Ford चे अधिकारी आणि युनियनची महत्त्वाची बैठक संपन्न, जाणून घ्या भारत सोडण्याच्या निर्णयावर कंपनीचं मत काय?

भारतात वाहन उत्पादन बंद करण्याच्या कॉर्पोरेट निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी फोर्ड मोटर कंपनीच्या (Ford Motor Company) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतची लेबर युनियनची बैठक अयशस्वी झाली आहे.

Ford चे अधिकारी आणि युनियनची महत्त्वाची बैठक संपन्न, जाणून घ्या भारत सोडण्याच्या निर्णयावर कंपनीचं मत काय?
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 11:33 PM

मुंबई : भारतात वाहन उत्पादन बंद करण्याच्या कॉर्पोरेट निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी फोर्ड मोटर कंपनीच्या (Ford Motor Company) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतची लेबर युनियनची बैठक अयशस्वी झाली आहे. फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या (Ford India Private Limited) एका सेंट्रल ऑफिसरने याबाबतची माहिती दिली. कामगार संघटनेने भारतातील चारपैकी तीन कारखाने बंद करण्याच्या निर्णयात सहभागी असलेल्या फोर्ड मोटर कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची मागणी केली होती. (important meeting of Ford officials and union held, know what is the company’s opinion on decision to leave India?)

युनियनच्या एका नेत्याने IANS ला सांगितले की, “आम्ही सोमवारी फोर्ड मोटर कंपनीच्या IMG (इंटरनॅशनल मार्केट्स ग्रुप) च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. आम्हाला सांगण्यात आले आहे की, भारतीय कारखाने बंद करण्याचा निर्णय अंतिम आहे आणि त्यात कोणताही बदल होणार नाही. त्यांच्या मते, कामगारांना एका वेळच्या नुकसान भरपाईची गरज नाहीये. त्यांना आपल्या नोकरीची सुरक्षा हवी आहे.

बऱ्याच काळापासून फोर्ड कंपनी भारतात मोठे नुकसान सहन करत आहे. त्यामुळे आता फोर्ड कंपनी आपल्या काही कार आयात करुन देशात विकत राहील. तसेच डिलर्सना विद्यमान ग्राहकांना सेवा देण्यासाठी देखील मदत करेल.

फोर्ड आणि महिंद्रा या कंपन्यांनी भागीदारी करणे अपेक्षित होते. तथापि, 1 जानेवारी 2021 रोजी दोन्ही निर्मात्यांनी सौहार्दपूर्ण घोषणा केली की, जॉइंट वेंचर बंद आहे आणि दोन्ही उत्पादक स्वतंत्र मार्गाने जातील. फोर्ड आणि महिंद्रा वाटाघाटीच्या प्रगत टप्प्यावर असताना, इतर उत्पादकांशी करार करण्याच्या चर्चेनंतर फोर्ड शांत बसली. जॉइंट वेंचर यशस्वी झाला असता, तर फोर्डच्या मरायमलाई नगर आणि सानंद प्लांटमध्ये उत्पादन दरवर्षी सुमारे 40,000 युनिट्स झाले असते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बहुतेक उत्पादकांचे देशात मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठ संकुचित झाली आहे, ज्यामुळे कारखाने त्यांच्या एकूण क्षमतेपेक्षा कमी काम करीत आहेत.

फोर्ड हिट की फ्लॉप?

महिंद्रासोबत फोर्डनं बनवलेली पहिली कार होती एस्कॉर्ट. ती फार चालली नाही. नंतर आली IKon. त्यानंतर आणखी डझनभर ब्रँड लॉंच केले गेले. त्यातले काही मॉडेल्स ग्राहकांच्या पसंतीला उतरले, काही आपटले. हिट झालेल्यांपैकी फोर्ड फिगो आणि इकोस्पोर्टस अजूनही रस्त्यावर बऱ्यापैकी दिसतात. पण गेल्या पंचवीस वर्षातलं फोर्डचं गणित मांडायचं तर बहुतांश ब्रँड फ्लॉप गेले. भारतीय बाजारात स्वत:ची जागा निर्माण करण्यात अपयशी ठरले. गेल्यावर्षीचेच काही आकडे बघा. फोर्डला फक्त 48 हजार गाड्या विकता आल्या. चालूवर्षीही फार काही कमाल नाही करता आली. आतापर्यंत फक्त 16 हजाराच्या आसपास गाड्या विकल्या गेल्यात. हा आकडा एकूण मार्केटच्या फक्त 1.84 टक्के इतका आहे. फोर्डच्या तुलनेत अगदी वर्ष दोन वर्षापुर्वी भारतात आलेल्या कंपन्यांच्या गाड्यांची विक्री जास्त आहे. उदाहरणच घ्यायचं तर कियाचं बघा. कियानं 75 हजार गाड्या विकल्यात. सध्या तर कियाचीच सर्वाधिक हवा आहे. त्यामुळेच विक्री नाही म्हणजे तोटा वाढणारच. फोर्डचा गेल्या दहा वर्षातला तोटा आहे 14 हजार कोटी. असं नाही की फोर्डनं स्वत:ला तोट्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मोदींच्याच गुजरातमध्ये 2011 साली फोर्डनं सानंदला नवा प्लांट सुरु केला. काही लाख डॉलर्सची गुंतवणूक केली. पण सगळं उलटं. फोर्ड उभीच राहू शकली नाही. तोटा वाढत गेला.

फोर्ड कुठे चुकली?

फोर्डची सगळ्यात मोठी चूक कुठली असेल तर ती आहे भारतीय बाजार न कळणं. त्यातही भारतीयांची गाड्यांची मानसिकता न कळणं किंवा कळूनही तिच्याकडे दुर्लक्ष करणं. भारत हा अमेरीका नाही. तिथं ग्राहक गाडीचं इंजिन, त्याची साईज अशा तांत्रिक बाबी जास्त पहातात. भारतीय ग्राहक पैशाचा विचार करतो. किंमत किती आहे, मायलेज किती देते, सेकंडहँड म्हणून विकायची ठरवलं तर कितीला जाणार अशा अनेक गोष्टींचा तो विचार करतो.

जगातील जुन्या कंपन्यांपैकी एक

फोर्ड ही जगातील सर्वात जुन्या वाहननिर्माता कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी दोन महायुद्धांची साक्षीदार राहिली आहे. तब्बल 125 वर्ष जुन्या असलेल्या या कंपनीची सूत्रे अजूनही फोर्ड परिवाराकडेच आहेत.

इतर बातम्या

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी पेपर सोबत बाळगण्याचं आता नो टेन्शन, DigiLocker ला मिळाली मान्यता

Tata चा CNG गाड्यांच्या धडाका, अवघ्या 5 हजारात बूक करा किफायतशीर कार

(important meeting of Ford officials and union held, know what is the company’s opinion on decision to leave India?)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.