Toyota कडून सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, एकदा चार्ज केल्यावर 150 किमी धावणार, किंमत फक्त…

प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे.

Toyota कडून सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, एकदा चार्ज केल्यावर 150 किमी धावणार, किंमत फक्त...
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 11:09 PM

मुंबई : टोयोटा मोटर कॉर्पोरेशनने C+pod अल्ट्रा कॉम्पॅक्ट बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच केली आहे. ही कार कॉर्पोरेट युजर्स, लोकल गवर्मेंट आणि इतर कंपन्यांसाठी उपलब्ध केली आहे. टोयोटा कंपनी सध्या Battery Electric Vehicle ला प्रोमोट करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये नवीन बिझनेस मॉडेल आणि 2022 पर्यंत लाँच होणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. (Toyota launches C+pod ultra-compact electric car; Two-seater BEV with 150 km range)

नवीन C+pod एक इलेक्ट्रिक टू सीटर BEV आहे. ही कार टोयोटाने मोबिलिटी ऑप्शन म्हणून लाँच केली आहे. या कारमधील इलेक्ट्रिक मोटर 9.2 kW आणि 56 Nm टॉर्क जनरेट करते. या गाडीचं वजन केवळ 690 किलो आहे. 5-16 तास चार्ज केल्यानंतर ही कार 60 किमी प्रति तास इतक्या वेगाने धावते.

कशी आहे Toyota C+pod?

ही कार आकारानेही लहान आहे. या कारची लांबी केवळ 2,490mm, रुंदी 1290 mm आणि उंची 1,550 mm आहे. या कारमध्ये केवळ दोन व्यक्ती बसू शकतात. या कारचे एक्सटीरियर पॅनल्स प्लॅस्टिकपासून बनवले आहेत. त्यामुळे कारचे वजन कमी करण्यात मदत मिळाली आहे. Toyota C+pod ची साइज छोटी असल्याने कारचे इंटीरियर सुद्धा कॉम्पॅक्ट आहे.

सामान्य ग्राहकांना वाट पाहावी लागणार

या कारच्या इंस्ट्रूमेंट पॅनलमध्ये स्पीडोमीटर सोबत अन्य फंक्शनल इक्यूपमेंट यांसारखे फिचर्स देण्यात आहेत. तसेच स्विचला सेंटर पॅनेल दिले आहे. सध्या या कारला केवळ कॉर्पोरेट्ससाठी बाजारात उतरवले आहे. सामान्य ग्राहकांसाठी 2022 पर्यंत ही कार लाँच केली जाऊ शकते.

किंमत

टोयोटाने ही कार दोन व्हेरियंट्समध्ये लाँच केली आहे. ज्यात X आणि G व्हेरियंट्सचा समावेश आहे. एक्स व्हेरियंटची किंमत 1.65 लाख मिलियन येन म्हणजेच जवळपास 11.73 लाख रुपये आहे आणि जी व्हेरियंटची किंमत 1.71 मिलियन म्हणजेच 12.2 लाख रुपये इतकी आहे.

जबरदस्त इलेक्ट्रिक कार लाँचिंगच्या मार्गावर

बंगळुरूची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Pravaig Dynamics ने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक कार प्रॅवाइग एक्सटिन्शन एमके 1 (Pravaig Extinction Mk1) लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच कंपनीने या कारबाबतची काही माहिती सादर केली आहे. 2021 च्या सुरूवातीला ही कार लॉन्च होऊ शकते. विशेष म्हणजे ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमीपर्यंत धावेल असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे कारप्रेमींच्या मनात ही कार नक्की बसणार असं बोललं जात आहे.

30 मिनिट चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 300 किलोमीटरपर्यंत धावेल. Pravaig Dynamics ने म्हटलं आहे की, या कारचा कमाल वेग 196 किलोमीटर प्रति तास इतका आहे. ही कार अवघ्या 5.4 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका स्पीड पकडते. सोबतच भारतातील आघाडीच्या कार कंपन्याही लवकरच इलेक्ट्रिक कार्स लाँच करणार आहेत. महिंद्रा आणि मारुती सुझुकी या दोन भारतीय कंपन्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

संबंधित बातम्या

देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली, टाटा मोटर्सच्या Nexon EV च्या 2,200 युनिट्सची विक्री

पेट्रोल पंपप्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘चार्जिंग’ स्टेशन उघडणार, चार्जिंगसाठी येणार ‘इतका’ खर्च!

2021 मध्ये येणार जबरदस्त इलेक्ट्रिक कार, एकदाच चार्ज करून 500 किमी धावणार

आता इलेक्ट्रिक कार चार्ज करावी लागणार नाही, ही कंपनी बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिस सुरु करणार

(Toyota launches C+pod ultra-compact electric car; Two-seater BEV with 150 km range)

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.