AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skoda Slavia ला भारतीय ग्राहकांची पसंती, एका महिन्यात 10,000 बुकिंग्स

स्कोडा ऑटो इंडियाने (Skoda Auto India) या वर्षी फेब्रुवारीमध्ये आपली नवीन मिडसाईज सेडान, स्कोडा स्लाव्हिया (Skoda Slavia) लाँच केली होती. ही कार होंडा सिटी, मारुती सियाझ, फोक्सवॅगन व्हेंटो आणि ह्युंदाई वेर्ना या गाड्यांना बाजारात जोरदार स्पर्धा देत आहे.

Skoda Slavia ला भारतीय ग्राहकांची पसंती, एका महिन्यात 10,000 बुकिंग्स
| Updated on: Apr 04, 2022 | 5:13 PM
Share

Skoda Slavia Price Sale Booking: स्कोडा ऑटो इंडियाने (Skoda Auto India) या वर्षी फेब्रुवारीमध्ये आपली नवीन मिडसाईज सेडान, स्कोडा स्लाव्हिया (Skoda Slavia) लाँच केली होती. ही कार होंडा सिटी, मारुती सियाझ, फोक्सवॅगन व्हेंटो आणि ह्युंदाई वेर्ना या गाड्यांना बाजारात जोरदार स्पर्धा देत आहे. स्कोडा स्लाव्हिया आपल्या जबरदस्त लुक आणि लेटेस्ट फीचर्समुळे लोकांना आकर्षित करत आहे. स्कोडा स्लाव्हियाला आजपर्यंत 10,000 हून अधिक बुकिंग्स मिळाल्या आहेत. स्कोडा कंपनीने गेल्या महिन्यात सर्वाधिक कार विक्रीचा विक्रमही प्रस्थापित केला असून त्यात स्कोडा कुशाक आणि स्लाव्हिया सारख्या कारचा मोठा वाटा आहे.

Skoda Slavia च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारच्या 1.0 TSI Active या बेस व्हेरिएंटची किंमत 10.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. स्लाव्हियाचे 8 व्हेरिएंट आहेत, या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 17.79 लाख रुपयांपर्यंत आहे. स्लाव्हियाचे बेस मॉडेल होंडा सिटीपेक्षा स्वस्त आहे, या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी ही मिडसाईज कार आहे. स्कोडा स्लाव्हियाच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार 1.0L TSI आणि 1.5L TSI टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. ही सेडान मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Skoda Slavia ची लांबी 4,541 mm, रुंदी 1,752 mm आणि उंची 1,487 mm आहे. स्कोडा रॅपिडच्या तुलनेत, ऑल-न्यू स्लाव्हिया 128 मिमी लांब, 53 मिमी रुंद आणि 21 मिमी लांब आहे.

Skoda Slavia मध्ये दमदार इंजिन

Skoda Slavia मध्ये दोन प्रकारचे इंजिन पर्याय दिले आहेत. ही कार 1.0 लीटर TSI पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असेल जे मॅक्सिमम 114 एचपी पॉवर आणि 178 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल तसेच 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. तर यातले दुसरे इंजिन 1.5 लीटर TSI पेट्रोल इंजिन आहे, जे 148 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच, यात 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड डीएसपी ट्रान्समिशन आहे.

Skoda Slavia चे इतर फीचर्स

Skoda च्या या कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto कंपॅटिबिलिटी, वायरलेस चार्जिंग पॅड, 6 एअरबॅग्ज, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, पॉवर सीट्स, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, आणि मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल.

इतर बातम्या

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार

भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ

नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.