AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॉवरफुल इंजिन असलेल्या Royal Enfield पासून Honda पर्यंतच्या ‘या’ 5 बेस्ट रेट्रो लूक बाईक्स

बाईक खरेदी करताना रेट्रो लूकसह पॉवरफुल इंजिनही हवंय? चला तर मग आज आम्ही तुम्हाला पाच आश्चर्यकारक मॉडेल्सबद्दल सांगतो जे केवळ पॉवरफुल इंजिनसह येत नाहीत तर रेट्रो लुक डिझाइन देखील देतात. ही मॉडेल्स काय आहेत आणि त्यांच्या किंमती काय आहेत? चला जाणून घेऊया.

पॉवरफुल इंजिन असलेल्या Royal Enfield पासून Honda पर्यंतच्या 'या' 5 बेस्ट रेट्रो लूक बाईक्स
Retro BikesImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 02, 2025 | 1:43 PM
Share

भारतीय बाजारपेठेत रेट्रो लुक डिझाइन केलेल्या बाईकची क्रेझ सर्वाधिक पाहायला मिळते, त्यात जर रॉयल एन्फिल्डच्या आणि होंडाच्या बाईक्स असतील तर त्याची बातच काही और असते. रेट्रो बाईक्स म्हटलं की तरुणांचे विशेष प्रेम पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला तीन लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत कोणत्या बाईक्स मिळू शकतात याबद्दल माहिती देणार आहोत. 3 लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये होंडा, रॉयल एनफिल्ड, तसेच जावा आणि हार्ले डेव्हिडसन सारख्या कंपन्या दमदार इंजिन असलेल्या रेट्रो लुक बाइकची विक्री करत आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊयात.

होंडा हनेस सीबी ३५० बाईकची किंमत (Honda Hness CB 350 Price)

होंडा कंपनीची ही बाईक 348.36 सीसी सिंगल सिलिंडर इंजिनने सुसज्ज आहे जी 20.78bhp पॉवर आणि 30 एनएम टॉर्क जनरेट करते. ही बाईक ग्राहकांना केवळ BigWing Honda डीलर्स कडून खरेदी करता येणार आहे. या बाईकची किंमत 2 लाख 09 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

बीएसए गोल्डस्टार बाईकची किंमत (BSA Goldstar Price)

BSA Goldstar ही बाईक 652 सीसी सिंगल सिलिंडर इंजिनने सुसज्ज आहे जी 45.6bhp पॉवर आणि 55 एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकची किंमत (एक्स-शोरूम) 2 लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते.

जावा 42 बाईकची किंमत (Jawa 42 Price)

रेट्रो लुक बाइक्सच्या या लिस्टमधील सर्वात स्वस्त बाईक जावा कंपनीची आहे. या बाईकची किंमत 1 लाख 72 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते आणि ही बाईक 294.72 सीसी सिंगल सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजिन असलेली ही बाईक तुम्हाला 26.94bhp पॉवर आणि 26.84 एनएम टॉर्क जनरेट करते.

रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 बाईकची किंमत (Royal Enfield Interceptor 650 Price)

रॉयल एनफिल्डच्या या बाईकने भारतात रेट्रो सेगमेंट लूक परत आणला असून ग्राहकांमध्ये ती खूप लोकप्रिय आहे. या बाइकमध्ये ६४९ सीसीचे समांतर ट्विन इंजिन देण्यात आले आहे जे ४७ बीएचपी पॉवर आणि ५२ एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकची किंमत 2 लाख 85 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

हार्ले डेव्हिडसन क्स४४० बाईकची किंमत (Harley Davidson X440 Price)

हार्ले डेव्हिडसनची ही बाईक हिरोच्या साहाय्याने विकसित करण्यात आली आहे, ज्यामध्ये 440 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे 27bhp पॉवर आणि 38 एनएम टॉर्क जनरेट करेल. या बाईकची सुरुवातीची (एक्स-शोरूम) किंमत 2 लाख 39 हजार रुपये आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.