टाटाची इलेक्ट्रिक एसयूव्ही महिंद्राला टक्कर देणार, ‘या’ दिवशी बाजारात धडकणार
टाटा आपली सर्वात मोठी इलेक्ट्रिक एसयूव्ही हॅरियर ईव्ही 3 जून रोजी अनावरण करणार आहे. महिंद्रा एक्सईव्ही 9E आणि बीवायडी अॅटो 3 सारख्या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीला टक्कर देणार आहे. एसयूव्हीचे डिझाइन उत्तम असणार असून फीचर्स खूप चांगले असणार आहेत.

लाँचिंगपूर्वीच टाटाने हॅरियर ईव्हीचा टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे. टाटा हॅरियर ईव्ही 3 जून रोजी भारतीय कार कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओसाठी नवीन फ्लॅगशिप म्हणून लाँच होणार आहे. टीझरमध्ये ही एसयूव्ही डोंगराच्या बाजूला दिसत आहे, जी सज्ज आहे. मात्र, अद्याप हे गूढ उलगडलेले नसून हॅरियर ईव्हीला उंच चढाई करताना दाखवले जाईल, ज्याची संपूर्ण जाहिरात नंतर प्रसिद्ध केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
टाटा हॅरियर ईव्हीमध्ये परफॉर्मन्स, अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि ऑल व्हील ड्राइव्ह (एडब्ल्यूडी) सिस्टीम एकत्र आणण्यासाठी कंपनीच्या नवीन अॅक्टी ईव्ही प्लस आर्किटेक्चरचा वापर केला जाणार आहे. टाटाने अद्याप पूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जारी केले नसले तरी या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीकडून खूप अपेक्षा ठेवता येतील.
रेंज 500 किमी असेल
टाटा हॅरियर ईव्हीची एक्स शोरूम किंमत 30 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. महिंद्रा एक्सईव्ही 9E आणि बीवायडी अॅटो 3 सारख्या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीला टक्कर देणार आहे. टाटाने म्हटले आहे की, हॅरियर ईव्ही ऑल-व्हील ड्राइव्ह आणि ड्युअल मोटरसह येईल. हे फीचर्स ब्रँडची पहिली ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. यात एक मोठा बॅटरी पॅक असण्याची शक्यता आहे जी एकदा चार्ज केल्यावर 500 किमीपेक्षा जास्त रेंज देऊ शकते. सिंगल-मोटर, फ्रंट-व्हील-ड्राइव्ह पर्यायासह अधिक परवडणारी एडिशन देखील उपलब्ध असू शकते.
हॅरियर ईव्हीचे डिझाइन काय असेल?
टाटा हॅरियर ईव्हीचे डिझाइन डिझेल मॉडेलसारखेच असेल. यात इलेक्ट्रिक मॉडेलला वेगळे करणारे खास घटक असतील. यात क्लोज्ड फ्रंट ग्रिल असेल, जे इलेक्ट्रिक कारसाठी कॉमन डिझाइन आहे. टाटा नेक्सॉन ईव्हीवर दिसणाऱ्या व्हर्टिकल स्लॅट्सप्रमाणेच फ्रंट आणि रिअर बंपरला नवीन डिझाइन दिले जाऊ शकते. याशिवाय एसयूव्हीमध्ये एरो अलॉय व्हील्स असू शकतात, जे रेंज आणि स्ट्रेंथ वाढवतात. एलईडी दिव्यांमध्ये कनेक्टेड डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) आहेत आणि मागील दिवे स्टँडर्ड हॅरियरसारखे आहेत.
‘ही’ एसयूव्ही आधुनिक सुविधांनी सुसज्ज
हॅरियर ईव्हीच्या इंटिरियरमध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्स असण्याची शक्यता आहे. यात 12.3 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, 10.25 इंचाचे पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ आणि हवेशीर फ्रंट सीट असू शकतात. प्रीमियम अपग्रेडमध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि पॉवर्ड टेलगेटचा समावेश असू शकतो. सुरक्षिततेसाठी एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग, 360 डिग्री कॅमेरा सिस्टम आणि लेव्हल 2 एडीएएस टेक्नॉलॉजी मिळेल.
