इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘या’ शहरात 100 नवे चार्जिंग स्टेशन उभारणार, राज्य सरकारचा पुढाकार

इलेक्ट्रिक वाहनांसाठी 100 चार्जिंग पॉईंट्ससह येत्या सहा महिन्यांत दिल्लीत 100 नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरु आहे.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी 'या' शहरात 100 नवे चार्जिंग स्टेशन उभारणार, राज्य सरकारचा पुढाकार
तुम्ही कार्यालायतून घरी आल्यानंतर कार चार्जिंग करायचा विचार करत असाल तर तुम्हाला वाट पहावी लागू शकते. 15 एमपीच्या एसी चार्जरने तुम्ही गाडी चार्ज करायला गेलात तर त्यासाठी नऊ तास लागतील. तर फास्ट डीसी चार्जरचा वापर केल्यास एका तासात 80 टक्के गाडी चार्ज होते. शेवटची 20 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागतो.
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 10:56 AM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90-95 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करत आहेत, तर काही कंपन्या लवकरच इलेक्ट्रिक वाहनं लाँच करणार आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक व्हीकल्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. वाहन कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत, आणि विशेष म्हणजे ग्राहकांकडून आता इलेक्ट्रिक वाहनांना चांगगला प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध राज्यांमधील सरकारे प्रयत्नात आहेत. त्यात दिल्ली सरकार सर्वात पुढे आहे. (Delhi will set up 100 charging points and 100 new charging stations for electric vehicles)

इलेक्ट्रिक वाहनांसाठी 100 चार्जिंग पॉईंट्ससह येत्या सहा महिन्यांत दिल्लीत 100 नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरु आहे. इलेक्ट्रिक वाहनांविषयी जागरूकता आणि ईव्ही पॉलिसीच्या फायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी दिल्ली सरकारने ‘स्विच दिल्ली अभियान” सुरु केले आहे. आता त्यात भर म्हणून इलेक्ट्रिक वाहनांसाठी दिल्ली सरकारच्या पुढाकारातून दिल्लीत अनेक ठिकाणी 100 चार्जिंग स्टेशन्स उभारले जाणार आहेत.

दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत म्हणाले, “इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दिल्ली सरकारने देशाच्या राजधानीत प्रभावी इलेक्ट्रिक वाहन (ईवी) चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. नागरिक पेट्रोल-डिझेल वाहनं सोडून इलेक्ट्रिक वाहनं वापरु लागतील, ईव्हीच्या या सहज बदलाचा मार्ग तयार करण्यात सरकारने कोणतीही कसर सोडली नाही. आमच्या शहरात आधीपासूनच 72 हून जास्त चार्जिंग स्टेशन आहेत आणि येत्या सहा महिन्यांत 100 नवे चार्जिंग पॉईंट असलेले 100 नवीन चार्जिंग स्टेशन उभारले जातील.

चार्जिंगसाठी देशभरात सर्वात कमी दर

डीईआरसीने (दिल्ली विद्युत नियामक आयोगाने) देशाच्या राजधानीत राहणाऱ्या जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करावा, शहरातील प्रदूषण रोखता यावे, यासाठी इलेक्ट्रिक वाहनं (ईव्ही) चार्ज करण्याच्या दरांमध्ये कपात केली आहे. परिवहन मंत्री म्हणाले की निवासी चार्जिंग स्टेशनला 4-5 रुपयांच्या हिशेबाने पैसे द्यावे लागतील. हाय टेन्शनवाल्या चार्जिंग स्टेशनवर 4 रुपयांच्या दराने पैसे द्यावे लागतील. इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) चार्जिंगचे हे देर नागरिकांना आकर्षित करतील, असा विश्वास दिल्ली सरकारला आहे. तसेच देशभरात ईव्ही चार्ज करण्यासाठीचे सर्वात कमी दर दिल्लीतच आहेत.

इलेक्ट्रिक बाईक-स्कूटर वापरा, वर्षाला 22 हजार रुपये वाचवा;

दिल्लीचे परिवहन मंत्री कैशाल गहलोत यांनी गेल्या महिन्यात (7 फेब्रुवारी) ‘स्विच दिल्ली अभियाना’च्या पहिल्या सप्ताहाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही ट्विट्स केले होते. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, तुमची स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्विच केलीत तर पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत तुम्ही दरवर्षी 22,000 रुपयांची बचत करु शकता. तर पेट्रोल बाईकच्या तुलनेत दरवर्षी 20,000 हजार रुपयांची बचत करु शकता. इलेक्ट्रिक वाहन प्रत्येक बाबतीत तुमची बचत करेल.

पर्यावरणाची मदत

गहलोत यांनी अजून एक ट्विट केलं होतं, त्यात त्यांनी म्हटलंय की, “टू-व्हीलर सेगमेंटसह आम्ही ‘स्विच दिल्ली अभियाना’ची सुरुवात करत आहोत. ग्राहकांना होणाऱ्या आर्थिक फायद्यांव्यतिरिक्त महत्त्वपूर्ण पर्यावरणीय लाभांचादेखील यामध्ये समावेश आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या एका दुचाकी वाहनाच्या तुलनेत इलेक्ट्रिक टू-व्हीलर सरासरी 1.98 टन कमी कार्बन उत्सर्जन करेल. 11 झाडं लावल्यानंतरच हे शक्य होतं.” यायाच अर्थ तुम्ही एक इलेक्ट्रिक स्कूटर वापरत असाल तर 11 झाडं लावल्यानंतर पर्यावरणाचा जितका फायदा होतो, तितकी पर्यावरणाची मदत तुम्ही करु शकाल.

संबंंधित बातम्या

2024 पर्यंत दिल्लीत विकली जाणारी दर 4 पैकी 1 गाडी इलेक्ट्रिक असणार, केजरीवाल सरकारची जोरदार तयारी

आता इलेक्ट्रिक कार चार्ज करावी लागणार नाही, ही कंपनी बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिस सुरु करणार

2021 मध्ये ‘या’ शानदार इलेक्ट्रिक कार लाँच होणार, कमी किंमतीत दमदार फिचर्स

Toyota कडून सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, एकदा चार्ज केल्यावर 150 किमी धावणार, किंमत फक्त…

(Delhi will set up 100 charging points and 100 new charging stations for electric vehicles)
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.