AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skoda Slavia डीलर शोरूम्समध्ये दाखल, 11000 रुपयांत करा बुकिंग, पाहा कशी आहे नवी सेडान

स्कोडा स्लाव्हिया (Skoda Slavia) भारतभरातील डीलर शोरूममध्ये दाखल होऊ लागली आहे. स्कोडा कुशाकनंतर (Skoda Kushaq) स्कोडा स्लाव्हिया हे कंपनीचे दुसरे उत्पादन आहे जे त्यांच्या India 2.0 धोरणांतर्गत तयार करण्यात आले आहे.

Skoda Slavia डीलर शोरूम्समध्ये दाखल, 11000 रुपयांत करा बुकिंग, पाहा कशी आहे नवी सेडान
Skoda Slavia Car (फाइल फोटो)
| Updated on: Feb 11, 2022 | 2:08 PM
Share

मुंबई : स्कोडा स्लाव्हिया (Skoda Slavia) भारतभरातील डीलर शोरूममध्ये दाखल होऊ लागली आहे. स्कोडा कुशाकनंतर (Skoda Kushaq) स्कोडा स्लाव्हिया हे कंपनीचे दुसरे उत्पादन आहे जे त्यांच्या India 2.0 धोरणांतर्गत तयार करण्यात आले आहे. दोन वर्षांहून अधिक काळ या कारची चाचणी केली जात आहे, कंपनीने गेल्या वर्षाच्या अखेरीस ही नवीन सेडान सादर केली होती. स्कोडा (Skoda) कंपनी 28 फेब्रुवारी रोजी स्लाव्हिया लाँच करेल. स्लाव्हियाची टेस्ट ड्राइव्ह सुविधा आत्ता दिली जाणार नाही. स्कोडाने म्हटले आहे की, टेस्ट ड्राइव्ह या महिन्याच्या शेवटी सुरू होईल, त्यासाठी 11,000 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर (down payment) बुकिंग सुरू झाले आहे.

एका ट्विटला उत्तर देताना, स्कोडा ऑटो सेल्स, सर्व्हिस आणि मार्केटिंग डायरेक्टर जॅक हॉलिस यांनी सांगितले की स्कोडा स्लाव्हिया मध्यम आकाराच्या सेडानच्या व्हेरिएंट किमती मार्च 2022 च्या पहिल्या आठवड्यात घोषित केल्या जातील आणि पुढील महिन्याच्या शेवटी या कारचे वितरण सुरू होईल.

स्लाव्हिया हे कंपनीच्या लोकलाइज्ड MQB A0-IN प्लॅटफॉर्मवर आधारित दुसरे मॉडेल आहे. याआधी कंपनीने स्कोडा कुशाक (Skoda Kusahq) कॉम्पॅक्ट SUV कार या प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. स्लाव्हियाचे उत्पादन स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या महाराष्ट्रातील चाकण प्लांटमध्ये केले जाईल आणि कार 95 टक्के लोकलायजेशनसह येईल. स्लाव्हिया भारतीय बाजारपेठेला नजरेसमोर ठेवून विकसित करण्यात आल्याचे स्कोडाचे म्हणणे आहे. स्कोडाने या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्लाव्हियावरुन पडदा हटवला होता. लॉन्च केल्यावर, ही कार Honda City, Hyundai Verna, Maruti Suzuki Ciaz आणि मिडसाईज सेडान सेगमेंटमधील इतर कारशी स्पर्धा करेल. स्कोडा स्लाव्हियाची किंमत 10 लाख रुपये ते 17 लाख (एक्स-शोरूम) रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.

कशी आहे Skoda Slavia?

Skoda Slavia ची लांबी 4,541 mm, रुंदी 1,752 mm आणि उंची 1,487 mm आहे. स्कोडा रॅपिडच्या तुलनेत, ऑल-न्यू स्लाव्हिया 128 मिमी लांब, 53 मिमी रुंद आणि 21 मिमी लांब आहे. Skoda आणि Volkswagen ने भारत 2.0 प्रकल्पाचा भाग म्हणून एक अब्ज युरोपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे आणि परिणामी, कंपनी भारतात नवनव्या कार्सचा धडाका सुरु करणार आहे. VW देखील 2022 मध्ये व्हेंटोच्या जागी Vertus-आधारित सेडान सादर करेल.

दमदार इंजिन

Skoda Slavia मध्ये दोन प्रकारचे इंजिन पर्याय दिले जाऊ शकतात. ही कार 1.0 लीटर TSI पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असेल जे मॅक्सिमम 114 एचपी पॉवर आणि 178 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल. दुसरे इंजिन 1.5 लीटर TSI पेट्रोल इंजिन असेल, जे 148 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच, यात 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड डीएसपी ट्रान्समिशन मिळेल.

Skoda Slavia चे फीचर्स

Skoda च्या आगामी कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto कंपॅटिबिलिटी, वायरलेस चार्जिंग पॅड, 6 एअरबॅग्ज, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, पॉवर सीट्स, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, आणि मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

इतर बातम्या

मोठी बॅटरी, 64MP कॅमेरासह Vivo चा किफायतशीर 5G स्मार्टफोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

3D अवतार, स्क्रीन शेअरिंगसह भन्नाट फीचर्स, Instagram वापरणं अधिक मजेदार होणार, पाहा नवीन फीचर्सची यादी

Tata Play Fiber कडून एक महिना मोफत 1000GB हाय-स्पीड इंटरनेट, जाणून घ्या ऑफर क्लेम करण्याची पद्धत

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.