कमी किंमत आणि दमदार फीचर्ससह Bajaj CT110X भारतात लाँच

अक्षय चोरगे

|

Updated on: Apr 15, 2021 | 5:27 PM

बजाज ऑटोने (Bajaj Auto) गुरुवारी भारतीय बाजारात CT110X ही नवी बाईक लाँच केली आहे. या बाईकमध्य दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

कमी किंमत आणि दमदार फीचर्ससह Bajaj CT110X भारतात लाँच
Bajaj CT110X

मुंबई : बजाज ऑटोने (Bajaj Auto) गुरुवारी भारतीय बाजारात CT110X ही नवी बाईक लाँच केली आहे. नवीन CT110X हे एक टॉप व्हेरिएंट असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. या बाईकची किंमत 55,494 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या बाईकमध्ये ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासासाठी या बाईकमध्ये मोटो क्रॅश गार्ड्स आणि मोल्डेड फुटहोल्ड्स देण्यात आले आहेत. (New Bajaj CT110X launched in India)

या दुचाकीमध्ये सर्वात मोठं अपग्रेड म्हणजे रियर कॅरियर, जे 7 किलोग्रामपर्यंतचं वजन उचलू शकतं. या व्यतिरिक्त तुम्हाला ड्युअल टेक्स्चर आणि ड्युअल स्टिच फिनिश सीट, सेमी नॉबी टायर, सेमी डबल क्रॅडल फ्रेम मिळेल. लाँचिंगच्या वेळी बजाज ऑटोचे अध्यक्ष सारंग कानडे म्हणाले की, CT110X च्या रुपात आम्ही ग्राहकांना एक असं प्रोडक्ट देत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर फीचर्स मिळतील.

कानडे म्हणाले की, ही बाईक तुम्हाला आरामदायक राईड आणि जबरदस्त मायलेज देईल. सीटी ब्रँडमध्ये आम्ही अजून काही बदल करणार आहोत. आम्हाला खात्री आहे की येत्या काळात आम्ही ग्राहकांना या बाईकमध्ये अधिक अपग्रेड्स देऊ.

दमदार इंजिन

मेकॅनिकल शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास, या बाईकमध्ये 115 सीसी डीटीएस-आय इंजिन देण्यात आलं आहे जे 7500rpm वर 6.33kW मॅक्सिमम पॉवर जनरेट करु शकतं आणि 5000rpm वर 9.81 Nm पीक टार्क देईल. ही बाईक 5 स्पीड गिअरबॉक्ससह सादर करण्यात आली आहे. त्याच वेळी, त्यामध्ये सेमी-नॉबी टायर्स आणि 170 मिमी ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आला आहेत.

बजाजकडून वाहनांच्या किंमतीत वाढ

बजाज कंपनी एकीकडे नवीन बाईक बाजारात आणत असताना, दुसऱ्या बाजूला जुन्या बाइक्सच्या किंमती वाढवत आहे. जानेवारी महिन्यात बजाज डॉमिनर 400 ची किंमत वाढविण्यात आली होती. या बाईकची किंमत 1,99,755 रुपये होती. पण आता बजाज ऑटोने पुन्हा एकदा या बाईकची किंमत वाढवली आहे. आता या बाईकची किंमत 2,02,755 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीने या बाईकच्या किंमतीत 3000 रुपयांची वाढ केली आहे.

इतर बातम्या

अवघ्या 36 हजारात खरेदी करा 1 लाखाची Bajaj Pulsar 150

Royal Enfield प्रेमींसाठी वाईट बातमी, बुलेटसह ‘या’ बाईक्स 13000 रुपयांनी महागल्या

दमदार पावरसह सुझुकी हयाबुसा पुन्हा एकदा बाजारात, लॉन्च होण्यापूर्वी कंपनीच्या वेबसाइटवर लिस्टेड

(New Bajaj CT110X launched in India)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI