Maruti E Vitara : भारतासाठी आज मोठा दिवस, मोदी स्वत: मारुती सुझूकीच्या या प्लान्टमध्ये का गेले? असं काय खास घडलं?
Maruti E Vitara : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात अहमदाबाद येथील मारुती सुजुकीच्या प्लानंटमध्ये गेले होते. मारुतीच्या 'Maruti e Vitara' कारला त्यांनी फ्लॅग ऑफ केलं. मोदी आज खास इथे का गेले होते? या प्लान्टमध्ये असं काय आहे? जाणून घ्या.

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुति सुजुकीची इलेक्ट्रिक कारची प्रतिक्षा आज संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 26 ऑगस्ट रोजी गुजरात हंसलपुर येथे मारुति सुजुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार ‘Maruti e Vitara’ ला फ्लॅग ऑफ केलं. भारतात तयार झालेली मारुती सुजुकीची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. जपानसह 100 पेक्षा पण जास्त देशात ही कार निर्यात केली जाईल. या इलेक्ट्रिक कारकडून कंपनीला भरपूर अपेक्षा आहेत. कार बाजारपेठेत Maruti e Vitara चा नुकत्याच लॉन्च झालेल्या Hyundai Creta Electric शी सामना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यादरम्यान टीडीएस लिथियम-आयन बॅटरी प्लान्ट हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादनाच सुद्धा उद्घाटन केलं.
आज हंसलपुर येथील मारुतीच्या इलेक्ट्रिक कारच्या कार्यक्रमाला जाण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास टि्वट केलं होतं. “पर्यावरण अनुकूल वाहतूक व्यवस्था आणि स्वावलंबनाच्या शोधात असलेल्या भारतासाठी आजचा दिवस खास आहे. BEV म्हणजे बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक मेड इन इंडिया कार तयार असून शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये या कारची निर्यात होईल. यामुळे आपल्या बॅटरी आधारीत इकोसिस्टिमला उत्तेजना मिळणार आहे. गुजरातमधल्या प्लान्टमध्ये अशा कार निर्मितीचा आरंभ होईल” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलय.
आजपासून इलेक्ट्रिक एसयूवी लोकल प्रोडक्शन सुरु
पीएम मोदी यांनी मारुति सुजुकीच्या प्लांटमध्ये आजपासून कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार ‘Maruti e Vitara’ च्या उत्पादनासाठी प्रोडक्शन असेंबली लाइनच उद्घाटन केलं. म्हणजे आजपासून इलेक्ट्रिक एसयूवी लोकल प्रोडक्शन सुरु झालय. दुसऱ्या देशातही इथे बनलेल्या कार निर्यात होतील.
आपल्या देशाला याचा काय फायदा होणार?
यामुळे आता 80 टक्क्यापेक्षा जास्त बॅटरीची निर्मिती देशातच होईल. त्यामुळे भारताची क्लीन एनर्जी आणि मॅन्युफॅक्चरिंग टार्गेटला बळ मिळेल. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी भारताकडून सतत प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी गुजरातमधील टीडीएस लिथियम-आयन बॅटरी प्लांटमुळे भारताला आपल्या लक्ष्याच्या दिशेने जाण्यात मोठी मदत होईल. जवळपास 7.5 लाख युनिट एवढी हंसलपुर येथील सुजुकी मोटर गुजरात (SMG) प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता आहे. नवीन असेंबली लाइन सुरु झाल्यानंतर ही क्षमता अधिक वाढेल. देशातंर्गत आणि निर्यात बाजारपेठेची गरज भागवण्यासाठी हंसलपुर प्लांट मार्च 2014 मध्ये सुरु झालेला.
