सणासुदीच्या काळात घरी आणा 20.5Km/L मायलेज देणारी Renault Kiger, जाणून घ्या SUV मध्ये काय आहे खास?

नॉ या भारतातील ऑपरेशन्सच्या 10 व्या वर्षात पदार्पण केलेल्या कंपनीने, आज आपल्या नवीन सब-फोर मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही कायगरने साध्य केलेल्या, एका यशाची घोषणा केली.

सणासुदीच्या काळात घरी आणा 20.5Km/L मायलेज देणारी Renault Kiger, जाणून घ्या SUV मध्ये काय आहे खास?
Renault Kiger

मुंबई : रेनॉ या भारतातील ऑपरेशन्सच्या 10 व्या वर्षात पदार्पण केलेल्या कंपनीने, आज आपल्या नवीन सब-फोर मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही कायगरने साध्य केलेल्या, एका यशाची घोषणा केली. जागतिक दर्जाच्या टर्बोचार्ज्ड 1.0L पेट्रोल इंजिनाची शक्ती लाभलेली कायगर केवळ अधिक हाय परफॉर्मन्स किंवा दणकट ड्रायव्हिंगचा अनुभवच देत नाही, तर ती 20.5 Km/L इतकं मायलेजदेखील देते. एआरएआयच्या टेस्टिंग सर्टिफिकेशनद्वारे हे स्पष्ट झाले आहे. (Renault Kiger claims to offer segment-best fuel economy around 20.5 Km/L)

रेनॉ कायगरमध्ये थ्री-सिलिंडर टर्बोचार्ज्ड 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनची ऊर्जा 100 Ps व टॉर्क 160 Nm (फाइव्ह स्पीड मॅन्युअल : 2800-3600 RPM मध्ये उपलब्ध) आहे. रेनॉ कायगर 1.0 एल एनर्जी व 1.0 एल टर्बो अशा इंजिनांच्या दोन पर्यायांमध्ये, 5.64 लाख रुपये एवढ्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. यामध्ये AMT व CVT अशी टू पेडल ऑफरिंग्ज आहेत. याला पूरक अशा मल्टि-सेन्स ड्राइव्ह मोड्सचा अंतर्भाव SUV मध्ये असल्याने इंधन कार्यक्षमता व कामगिरी यांच्यानुसार विविध प्रकारांत (इको, नॉर्मल व स्पोर्ट) ती उपलब्ध आहे.

ग्राहक पाच उपलब्ध ट्रिममधून आवडती कार निवडू शकतात. यामध्ये RXE, RXL, RXT, RXT (O) आणि RXZ ट्रिम्सचा समावेश आहे. प्रत्येक व्हर्जन हे ग्राहकाच्या त्या विभागातील गरजा व मागण्या लक्षात घेऊन घडवण्यात आले आहे आणि सर्व ट्रिम्समध्ये आकर्षक किमती ठेवण्यात आल्या आहेत. ग्राहकांना प्रत्येक स्तरावर मौल्यवान लाभ मिळत आहे आणि वरील व्हराएंट्समध्ये शैलीदार ड्युअल टोनचा पर्यायही उपलब्ध आहे.

वैशिष्ट्यपूर्ण कुपे SUV रचना, उत्तम जागा/उपयुक्तता, स्मार्ट फीचर्स आणि जागतिक दर्जाचे दणकट इंजिन यांमुळे रेनॉ कायगर हे भारतातील वाहन बाजारपेठेच्या गाभ्याला लक्ष्य करणारे ब्रेकथ्रू उत्पादन झाले आहे. भारतातील एक दणकट, स्मार्ट आणि विस्मयकारक B-SUV म्हणून स्वत:ला प्रस्थापित केल्यानंतर, रेनॉ कायगरचे अस्तित्व जागतिक बाजारपेठेतही जाणवू लागले आहे. रेनॉने यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेत कायगरची निर्यात सुरू केली आहे आणि लवकरच अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. यांमध्ये इंडोनेशिया व आफ्रिकेच्या अन्य काही भागांचाही समावेश आहे.

Renault Kiger चं कसं आहे डिझाइन?

या एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर एक स्कल्प्टेड टेलगेट, एक एलईडी टेल लँप क्लस्टर, रिफ्लेक्टरसह हाय माउंट स्टॉप दिवे, टेलगेट माउंटेड स्पॉइलर, वायपर आणि बम्पर असणार आहेत. इतकंच नाहीतर परवाना प्लेट रीसेस बम्परवर असेल. याच्या पुढच्या बाजूला ब्लॅक बम्पर क्लेडिंग, 16 इंच अ‍ॅलोय व्हील, ब्लॅक बी पिलरही देण्यात आलं आहे.

या गाडीच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झालं तर, त्याला ड्युअल-टोन कलर देण्यात आला आहे. याशिवाय Apple Car Play आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, स्वयंचलित हवामान नियंत्रण, क्रूझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट आणि स्टॉप बटन्स, क्रूज़ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप बटन, माउंटेड कंट्रोल्ससोबतच मल्टी-फंक्शनल स्टीअरिंग व्हील देण्यात आलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Kiger ही भारतात तयार होणारं जागतिक उत्पादन असणार आहे. नवीन रेनॉ कायगर ही कार किया सोनेट, ह्युंदाई वेन्यू, मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, टाटा नेक्सॉन, महिंद्रा केयूव्ही 300 आणि इतर कार्ससाठी तगडा स्पर्धक असणार आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 27 हजारात घरी न्या होंडाची ढासू बाईक, सोबत 12 महिन्यांची वॉरंटी

हिरो मोटोकॉर्पची Xtreme 160R Stealth Edition बाजारात, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?

70,000 रुपयांहून कमी किंमतीत शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Renault Kiger claims to offer segment-best fuel economy around 20.5 Km/L)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI