Nissan Magnite च्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ

कारप्रेमी ही गाडी पाहण्यासाठी आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी दररोज शोरुममध्ये गर्दी करत आहेत. (Nissan Magnite 2020)

Nissan Magnite च्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 7:45 AM

मुंबई : निसान इंडिया कंपनीने गेल्या वर्षी 3 डिसेंबर रोजी Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच केली होती. ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. लाँचिंगनंतर अवघ्या 15 दिवसात या कारने 15 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला होता. त्यानंतर या कारच्या काही व्हेरियंट्ससाठी इतकी मागणी आहे की, त्या कारसाठी तब्बल 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. याचाच अर्थ या कारला भारतीय मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. दरम्यान, निसान इंडियाने लाँचिंगनंतर आतापर्यंत या कारच्या किंमतीत दुसऱ्यांदा वाढ केली आहे. (Nissan Magnite SUV price increased for second time, check all petrol varient prices)

निसान इंडियाने कोणतीही मोठी घोषणा न करता निसान मॅग्नाइट सब कॉम्पॅक्ट एसयूव्हीची किंमत देशभरात 30,000 रुपयांनी वाढवली आहे. कंपनीने आपल्या पहिल्या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या किंमती वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एसयूव्हीच्या बेस व्हेरिएंटच्या किंमतीत 50,000 रुपयांची वाढ करण्यात आली होती आणि आता त्याच्या टर्बो-पेट्रोल मॉडेलमध्ये तेजी दिसून आली आहे. निसानच्या कारची डिसेंबर 2020 मध्ये देशात 4.99 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) या सुरुवातीच्या किंमतीवर विक्री करण्यात आली होती. या कारच्या टर्बो-पेट्रोल वेरिएंटची किंमत आता 7.29 लाख ते 9.75 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे.

निसान मॅग्नाईटच्या सर्व (10) व्हेरियंट्सच्या किंमती

1. Magnite XE – 5.49 लाख रुपये 2. Magnite XL – 5.99 लाख रुपये 3. Magnite XV – 6.68 लाख रुपये 4. Magnite XV Premium – 7.55 लाख रुपये 5. Magnite Turbo XL – 7.29 लाख रुपये 6. Magnite Turbo XV – 8.12 लाख रुपये 7. Magnite Turbo XV Premium – 8.89 लाख रुपये 8. Magnite Turbo XL CVT – 8.19 लाख रुपये 9. Magnite Turbo XV CVT – 9.02 लाख रुपये 10. Magnite Turbo XV Premium CVT – 9.79 लाख रुपये

मॅग्नाईटसाठी 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड

दरम्यान, लाँचिंगनंतर अवघ्या 15 दिवसात या कारने 15 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता आता अशी माहिती मिळाली आहे की, या कारच्या काही व्हेरियंट्ससाठी इतकी मागणी आहे की, त्या कारसाठी तब्बल 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. याचाच अर्थ या कारला भारतीय मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक ही गाडी पाहण्यासाठी आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे, अशी माहिती दिल्लीतल्या काही डिलर्सनी दिली आहे. या कारच्या टॉप व्हेरियंटला सर्वाधिक मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. (Nissan Magnite waiting period Stretches to 8 months)

कशी आहे मॅग्नाईट?

कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात Nissan Magnite ची सुरूवातीची किंमत 4 लाख 99 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येईल.

दोन इंजिनांचा पर्याय

Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc आहे, जे 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे. दुसरं इंजिन 1.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.

या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे.

Nissan Magnite मधील इतर खास फिचर्स

⦁ Nissan Magnite मध्ये Bi Projector LED हेडलँम्प्स देण्यात आले आहेत.

⦁ LED DRL, LED इंडिकेटर

⦁ 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स

⦁ व्हाइस रेकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

‘या’ गाड्यांना टक्कर

Nissan Magnite मार्केटमध्ये मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza), ह्युंदाई वेन्यू (Hyundai Venue), टाटा नेक्सॉन (Tata Nexon), फोर्ड इकोस्पोर्ट (Ford Ecosport), महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300), टोयोटा अर्बन क्रुझर (Toyota Urban Cruiser), होंडा WR-V (Honda WR-V) आणि नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या किया सोनेट (Kia Sonet) या कारशी थेट टक्कर होत आहे.

हेही वाचा

बंपर ऑफर! 1.45 लाखांची बाईक अवघ्या 45 हजारात

भारतीयांच्या मनात भरलेली Nissan Magnite क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?

Tata आणि Mahindra च्या ‘या’ गाड्यांवर 3 लाखांचा डिस्काऊंट

(Nissan Magnite SUV price increased for second time, check all petrol varient prices)

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.