शेतकऱ्यांना झटका; 1 जानेवारीपासून महिंद्राचे ट्रॅक्टर महागणार!

शेतकऱ्यांना आर्थिक ताण सहन करावी लागणारी एक बातमी आहे. नव्या वर्षापासून महिंद्रा अँड महिंद्राचे ट्रॅक्टर्स महागणार आहेत. (Mahindra & Mahindra to hike prices of its tractors from 1 January)

शेतकऱ्यांना झटका; 1 जानेवारीपासून महिंद्राचे ट्रॅक्टर महागणार!

नवी दिल्ली: शेतकऱ्यांना आर्थिक ताण सहन करावी लागणारी एक बातमी आहे. नव्या वर्षापासून महिंद्रा अँड महिंद्राचे ट्रॅक्टर्स महागणार आहेत. या ट्रॅक्टर्सची किंमत किती महागणार आहे, याची माहिती कंपनीने दिलेली नाही. मात्र, नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या खिशाला झळ पोहोचणार हे नक्की. (Mahindra & Mahindra to hike prices of its tractors from 1 January)

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने पुढच्या महिन्यापासून ट्रॅक्टरची किंमत वाढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. इनपूट कॉस्टच्या प्रभावाला ऑफसेट करण्यासाठी ट्रॅक्टरच्या किंमतीत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2021पासून महिंद्राच्या सर्व ट्रॅक्टर्सच्या किंमती वाढणार आहेत. कमोडिटी किंमतीतील वाढ आणि इतर इनपूट कॉस्ट वाढल्याने ट्रॅक्टर्सच्या किंमती वाढवण्याची गरज निर्माण झाली होती. येत्या काही दिवसात वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमतींची माहिती दिली जाणार आहे. गेल्या आठवड्यात या कंपनीने पुढच्या महिन्यापासून पॅसेंजर आणि कमर्शियल व्हिकलच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. हे वाढलेले भाव सर्व मॉडल्सला लागू होणार असल्याचंही कंपनीने म्हटलं होतं.

कारही महागणार

नव्या वर्षात केवळ ट्रॅक्टरच नव्हे तर वेगवेगळ्या कंपनीच्या कारच्या किंमतीतही वाढ होणार आहे. कार बनविणारी देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी इंडिया, महिंद्रा, रेनॉ, होंडा, एमजी मोटर्स आणि फोर्डनेही कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केलेली आहे. त्याशिवाय हिरो मोटोने बाईकच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. गेल्या आठवड्यात रेनॉ इंडियाने जानेवारीपासून सर्व मॉडलच्या कारच्या किंमतीत 28 हजारापर्यंत वाढ करण्याचे संकेत दिले होते. (Mahindra & Mahindra to hike prices of its tractors from 1 January)

संबंधित बातम्या:

MG Hector Plus 7 Seater ची प्रतीक्षा संपणार, पुढील महिन्यात कार लाँच होण्याची शक्यता

नव्या वर्षात महिंद्रा लाँच करणार पाच एसयूव्ही कार, जाणून घ्या सर्व फिचर्स

पेट्रोल पंपप्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘चार्जिंग’ स्टेशन उघडणार, चार्जिंगसाठी येणार ‘इतका’ खर्च!

(Mahindra & Mahindra to hike prices of its tractors from 1 January)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI