होळीनिमित्त खास रंगाची स्कुटर बाजारात, एका चार्जमध्ये 135 किलो मीटरची ड्रायव्हिंग रेंज, काय आहे गेरू रंगाच्या स्कुटरचे वैशिष्ट्य?

होळीनिमित्त खास रंगाची स्कुटर बाजारात, एका चार्जमध्ये 135 किलो मीटरची ड्रायव्हिंग रेंज, काय आहे गेरू रंगाच्या स्कुटरचे वैशिष्ट्य?
e scooter
Image Credit source: TV9

सण-उत्सव आला की नव्या वस्तू घेण्याचा कल वाढतो. नव्या वास्तू घेण्यासाठी ग्राहकांची तुकानांमध्ये, शो रुममध्ये देखील गर्दी दिसून येते. या होळीनिमित्त देखील दुचाकीत एक खास ऑफर आली आहे. आता रंगाची उधळण तर कराच पण ती उधळण गेरू रंगासोबत करता येणार आहे. त्यामुळे होळी आणि धुलिवंदनानिमित्त ग्राहकांना खास गेरू रंगाची स्कुटर घेता येऊ शकते. Ola इलेक्ट्रिकन Ola स्कूटर गेरू या रंगामध्ये लाँच केली आहे. त्यामुळे आज आणि उद्या तीला तुम्ही होळी आणि धुलिवंदनानिमित्त घेऊ शकतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 17, 2022 | 1:28 PM

मुंबई : सण-उत्सव (festival) आला की नव्या वस्तू घेण्याचा कल वाढतो. नव्या वास्तू घेण्यासाठी ग्राहकांची तुकानांमध्ये, शो रुममध्ये देखील गर्दी दिसून येते. या होळीनिमित्त देखील दुचाकीत एक खास ऑफर आली आहे. आता रंगाची उधळण तर कराच पण ती उधळण गेरू रंगासोबत करता येणार आहे. त्यामुळे होळी आणि धुलिवंदनानिमित्त ग्राहकांना खास गेरू रंगाची स्कुटर घेता येऊ शकते. Ola इलेक्ट्रिकन Ola स्कूटर गेरू या रंगामध्ये लाँच केली आहे. त्यामुळे आज आणि उद्या तीला तुम्ही होळी आणि धुलिवंदनानिमित्त (Holi festival)घेऊ शकतात. गेरुआ कलर कंपनीने होळीच्या निमित्तानं खास सादर केला आहे. ग्राहकांना देखील त्याची भुरळ पडत असल्याचं दिसतंय. ही स्पेशल एडिशन इलेक्ट्रिक स्कुटर (electronic scooter) फक्त 17-18 मार्चला स्कूटर बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे वेळ न दवडता लवकरात लवकर या रंगाच्या स्टुटरला बुक करायला हवं. या स्कूटरच्या मुख्य वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर याला एका चार्जवर 135 किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळणार आहे. तर याची सर्वात जास्त स्पीड ताशी 115 किलो मीटर इतकी आहे. आता या आगळ्या गेरू रंगामुळे तुमची दुचाकी उठून दिसेल. इतकं मात्र नक्की.

स्कुटरची मागणी वाढली

Ola इलेक्ट्रिकन म्हटलं की, ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सध्या Ola S1 Pro स्कूटरचे उत्पादन आणि वितरणाला गती देत आहोत. डिसेंबर 2020 मध्ये, ओला इलेक्ट्रिकने आपला पहिला कारखाना सुरू करण्यासाठी 2 हजार 400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी तमिळनाडू सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. Ola S1 Pro शिवाय इतर जवळपास 10 रंग या स्कुटरमध्ये उपलब्ध आहेत. यातील कोणत्याही रंगाची स्कुटर ग्राहक घेऊ शकतात. पहिल्या खरेदी विंडोप्रमाणे, संपूर्ण डिजिटल पेमेंट प्रक्रिया केवळ ओला अॅपद्वारेच होईल. डिस्पॅच एप्रिलपासून सुरू होईल आणि ग्राहकांच्या दारात वितरित केले जाईल.अतिषय सुटसुटीत अशी प्रक्रिया खरेदीसाठी ठवण्यात आली आहे.

Ola S1 Proची वैशिष्ट्ये काय?

कोणतीह गाडी घ्यायची म्हटलं की त्याच्या वैशिष्ट्यांकडेही लक्ष द्यायला हवं. Ola S1 Proचे वैशिष्य्यांमध्ये Ola S1 Pro ची किंमत 1.29 लाख रुपये आहे. जी एक्स-शोरूम किंमत आहे. ही स्कुटर रस्त्यावर 115 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. 3 सेकंदात 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग ती पकडते. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हा मोबाइल 135 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि उत्तम डिझाइन आहे. Ola S1 Pro स्कूटर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या Ather आणि Simple One इलेक्ट्रिक स्कुटरशी स्पर्धा करते. त्यामुळे ही स्कुटर घ्यायची असल्यास आज आणि उद्याचा वेळ कंपनीनं दिला आहे. त्यामुले घाई करुन अनोख्या रंगाची स्कुटर घरी आणा.

इतर बातम्या

टीव्ही 9 मराठी महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनेल, टीव्ही 9 च्या ऑफिसमध्ये जल्लोष!

Aurangabad | तोंडावरचा मास्क काढला अन् CCTV नं टिपला, कुख्यात गुन्हेगार पप्पू घिसाडी प्रेयसीच्या घरातून पकडला

Numerology Pick Your Colour for Holi 2022 | आता अंकशास्त्रानुसार खेळा होळी, जाणून घ्या कोणता रंगाने होळी खेळणं ठरणार तुमच्यासाठी लकी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें