टोकियो पॅरालिम्पिक विजेत्या भाविना पटेलला MG Motor कडून कस्टमाइज्ड एसयूव्ही MG Hector भेट

एमजी मोटर इंडियाने दि वडोदरा मॅरेथॉन यांच्यासोबत सहयोगाने टोकियो पॅरालिम्पिक्स 2020 मधील रौप्य पदक विजेत्या भाविना पटेल हिला कस्टमाइज्ड एमजी हेक्टर भेट म्हणून दिली.

टोकियो पॅरालिम्पिक विजेत्या भाविना पटेलला MG Motor कडून कस्टमाइज्ड एसयूव्ही MG Hector भेट
Bhavina Patel
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 5:45 PM

मुंबई : एमजी मोटर इंडियाने दि वडोदरा मॅरेथॉन यांच्यासोबत सहयोगाने टोकियो पॅरालिम्पिक्स 2020 मधील रौप्य पदक विजेत्या भाविना पटेल हिला कस्टमाइज्ड एमजी हेक्टर भेट म्हणून दिली. भारताची पहिली इंटरनेट-कनेक्टेड एसयूव्ही हेक्टर भारतीय पॅरा-अॅथलीटसाठी कस्टमाइज्ड करण्यात आली आहे. (MG Motor presents personalized Hector SUV to Paralympics medalist Bhavina Patel)

ही एसयूव्ही अॅक्सेलरेटर व ब्रेक्सना ऑपरेट करण्यासाठी हाताने नियंत्रित करता येणारे लेव्हर असे सेफ्टी फीचर्स, तसेच उत्तमरित्या डिझाइन केलेल्या व्हीलचेअर अटॅचमेंट्ससह शानदार ड्रायव्हिंग एक्स्पीरियन्स देण्यासाठी रिडिझाइन करण्यात आली आहे. या व्हेईकलमध्ये प्रभावी ड्राइव्हसाठी सुपर-स्मार्ट डीसीटी ट्रान्समिशन आणि स्टार्ट/स्टॉप बटन देखील आहे. एमजी मोटर इंडियाचे चीफ टेक्निकल ऑफिसर जयंत देब यांच्या हस्ते भाविना पटेल हिला कस्टमाइज्ड हेक्टर सुपूर्द करण्यात आली.

ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या भाविना पटेल म्हणाली की, “मी एमजी मोटर व वडोदरा मॅरेथॉन यांच्या या गेस्चरचे कौतुक करते. मला ही पूर्णत: कस्टमाइज्ड हेक्टर माझ्या मालकीची असण्याचा खूप आनंद होत आहे. ही आकर्षक व्हेईकल आपल्या गतीशीलता परिसंस्थेमधील अग्रणी नवोन्मेष्कार आहे. मी ड्रायव्हिंग सीटवर बसून या व्हेईकलची क्षमता अनुभवण्यास खूपच उत्सुक आहे. गतीशीलतेसह ही आकर्षक कार मला स्वावलंबीपणा व सक्षमीकरणाची भावना देते.”

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “एमजीआय विविधता व सर्वसमावेशकतेला प्राधान्य देते आणि ते आमच्या ब्रॅण्ड आधारस्तंभांचे भाग देखील आहेत. एमजीमध्ये आम्ही वुमेन्टोरशीप व ड्राइव्हहरबॅक यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच महिलांना प्रोत्साहित करण्यासोबत पाठिंबा देतो. आज आम्हाला टोकियोमध्ये देशाचे नावलौकिक मोठा केलेल्या भाविना हिच्यासाठी आमची एमजी हेक्टर कस्टमाइज्ड करण्याबाबत सन्माननीय वाटत आहे. यासह आम्ही त्यांचे धैर्य व निर्धाराला सलाम करतो. त्यांनी सर्व विषमतेवर मात करत संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. महिला सक्षमीकरणाप्रती त्यांचे योगदान अद्वितीय आहे. आम्ही आशा करतो की, त्या आमच्या प्रशंसनीय भेटीचा आनंद घेतील.”

वडोदरा मॅरेथॉनच्या अध्यक्ष तेजल अमीन म्हणाल्या, “आम्ही नेहमीच आमच्या अॅथलीट्सचे फिटनेस व स्वास्थ्याला प्राधान्य देत आलो आहोत. आमचा अॅथलीट्सचे उत्तम पोषण करण्यावर दृढ विश्वास आहे, ज्यामुळे त्यांना त्यांची ध्येये संपादित करण्यामध्ये मदत होते. आम्हाला आनंद होत आहे की, भाविना पटेल यांना एमजी मोटरची कस्टमाइज्ड व्हेईकल भेट देण्यात आली आहे.”

इतर बातम्या

Ola S1 ते Hero Electric Optima, 1 लाखाहून कमी किंमतीत 4 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

Honda Brio ते Maruti Swift Dzire, 3 लाखांहून कमी किंमतीत 5 टॉप क्लास कार खरेदीची संधी

Audi Q7 | 2022 ऑडी Q7 चे उत्पादन भारतात सुरू, दमदार फिचर्स, सुपर लूक, जाणून घ्या बहूचर्चित ऑडी Q7बद्द्ल सर्व काही

(MG Motor presents personalized Hector SUV to Paralympics medalist Bhavina Patel)

Non Stop LIVE Update
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका.
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?.
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय.