kmpl मायलेज देईल.

इतर फीचर्स

या कारमध्ये तुम्हाला 26.03cm मल्टी डिस्प्ले डिजिटल क्लस्टर, 8 स्पीकर्ससह बोस प्रीमियम साऊंड सिस्टिम, ऑटो हेल्दी एयर प्यूरीफायर, फ्रंट रो सीटबॅक टेबल रिट्रॅक्टेबल कप होल्डर आणि आयटी डिव्हाइस होल्डसह अनेक फीचर्स मिळतात. तसेच यामध्ये तुम्हाला फ्रंट रो स्लायडिंग सनवायजरही मिळेल. गाडीमध्ये रियर विंडो सनशेड मिळेल. तसेच यामध्ये तुम्हाला व्हॉईस इनेबल्ड स्मार्ट पॅनोरोमिक सनरूफ देण्यात आलं आहे. ही कार 64 कलर एंबियंट लायटिंग, पॉवर ड्रायव्हर सीट आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसह येते.

इतर बातम्या

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय

सिंगल चार्जवर 220km रेंज, होंडाची Two-Door इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Maruti Swift ला मागे टाकत ‘ही’ कार ठरली देशात नंबर वन, लॉकडाऊन असूनही रेकॉर्डब्रेक विक्री

(Hyundai alcazar launched in India at 16.30 lakh rupees, check features)

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.