घरातील इलेक्ट्रॉनिक ब्रँडमध्ये आता स्वदेशी ‘चिप’ !, इलेक्ट्रॉनिक आणि ऑटो इंडस्ट्रीला सरकारचा दिलासा

सेमीकंडक्टर आणि चिप ही इलेक्ट्रॉनिक वस्तुंमधील प्राण आहे. कोरोना काळात चिपचे उत्पादन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. त्यामुळे कारसह, स्मार्टफोन, वाशिंग मशीन, रेफ्रिजरेटर यांचे उत्पादन लांबणीवर पडले. संपूर्ण इलेक्ट्रॉनिक आणि ऑटो इंडस्ट्रीला त्याचा फटका बसला. पण आता स्वदेशी चिप हा या संकटावर तोडगा काढण्यात आला आहे. 

घरातील इलेक्ट्रॉनिक ब्रँडमध्ये आता स्वदेशी 'चिप' !, इलेक्ट्रॉनिक आणि ऑटो इंडस्ट्रीला सरकारचा दिलासा
home gadgets
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Dec 16, 2021 | 9:40 AM

मुंबई : मेरा देश बदल रहा है, असेच दमदार चित्र सध्या दिसत आहे. समस्या असली की त्वरीत त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार पाऊल टाकतं असल्याने लवकरच भारत चिप आणि सेमीकंडक्टरच्या उत्पादनात स्वंयपूर्ण होईल अशी आशा आहे. सरकारच्या धोरणांचा विचार करता, लवकरच इलेक्ट्रॉनिक आणि कारमध्ये आवश्यक असलेले सेमीकंडक्टर आणि चिपचे उत्पादन देशात सुरु होईल.  देशात सध्या इलेक्ट्रॉनिक(Electronic) आणि ऑटो (Auto) सेक्टरला चिप आणि सेमीकंडक्टरच्या पुरवठ्या अभावी उत्पादनात मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने(Cabinet) चिप मॅन्युफॅक्चरिंग हब (Chip Manufacturing Hub) तयार करण्यासाठी 76 हजार कोटींची योजनेला बुधवारी मंजुरी दिली. या योजनेतून देशात चिप उत्पादन करणा-या कंपन्यांना सबसिडी तर देण्यात येणार आहेतच पण सवलतीही देण्यात येणार आहे. त्यामुळे चिप आणि सेमीकंडक्टर उत्पादनात आत्मनिर्भर भारत(Aatmanirbhar Bharat) पहायला मिळेल.

चिप इंडस्ट्री हब

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, केंद्र सरकार सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्चरिंग इकोसिस्टम (Semiconductor Manufacturing Ecosystem) तयार करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकते. यामध्ये सेमीकंडक्टर वेफर फॅब्रिकेशन युनिट (Semiconductor Wafer Fabrication Unit) या महागड्या प्लँटसाठी उत्पादकांना 25 टक्के सबसिडी देण्याचे प्रस्तावित आहे. तर एसेम्बलिंग (Assembiling), टेस्टिंग (Testing),  पॅकेजिंग (Packaging) आणि चिप डिझाईन (Chip Design) यांच्यासाठीही विशेष सवलती देऊ शकते.

MEITY च्या खाद्यांवर जबाबदारी

ही सेमीकंडक्टर योजना (Semiconductor Policy) देशात चिप मॅन्यूफॅक्चरिंग हब होण्यासाठी मोठे पाऊल मानण्यात येत आहे. मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिल्यानंतर आता भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याला  (MEITY) पुढील जबाबदारी पेलावी लागणार आहे. हे खाते देशात चीप उद्योग (Chip Industry) उभारण्यासाठी गुंतवणुकीसाठी पुढाकार घेईल.

ऑटो सेगमेंटला मोठा फटका

देशातील कार आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन करणा-या कंपन्यांना चिप आणि सेमीकंडक्टरच्या अपु-या पुरवठ्याचा मोठा फटका बसला आहे. या इंडस्ट्रिचं कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे (Corona) जागतिक बाजारपेठेतील उत्पादन करणा-या कंपन्या प्रभावित झाल्याने उत्पादन घडले आहे. जुलै 2022 पर्यंत उत्पादन सुरळीत होण्याची शक्यता आहे. भारतीय इलेक्ट्रॉनिक आणि ऑटो हब साठी केंद्राने घेतलेला हा निर्णय मोठा दिलासादायक असेल.

संबंंधीत बातम्या :

नवीन वर्षात Toyota च्या गाड्या महागणार, Fortuner आणि Innova Crysta चा समावेश

Tesla च्या भारतात 7 ईव्ही लाँच होणार, केंद्र सरकारची मंजुरी, जाणून घ्या लाँचिंग कधी

13 लाखांची Mahindra Scorpio अवघ्या 3.8 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें