AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Royal Enfield Bullet Hunter 350 : 7 ऑगस्टला लॉन्च होतेय रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त हंटर 350, डिटेल्स जाणून घ्या

असा दावा केला जातोय की रॉयल एनफिल्डच्या आत्तापर्यंतच्या सर्व बाईकमध्ये ही बाईक (Bike) सर्वात स्वस्त असेल. या बाईकचं नाव असेल रॉयल एनफिल्ड हंटर 350.

Royal Enfield Bullet Hunter 350 : 7 ऑगस्टला लॉन्च होतेय रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त हंटर 350, डिटेल्स जाणून घ्या
Royal Enfield Hunter 350Image Credit source: Google
| Updated on: Aug 05, 2022 | 7:15 AM
Share

मुंबई : रॉयल एनफिल्डची नवी मोटरसायकल रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) हंटर 350 चा नवा लुक समोर आलाय. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सिद्धार्थ लाल (Sidharth Lal) यांनी गाडीचा टिझर आपल्या Instagram अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या टीझरमध्ये सिद्धार्थ लाल स्वतः बाईक सुरू करताना दिसत आहेत. असा दावा केला जातोय की रॉयल एनफिल्डच्या आत्तापर्यंतच्या सर्व बाईकमध्ये ही बाईक (Bike) सर्वात स्वस्त असेल. या बाईकचं नाव असेल रॉयल एनफिल्ड हंटर 350. टीझरनुसार ही बाईक 7 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार नव्या रॉयल एनफिल्ड हंटर 350 चे अनेक व्हेरिएंट्स आहेत. त्यामध्ये रेट्रो, मेट्रो आणि मेट्रो रिबेल अशी नव्या व्हेरिएंट्सची नावं असतील.

नवा कूल आणि डिझाईन खूप आकर्षक

असं सांगितलं जात आहे की बाईकमध्ये इंजिन, चेसिस, सस्पेंशन आणि ब्रेकिंग डिव्हाइस आदी मोठ्या प्रमाणात Meteor 350 चे असतील. नवी बाईक रॉयल एनफील्ड हंटर 350 चा नवा कूल आणि डिझाईन खूप आकर्षक आहे. हंटर रेट्रो लिमिटेड खास करुन बजेटवाल्या ग्राहकांना टार्गेट करेल. हंटर मेट्रो अशा लोकांसाठी देण्यात आलीय जे सर्व एडव्हान्स सुविधा असलेली बाईक विकत घेऊ इच्छितात.

View this post on Instagram

A post shared by Sid Lal (@sidlal)

नवी बाईक स्टॅंडर्ड डिझाईनपेक्षा वेगळी

ही नवी बाईक रॉयल एनफील्डच्या स्टॅंडर्ड डिझाईनपेक्षा वेगळी आहे. ययात हंटर 350 सिग्नेचर रेट्रो बिट्सप्रमाणे राऊंट हँडलॅम्प, रियर व्ह्यू मिरर, आणि टेल लॅम्पसह उपलब्ध असेल. बाईकस्वाराला आपले गुडघे आरामात अॅडजस्ट करण्यासाठी डेडिकेटेड इंडेटेशनसह शार्प प्रोफाईलनुसार फ्युअल टँक बसवण्यात आलाय. त्यासह स्पोर्टी ग्राफिक्स, सिंगल पीस सॅडल आणि कॉम्पॅक्ट एग्जॉस्टही उपलब्ध आहेत.

रॉयल एनफील्डच्या नवी मोटारसायकल रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या मेट्रो व्हेरिएंटमध्ये अलॉय व्हील, डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनल एबीएस, एलईडी टेल लॅम्प, राऊंड टर्न इंडिकेटर्स, Metepr 350 नुसार हँडल स्विच आणि इंस्ट्रूमेंट क्लस्टर असणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.