जीप कमांडर 7 सीटर SUV लाँच, 19 इंच टायर्ससह जबरदस्त फीचर्स

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 27, 2021 | 3:47 PM

जीप (Jeep) कंपनीने अखेर अधिकृतपणे जीप कमांडर लाँच केली आहे. ही थ्री रो एसयूव्ही दक्षिण अमेरिकन बाजारात कंपासवर आधारित आहे.

जीप कमांडर 7 सीटर SUV लाँच, 19 इंच टायर्ससह जबरदस्त फीचर्स

मुंबई : जीप (Jeep) कंपनीने अखेर अधिकृतपणे जीप कमांडर लाँच केली आहे. ही थ्री रो एसयूव्ही दक्षिण अमेरिकन बाजारात कंपासवर आधारित आहे. जीप कमांडर पूर्णपणे कारमेकरच्या Pernambuco च्या फॅसिलिटी सेंटरमध्ये बनवण्यात आली आहे, जी ब्राझीलमध्ये उपलब्ध आहे आणि त्याच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ज्यावर कंपास, Renegade आणि इतर जीप मॉडेल्स तयार करण्यात आले आहेत. (Jeep Commander 7 seater SUV officially launched, will enter in India soon)

जीप कमांडर एसयूव्ही लवकरच भारतात देखील लॉन्च केली जाईल. तथापि, कार निर्मात्या कंपनीने लाँचिंग टाइमलाइन शेअर केलेली नाही. अशा स्थितीत कंपनी ही कार पुढच्या वर्षीच लॉन्च करु शकते. ही कार जेव्हा भारतात लॉन्च होईल तेव्हा तिचे नाव मेरिडियन (Meridian) असे असेल. लाँचिंगनंतर ही कार आगामी फोक्सवॅगन टायगुन, एमजी ग्लॉस्टर आणि इतर गाड्यांशी स्पर्धा करेल.

दक्षिण अमेरिकन बाजारांसाठी, जीप कमांडर एसयूव्ही लिमिटेड आणि ओव्हरलँड अशा दोन ट्रिममध्ये ऑफर केली जाते. जिथे 4X2 व्हील ड्राइव्ह सिस्टम लिमिटेड व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे तर 4X4 मोड ओव्हरलँडमध्ये उपलब्ध आहे. जीप कमांडर एसयूव्ही आकाराच्या दृष्टीने मोठी आहे. त्याची लांबी 4769 मिमी आहे, तर ती कंपासपेक्षा 36 सेमी लांब आहे. याची रुंदी 1859 मिमी, उंची 1682 मिमी आणि 2794 मिमी चा व्हीलबेस आहे.

गाडीमधील फीचर्स

कमांडरच्या बाहेरील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे जीप डिझाईन, ज्यामध्ये ग्रिलवर 7 स्लॅट्स फ्लँक्ड आहे. आपल्याला या वाहनामध्ये 18 इंचांची चाके मिळतात, परंतु ओव्हरलँड व्हेरिएंटमध्ये तीच चाके अपग्रेड करण्यात आली आहेत. या व्हेरिएंटमध्ये 19 इंचांची चाके मिळतील. कमांडरचे इंटीरियरदेखील मजबूत आहे आणि ते कंपास एसयूव्हीसारखे आहे. यामध्ये तुम्हाला 10.1 इंच फुल एचडी वाइड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. या व्यतिरिक्त, तुम्ही 10.25-इंच पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा देखील लाभ घेऊ शकता. वाहन 9 हर्मन कार्डन स्पीकर्ससह सुसज्ज आहे जे 450watts क्षमतेसह येते. ओव्हरलँड व्हेरिएंट अलेक्सा व्हर्च्युअल असिस्टंटसह येते.

इंजिन ऑप्शन

आपल्याला जीप कमांडरमध्ये मोठी बूट स्पेस मिळते जी 233 लीटर पर्यंत होल्ड करु शकते. तथापि, आपण थर्ड रो सीट फोल्ड करून ते 661 लीटर स्पेस वाढवू शकता. यामध्ये तुम्हाला दोन इंजिन पर्याय मिळतात. लिमिटेड आणि ओव्हरलँड दोन्ही प्रकार 1.3-लीटर टर्बो फायरफ्लाय पेट्रोल इंजिनद्वारे संचालित आहेत जे 185 एचपी पॉवर आणि 270 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

कमांडर एसयूव्ही 7 एअरबॅगसह येते. यामध्ये तुम्हाला प्रगत चालक सहाय्य प्रणाली (अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टिम) मिळते. लिस्टमध्ये अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, कोलिजन अलर्ट, ब्लाइंड स्पॉट आणि क्रॉस ट्रॅफिक डिटेक्टर, शिफ्ट अलर्ट लेन, इमर्जन्सी ब्रेकिंग, लायसन्स रिकग्निशन, ऑटोमॅटिक हाय बीम आणि पार्क असिस्ट यांचा समावेश आहे.

इतर बातम्या

Honda ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 130 किलोमीटर रेंज

देशातील 400 शहरांमध्ये OLA 1 लाख इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरु करणार

Simple One इलेक्ट्रिक स्कूटरला अवघ्या 4 दिवसात 30,000 बुकिंग्स, 1947 रुपये देऊन तुम्हीही करु शकता बुक

(Jeep Commander 7 seater SUV officially launched, will enter in India soon)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI