ही तीच गाडी तर नाही ना…! Maruti Jimny चं हुबेहुब मॉडेल चीनमध्ये तयार, भारतातही होणार लाँच
Maruti Jimny Copy : मारुती जिम्नी गाडीची गेल्या काही दिवसापासून भारतात जोरदार चर्चा आहे. कंपनीनं या गाडीचं बुकिंग सुरु केलं आहे. पण तत्पूर्वी ही गाडी चीनच्या रस्त्यावर दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबई : मारुती जिम्नीची गाडीचं नाव तर तुम्ही गेल्या काही दिवसात ऐकलं असेलच. कंपनीच्या पहिल्या एसयुव्हीबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पण या गाडीसारखंच हुबेहुब मॉडेल चीनमध्ये नुकतंच स्पॉट गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चीनी कंपनीने जिम्नीसारखं हुबेहुब मॉडेल तयार केलं आहे. या गाडीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, मारुती जिम्नी तर नाही ना? पण ही गाडी मारुती जिम्नी नसून चीनी कंपनीनं तसंच दिसणार मॉडेल तयार केलं आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय आहे ते…
जिम्नीसारखं दिसणार मॉडेल अधिकृतरित्या शांघाईच्या ऑटो शो 2023 मध्ये सादर केलं जाणार आहे. या गाडीचं नाव Baojun Yep असं असणार आहे. हे इलेक्ट्रिक मॉडेल असेल. एसयूव्ही भारतात एमजी येप नावाने लाँच केली जाईल, असं सांगण्यात येत आहे.
MG Yep SUV ची साईज आणि डिजाईन
मारुति जिम्नीची कॉपी असलेल्या या गाडीची लांबी 3381 मीमी, रुंदी 1685 मीमी आणि उंची 1721 मीमी असणार आहे. या गाडीचा व्हीलबेस 2110 मीमी असेल. ही गाडी कॉमेट ईव्हीच्या तुलनेत 100 मीमी लांब असेल.

Baojun Yep SUV (PS: social media)
डिझाईनच्या बाबतीत म्हणायचं तर ही गाडी बघता क्षणीत तुम्हाला जिम्नी डोळ्यासमोर येईल. पण यात सर्वकाही रेट्रो स्टाईल असेल. या गाडी स्टाईल आणि इंटिरियर चायना मॉडेल सारखं केलं गेलं आहे.
MG Yep SUV चं इंजिन
या एसयुव्हीचं इंडियन मॉडेल सध्यातरी सिंगल मोटर सेटअपसह येईल. नंतर 4 डब्ल्यूडी ड्युअल मोटरसह सादर केली जाऊ शकते. यात लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरीचा वापर केला जाईल. ही मोटर 68 बीएचपी पॉवर आणि 140 एनएम टॉर्क जनरेट करू शकते.
ही बॅटरी एकदा फुल चार्ज केली की, 300 किलोमीटरपर्यंत रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे. या गाडीचा टॉप स्पीड 100 किमी प्रति तास इतका आहे.
भारतात MG Yep SUV कधी लाँच होणार
भारतात इलेक्ट्रिक एसयुव्ही वर्ष 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. लाँच झाल्यानंतर ही गाडी सिट्रॉन ई सी 3 शी स्पर्धा करेल.
