AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Activa – E ला टक्कर देण्यासाठी Ather – E स्कूटरचे नवीन मॉडेल्स बाजारात दाखल, किंमत काय?

एथर कंपनीने नव्या वर्षात ग्राहकांसाठी Ather 450 Series लाँच केली आहे, चला जाणून घेऊया या नवीन सीरीजची वैशिष्ट्ये आणि किंमत नेमकी किती आहे?

Activa - E ला टक्कर देण्यासाठी Ather - E स्कूटरचे नवीन मॉडेल्स बाजारात दाखल, किंमत काय?
| Updated on: Jan 04, 2025 | 4:49 PM
Share

एथर एनर्जी कंपनीने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांसाठी नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केल्या आहेत. एथर कंपनीच्या या नव्या स्कूटरचे नाव एथर – ४५० असे आहे. या स्कूटरच्या नवीन मॉडेल्समध्ये नवीन फिचर्स आणि इम्प्रुव्ह ड्रायव्हींग रेंज आहे.लाँच झाल्यानंतर लागलीच एथरच्या इलेक्ट्रीक स्कूटरची नोंदणी सुरु झाली आहे. या एथरने या नवीन ई-स्कूटर Activa E स्कूटरला टक्कर देण्यासाठी बाजारात दाखल केल्या आहेत. काय आहेत या ई-स्कूटरची वैशिष्ट्ये आणि किंमत पाहूयात…..

एथर ४५० या नव्या मालिकेतील ई-स्कूटरमधील 450X आणि 450 Apex ही मॉडेल्स आता ग्राहकांना ट्रॅक्शन कंट्रोल आणि रेन, रोड अशा तीन ड्रायव्हिंग मोडसह उपलब्ध होणार आहेत. याशिवाय एक्स मॉडेल्समध्ये मॅजिक ट्विस्ट फिचर देखील देण्यात आले आहे. एथर ४५० व्हेरिएंटमध्ये कंपनीची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.नविन ऑपरेटिंग सिस्टीमसह या व्हेरिएंटमध्ये गुगल मॅप्स, ऐलेक्सा आणि व्हॉट्सअप्स नोटिफिकेशन डिस्प्ले देण्यात आला आहे.

2025 Ather 450 ची भारतात किंमत काय ?

Ather 450S एथर इलेक्ट्रीक मॉडेल्सची किंमत १.३० लाख आहे,  450X (2.9 kWh) व्हेरिएंटची किंमत १.४७ लाख , तर 450X (3.7 kWh) व्हेरिएंटची किंमत १.५७ लाख आणि 450 Apex मॉडेल्सची किंमत २ लाख रुपये आहे. या किंमती एक्स शोरुम किंमती आहे.

Ather 450s Range

एथर एनर्जीने ४५० सिरिजच्या या लेटेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर्सला २.९ kWh आणि ३.७ kWh बॅटरी ऑप्शनसह उतरविले आहे. ४५० एस व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना सिंगल २.९ kWh बॅटरी क्षमतेमध्ये मिळणार आहे. त्यास एकदा फूल चार्ज केले तर १०५ किमीपर्यंत रेंज मिळणार आहे. ३७५ वॅट चार्जरच्या मदतीने ही स्कूटर सात तास ४५ मिनिटांत ० ते १०० टक्क्यांपर्यंत फूल चार्जिंग देणार आहे.

Ather 450x Range

या स्कूटरमध्ये २.९ kWh आणि ३.७ kWh बॅटरी ऑप्शन देण्यात आलेले आहे. जे स्मार्ट इको मोडमध्ये अनुक्रमे १०५ किमी आणि १३० किमीपर्यंत रेंज देते. ७०० वॅटच्या चार्जरच्या मदतीने २.९ kWh क्षमतेच्या बॅटरीला फूल चार्जिंगचा सपोर्ट असल्याने ४ तास ३० मिनिटात चार्ज होते. ३.७ kWh क्षमतेच्या बॅटरीला फूल चार्जमध्ये ५ तास ४५ मिनिटांचा वेळ लागतो.

Ather 450 Apex Range

एथर ४५० चा मालिकेतील ही स्कूटर सर्वात महाग आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने ३.७ kWh बॅटरी सपोर्ट दिला आहे. ही बॅटरी सिंगल चार्जिंगमध्ये बॅटरी १३० किमीपर्यंत रेंज देते. Ather ४५० सिरीजची सर्वात महागडी स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने ३.७ kWh बॅटरी दिलेली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जमध्ये ही बॅटरी सिंगल चार्जिंगमध्ये १३० किलोमीटर पर्यंत रेंज देते. ४५० सीरीज रेंजच्या या स्कूटरची बॅटरीला फूल चार्ज करण्यासाठी एकूण ५.४५ तास लागतात.

Ather 450 मालिकेची कोणाशी टक्कर ?

होंडाची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर होंडा एक्टीव्हा ईलेक्ट्रीकला टक्कर देण्यासाठी एथर ४५० मालिका बाजारात आली आहे. सध्या होंडा एक्टिव्हाची बुकींग सुरु झाली आहे. पुढील महिन्यापासून स्कूटरच्या किंमत किती असणार याचा खुलासा होणार आहे. एथरची नवीन मालिका  होंडा एक्टीव्हा इलेक्ट्रीक आणि  Ola, Hero आणि TVS कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कूटरना टक्कर देणार आहे असे म्हटले जात आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.