MG Motors ची नवी इलेक्ट्रिक कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. इलेक्ट्रिक वाहन कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या कार/बाईक लाँच करत आहेत.

MG Motors ची नवी इलेक्ट्रिक कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
MG ZS EV
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 7:43 PM

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (MG motor wiill launch new electric vehicle under 20 lakhs in next 2 years)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, वाहन निर्माता कंपनी एमजी मोटर येत्या दोन वर्षात भारतात त्यांची बॅटरीवर चालणारी दुसरी इलेक्ट्रिक कार (ईव्ही) लाँच करणार आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या ई-वाहनाची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. हे मॉडेल कंपनीचे दुसरे ई-वाहन असेल. इलेक्ट्रिक व्हेइकल सेगमेंटमध्ये एमजीची ZS ईव्ही आधीपासूनच भारतात ग्राहकांची चांगली पसंती मिळवत आहे, या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 21 से 24.18 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले की, “आम्ही आतापर्यंत आमच्या ईव्ही उत्पादनांच्या कामगिरीवर खूष आहोत. भविष्यात अधिक इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याचा आमचा मानस आहे. आमच्या दुसर्‍या ईव्ही कारची किंमत 20 लाखांपेक्षा कमी असेल, अशी अपेक्षा आहे.

कशी आहे नवी MG ZS EV 2021 फेसलिफ्ट?

MG Motors ने त्यांची फेब्रुवारी महिन्यात MG ZS EV 2021 फेसलिफ्ट 2021 ही कार अधिकृतपणे भारतात लाँच केली. या गाडीची सुरुवातीची किंमत 20.99 लाख (एक्स शोरूम) रुपये इतकी आहे. पूर्णपणे बॅटरीवर चालणारी ही कार कंपनीने 2020 च्या जानेवारीमध्ये लाँच केली होती. परंतु कंपनीने याच कारचं लेटेस्ट वर्जन लाँच केलं आहे. जुन्या कारच्या तुलनेत ही कार अपग्रेड करण्यात आली आहे. या कारमध्ये 44.5 kWh क्षमतेची हायटेक बॅटरी देण्यात आली आहे, जी 400 किमीपर्यंतची रेंज देते.

एमजी मोटर्स कंपनीने म्हटलं आहे की, ही बॅटरी प्रत्येक ऋतूमध्ये, वेगवेगळ्या तापमानांमध्ये तपासून पाहिली आहे. कंपनीला विश्वास आहे की, ही कार 300 ते 400 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. परंतु ही गोष्ट तुम्ही ती कार कुठे आणि कशी चालवताय? यावर अवलंबून आहे. या बॅटरीसह ही कार 8.5 सेकंदांमध्ये 100 किमी प्रति तास इतका वेग पकडू शकते आणि 143 PS देते.

दमदार फीचर्स

ZS EV ही कार दोन वेरिएंट्समध्ये सादर केली जाणार आहे. एक्साइट आणि एक्सक्लूसिव्ह अशी या वेरिएंट्सची नावं आहेत. या कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 8 इंचांची इन्फोटेन्मेंट स्क्रीन, 6 एयरबॅग्स आणि फ्रंट ग्रिलवर ग्लो लोगो असे नेहमीचे फीचर्स देण्यात आले आहेत. सोबतच एक्सक्लूसिव्ह वेरिएंटमध्ये डुअल-पॅन पॅनोरमिक सनरूफ, लेदर सीट, पॉवर फोल्डेबल ORVM, रेन सेन्सिंग वायपर्स, सिक्स वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायवर सीट आणि i-स्मार्ट ईव्ही 2.0 कनेक्टेड कार फीचर्स दिले आहेत. एक्सक्लूसिव्ह वेरिएंटची किंमत 24.18 लाख रुपये इतकी आहे.

अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी

एमजी कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांनी चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर एक्सपँड करणं सुरु ठेवलं आहे. तसेच प्रत्येक ZS EV युनिटसह ग्राहकांना वॉल चार्जिंग युनिट दिलं जाणार आहे. कंपनी या बॅटरी पॅकवर 8 वर्षांची वॉरंटी देत आहे. सोबतच कंपनीने 5 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी किंवा 1.50 लाख किलोमीटरची ऑफर दिली आहे. यासह कंपनीने पाच मोफत लेबर सर्विस, 5 रोड साइड असिस्टन्स आणि 5 वें चार्जिंगची सुविधा दिली आहे. कंपनी भारतातील 31 शहरांमध्ये त्यांच्या EV वाढवण्याची तयारी करत आहे.

सध्याच्या MG ZS EV मधील फीचर्स

ही कार दोन ट्रिम्स ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये Excite आणि Exclusive चा समावेश आहे. MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी 150 PS पॉवर आणि 353 Nm टॉर्क जनरेट करते. SUV एकदा चार्ज केल्यानंतर 340 किमीपर्यंत अंतर धावू शकते. MG ने म्हटलंय की, ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज करु शकता. 50 kW DC फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी चार्ज केली तर 80 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 50 मिनिटं पुरेशी आहेत. सुरक्षेसाठी या गाडीत 6 एयरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.

हेही वाचा

Ola इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, कंपनीच्या संस्थापकांनी विचारलं तुम्हाला कोणता रंग हवा आहे?

अवघ्या 1.5 युनिट वीजेवर चार्ज होणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर 20000 रुपयांचा डिस्काऊंट

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक दुचाकी 28 हजार रुपयांनी स्वस्त

Hayabusa बाईकसारखा लूक आणि दमदार फीचर्स, तब्बल 400Kmph वेगाने धावणारी इलेक्ट्रिक बाईक बाजारात

(MG motor wiill launch new electric vehicle under 20 lakhs in next 2 years)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.