Budget Electric Car: सिंगल चार्जमध्ये 300KM रेंज, Renault Kwid चं इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच

फ्रेंच ऑटोमेकर रेनॉने (Renault) ब्राझीलमध्ये त्यांच्या प्रचंड लोकप्रिय हॅचबॅक क्विड ई-टेकचं ऑल-इलेक्ट्रिक व्हर्जन (Renault Kwid E-Tech) लॉन्च केलं आहे. दक्षिण अमेरिकन देशात उपलब्ध मॉडेलची किंमत 1,42,990 ब्राझिलियन रिअल (भारतात अंदाजे 23.20 लाख रुपये) आहे.

Budget Electric Car: सिंगल चार्जमध्ये 300KM रेंज, Renault Kwid चं इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच
Renault Kwid E-Tech Electric carImage Credit source: Renault
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 3:50 PM

मुंबई : फ्रेंच ऑटोमेकर रेनॉने (Renault) ब्राझीलमध्ये त्यांच्या प्रचंड लोकप्रिय हॅचबॅक क्विड ई-टेकचं ऑल-इलेक्ट्रिक व्हर्जन (Renault Kwid E-Tech) लॉन्च केलं आहे. दक्षिण अमेरिकन देशात उपलब्ध मॉडेलची किंमत 1,42,990 ब्राझिलियन रिअल (भारतात अंदाजे 23.20 लाख रुपये) आहे. ऑल-इलेक्ट्रिक एंट्री-लेव्हल हॅचबॅक कारचा पहिल्यांदा 2020 च्या ऑटो शोमध्ये K-ZE म्हणून डेब्यू करण्यात आला होता आणि ही कार युरोपमध्ये Dacia Spring EV म्हणूनही उपलब्ध आहे. Renault Kwid e-Tech आता JAC e-JS1 च्या जागी ब्राझीलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. रेनॉ क्विड (Renault Kwid) ही भारतातील सर्वात स्वस्त हॅचबॅक कारपैकी एक आहे.

डिझाइनच्या बाबतीत, ऑल न्यू Kwid E-TECH जुन्या ICE Kwid सारखीच आहे. परंतु त्यात काही EV-स्पेसिफिक डिझाइन एलिमेंट्स समाविष्ट आहेत. इतर सर्व इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणे या मॉडेलमध्ये पुढील बाजूस इंजिन नसल्यामुळे, लोगोच्या खाली दोन पट्ट्यांच्या स्वरूपात क्रोम गार्निशसाठी क्लोज-ऑफ ग्रिल मिळते. या व्यतिरिक्त, यात नवीन डिझाइन केलेल्या अलॉय व्हीलचा सेट, सोबत ई-टेक बॅजिंग देखील मिळते. ब्राझील-स्पेक क्विड ईव्ही दक्षिण अमेरिकन देशात तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये नोरोन्हा ग्रीन, ग्लेशियर पोलर व्हाइट आणि डायमंड सिल्व्हर यांचा समावेश आहे.

Renault Kwid E-Tech मधील सेफ्टी फीचर्स

या कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, जे भारतात विकल्या जाणार्‍या Kwid पेक्षा खूप वेगळे आहेत, ज्यामुळे ही कार अधिक सुरक्षित बनते. ई-टेक व्हेरिएंटमध्ये सहा एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल-स्टार्ट असिस्टन्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांचा समावेश आहे.

Renault Kwid E-Tech ची बॅटरी आणि स्पीड

नवीन Kwid e-Tech 26.8 kWh बॅटरीसह सुसज्ज आहे. ही कार शहरांमध्ये वापरली तर 298 किमीपर्यंतची रेंज देईल आणि मिक्स सायकलमध्ये 265 किमीची रेंज देऊ शकते, ज्यामध्ये सिटी आणि महामार्गावर वाहन चालवणे समाविष्ट आहे. 20A आणि 220V डोमेस्टिक आउटलेटवरून चार्ज केल्यावर, कार 9 तासांत 190 किमी अंतर पार करण्याइतकी बॅटरी चार्ज करू शकते. परफॉर्मन्सच्या बाबतीत, फ्रेंच निर्मात्याचा दावा आहे की ब्राझीलमधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारमध्ये 65 हॉर्स पॉवर आहे आणि ती 4.1 सेकंदात 0 ते 50 किमी प्रतितास वेग धारण करु शकते. कारचे वजन 977 किलो आहे.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....