नव्या वर्षात महिंद्रा लाँच करणार पाच एसयूव्ही कार, जाणून घ्या सर्व फिचर्स

महिंद्रा थारला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानं कंपनी आणखी SUV लाँच करु शकते. Mahindra planning to launch five SUV

नव्या वर्षात महिंद्रा लाँच करणार पाच एसयूव्ही कार, जाणून घ्या सर्व फिचर्स
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 8:30 PM

नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेतील महिंद्रा या आघाडीच्या वाहननिर्मिती कंपनीने काही महिन्यांपूर्वी महिंद्रा थार 2020 ही SUV लाँच केली होती. महिंद्रा थारला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानं कंपनी आणखी SUV लाँच करु शकते. यामध्ये New XUV500, New Scorpio, XUV300 electric, KUV 100 Electric, TUV300 आणि TUV300 Plus ही मॉडेल्स समाविष्ट असतील. या एसयूव्हीमध्ये मध्यम ते उच्च किमतींच्या रेंजमधील एसयूव्ही उपलब्ध असतील. महिंद्राकडून यासोबत दोन इलेक्ट्रीक बाईक लाँच केल्या जाणार आहेत. (Mahindra and Mahindra planning to launch five SUV cars in next year)

नव्या वर्षात महिंद्रा EKUV100 ही कार विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. महिंद्राने EKUV100 कार 8.25 लाख रुपयांना लाँच केले होते. ही कार भारतातील सर्वात कमी किमतीची इलेक्ट्रिक कार आहे. फेब्रुवारी 2021 पासून या कारची डिलिवरी सुरु होणार आहे. या कारमध्ये 40kW इलेक्ट्रिक मोटारसह 15.9kWhची लिथियम आयन बॅटरी असणार आहे. एकावेळी चार्ज केल्यानंतर ही कार 150 किलोमीटर जाऊ शकते..

2021 मध्ये लाँच होणाऱ्या महिंद्राच्या इतर गाड्या

New Mahindra XUV500 महिंद्राची New Mahindra XUV500 ही कार Mahindra XUV500 चे अपग्रेडेड मॉडेल असेल. याचा new front-wheel-drive monocoque प्लैटफॉर्मवर आधारित असेल. ही मध्यम स्वरुपातील एसयूवी असून 6 ते 7 प्रवासी आसनांसह या कारला लाँच केले जाणार आहे. याशिवाय फर्स्ट ADAS (अडवांस्ड ड्राइवर असिस्टंस सिस्टीम) फीचर्स देखील असणार आहे. या कारमध्ये 2.0L turbocharged पेट्रोल आणि 2.2 लीटर टर्बोचार्ज्ड डीजल इंजिन असेल. याची किंमत12 ते 18 लाख रुपयांच्या दरम्यान असेल.

New Scorpio महिंद्रा स्कॉर्पियोचे नेक्स्ट जनरेशन New Scorpio ही गाडी ZEN3 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नव्या महिंद्रा स्कॉर्पियोच्या नव्या डिझाईनमध्ये, ज्यादा जागा, नवा इंटेरियर लूक आणि लांब व्हीलबेसच्या सह लाँच केले जाणार आहे. या कारमध्ये 2.2 लीटर टर्बोचार्ज्ड डीझेल आणि 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमेटिक ट्रांन्समिशन सुविधा उपलब्ध असेल. स्कॉर्पिओची किंमत 10 लाख ते16 लाख रुपयांपर्यंत असू शकेल. (Mahindra and Mahindra planning to launch five SUV cars in next year)

Mahindra XUV300 Electric महिंद्रा कंपनीने Mahindra XUV300 Electric या मॉडेलच्या कारला ऑटो एक्सपोमध्ये प्रेझेंट केले होते. येत्या वर्षात कंपनी या कारला लॉन्च करण्याच्या नियोजनात आहे. एसयूव्हीमध्ये 40kWh (स्टॅडंर्ड) और 60kWh (लॉन्ग रेंज) बॅटरी ऑप्शनसह लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 370 ते 450 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. याची किंमत 15 लाख ते 29 लाख रुपयापर्यंत असेल.

TUV300 आणि TUV300 PLUS Facelift कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीला TUV300 चे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय TUV300 Plus कार देखील लाँच केली जाणार आहे. यामध्ये बीएस 6 कंप्लायंट 1.5 लीटरचे 3 सिलिंडर टर्बो डीजल इंजिन असेल, ते 100bhp च्या क्षमतेचे आणि 240Nm का टॉर्क जेनरेट करु शकेल यामध्ये 5 स्पीड गियरबॉक्स देण्यात आलेय.

संबंधित बातम्या:

किआ कंपनीचा नवा विक्रम; भारतात इतक्या कार्सची विक्री

अरेरे! 1 जानेवारीपासून महिंद्राच्या गाड्यांची किंमत वाढणार; जाणून घ्या कारण

(Mahindra and Mahindra planning to launch five SUV cars in next year)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.