AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hyundai च्या Santro, Grand i10 Nios, Aura, Elantra सह अनेक गाड्यांवर 1.5 लाखांचा डिस्काऊंट

ह्युंदाय इंडिया फेब्रुवारी महिन्यात काही निवडक वाहनांवर आकर्षक सूट देत आहे. (Hyundai Offers Discounts Up To 1.5 Lakh rupees on cars)

Hyundai च्या Santro, Grand i10 Nios, Aura, Elantra सह अनेक गाड्यांवर 1.5 लाखांचा डिस्काऊंट
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 22, 2021 | 3:34 PM
Share

मुंबई : ह्युंदाय इंडिया (Hyundai India) फेब्रुवारी महिन्यात काही निवडक वाहनांवर आकर्षक सूट देत आहे. ही दक्षिण कोरियाई वाहन निर्माती कंपनी त्यांच्या बीएस 6 कंप्लायंट वाहनांवर बंपर डिस्काऊंट देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. इच्छूक ग्राहक निवडक Hyundai कार्सवर 1.5 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये सँट्रो (Santro), ऑरा (Aura), ग्रँड i10 Nios (Grand i10 Nios), एलेंट्रा (Elantra) आणि कोना या कार्सचा समावेश आहे. (Hyundai Offers Discounts Up To 1.5 Lakh rupees On Santro, Grand i10 Nios, Aura, Elantra & Kona EV)

कंपनीने सादर केलेली नवीन ऑफर केवळ 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू असेल. ह्युंदायच्या या वाहनांवर दिली जाणारी ऑफर डीलर टू डीलर वेगळी असू शकते. तुम्ही सध्या नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ह्युंदायने तुमच्यासाठी बेस्ट ऑफर सादर केली आहे. दरम्यान कंपनीने ह्युंदाय सँट्रो ही कार त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर 50 हजार रुपयांपर्यंतच्या लाभांसह लिस्ट केली आहे. या हॅचबॅक कारवर 30,000 रुपयांचा रोख डिस्काऊंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जाणार आहे.

ह्युंदाय कंपनी ग्रँड i10 नियॉसवरही (Grand i10 Nios) डिस्काऊंट देत आहे. या कारच्या पेट्रोल आणि डिझेल वेरियंटमध्ये 60,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. यामध्ये 45000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच या गाडीवर 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटही दिला जात आहे.

एलेन्ट्रावर 1 लाखांचा डिस्काऊंट

ह्युंदाय Aura या कारवर कंपनीने 70,000 (पेट्रोल आणि डिझेल वेरियंट) रुपयांपर्यंतची सूट दिली आहे. इच्छुक ग्राहक 50,000 रुपयांपर्यंतच्या रोख डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकतात. सोबत 15000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे. एलेन्ट्रा या कारच्या पेट्रोल आणि डिझेल वेरिएंट्सवर कंपनीने 1 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला आहे. ज्यामध्ये 70000 रुपयांचा रोख डिस्काऊंट तर 30000 रुपयांपर्यंतची बोनस ऑफर समाविष्ट करण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक कारवर 1.5 लाखांची सूट

दरम्यान, ह्युंदायने कोना इलेक्ट्रिक एसयूव्हीवर 1.5 लाख रुपयांची सूट दिली आहे. यामध्ये कोणत्याही एक्सचेंज बोनस अथवा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा समावेश करण्यात आलेला नाही. या सर्व ऑफर्ससह कार निर्माती कंपनी ह्युंदाय सरकारी कर्मचाऱ्यांना 8000 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे.

हेही वाचा

आता बाईक आणि सोबत ड्रायव्हरही मिळणार भाड्याने, कमी पैशात हव्या तितक्या ठिकाणी फिरा

प्रतीक्षा संपली, नवी 7 सीटर Tata Safari 2021 लाँच, किंमत…

केवळ 51000 रुपयात घरी न्या 83KM मायलेज देणारी मोटारसायकल

(Hyundai Offers Discounts Up To 1.5 Lakh rupees On Santro, Grand i10 Nios, Aura, Elantra & Kona EV)

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप