स्मार्टफोन व्यवसाय ठप्प, ‘या’ कंपनीची इलेक्ट्रिक व्हेईकल सेक्टरमध्ये एंट्री, जाणून घ्या कंपनीचा प्लॅन

स्मार्टफोन व्यवसायात सातत्याने नुकसान होत असल्याने अलीकडेच एलजी इलेक्ट्रॉनिक्सने आपला स्मार्टफोन व्यवसाय बंद केला आहे.

स्मार्टफोन व्यवसाय ठप्प, 'या' कंपनीची इलेक्ट्रिक व्हेईकल सेक्टरमध्ये एंट्री, जाणून घ्या कंपनीचा प्लॅन
LG Electronics

मुंबई : जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (LG Electronic entering in electric vehicle sector, setting up charging solutions)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, स्मार्टफोन बनवणारी कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स (LG Electronics) आता इलेक्ट्रिक वाहनं बनवण्याच्या तयारीत आहे.

स्मार्टफोन व्यवसायात सातत्याने नुकसान होत असल्याने अलीकडेच एलजी इलेक्ट्रॉनिक्सने (LG Electronics) आपला स्मार्टफोन व्यवसाय बंद केला आहे. दक्षिण कोरियाची ही दिग्गज टेक्नोलॉजी कंपनी आता मोबिलिटी क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याकडे लक्ष देत आहे. यासह कंपनीने आज इलेक्ट्रिक स्कूटरसाठी वायरलेस चार्जिंग सोल्यूशन सादर केले आहेत.

चार्जिंग स्टेशनची स्थापना

एलजीने (LG) म्हटले आहे की, त्यांनी स्थानिक इलेक्ट्रिक स्कूटर शेयरिंग सेवा प्रदाता किकगोइंग यांच्यासह भागीदारी करत सोलच्या पश्चिमेकडील बुकियन येथे इलेक्ट्रिक स्कूटर वायरलेस चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यात आले आहेत. दोन्ही कंपन्या सोल आणि इतर भागात विस्तार करण्यापूर्वी पुढील सहा महिन्यांकरिता इलेक्ट्रिक स्कूटर वायरलेस चार्जिंग सोल्यूशन्सच्या उपयोगिता आणि सुरक्षिततेची पुष्टी करतील.

20 वायरलेस चार्जिंग किकस्पॉट्स

योनहाप या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एलजीने सांगितले आहे की, बुकियनमधील पाच पार्किंग क्षेत्रात सध्या 20 वायरलेस चार्जिंग किकस्पॉट्स उपलब्ध आहेत आणि ते वायरलेस चार्जिंग रिसीव्हर पॅडसह स्थापित आहेत.

चार्जिंग स्टेशनवर स्कूटर चार्ज केल्यास कॅशबॅक मिळणार

दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर शेयरिंग सेवांमध्ये कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि अधिक वापरकर्त्यांना जोडण्यासाठी नवीनतम उपायांची चाचणी करत आहे. जे लोक त्यांच्या स्कूटरला वायरलेस चार्जिंग स्टेशनवर आणतील त्यांना रोख सवलत किंवा विशेष सवलत देण्याची त्यांची योजना आहे.

इतर बातम्या

सिंगल चार्जमध्ये 312KM रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक कारची भारतात रेकॉर्डब्रेक विक्री

आधी पार्किंगची जागा दाखवा मगच कार खरेदी करा; सरकारची New Parking Policy

सिंगल चार्जमध्ये 150KM धावणार, तुफान मागणीमुळे ‘या’ इलेक्ट्रिक बाईकचं बुकिंग थांबवलं

(LG Electronic entering in electric vehicle sector, setting up charging solutions)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI