TATA Punch मध्ये मिळणार दमदार फीचर्स, अवघड रस्त्यांवरही न थांबता प्रवास

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 29, 2021 | 3:58 PM

टाटा मोटर्सने त्यांची एसयूव्ही ‘पंच’ (SUV Punch) सादर केली आहे. ही तीच SUV आहे जिला HBX म्हटले जात होते. पण कंपनीने या कारचे नाव पंच असे बदलले आहे.

TATA Punch मध्ये मिळणार दमदार फीचर्स, अवघड रस्त्यांवरही न थांबता प्रवास

मुंबई : टाटा मोटर्सने त्यांची एसयूव्ही ‘पंच’ (SUV Punch) सादर केली आहे. ही तीच SUV आहे जिला HBX म्हटले जात होते. पण कंपनीने या कारचे नाव पंच असे बदलले आहे. भारतीय ऑटो कंपनी टाटा मोटर्सने सोमवारी सांगितले की, ते सणासुदीच्या काळात आपली मिनी एसयूव्ही पंच लॉन्च करेल. पंच एसयूव्ही H2X कॉन्सेप्टवर आधारित आहे, जी टाटा मोटर्सने ऑटो एक्सपो 2020 मध्ये सादर केली होती. (Tata Punch SUV can launch with new Features like Traction Modes and Hill Descent)

ही कार कंपनीच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉनअंतर्गत असेल आणि या वर्षी दिवाळीच्या आसपास बाजारात येण्याची शक्यता आहे. “सणासुदीच्या काळात ही कार नॅशनल लाँचिंगसाठी सज्ज आहे. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, स्पोर्टिंग डायनॅमिक्ससह टफ यूटिलिटीचं मिश्रण या कारमध्ये पाहायला मिळेल.

टाटा मोटर्सने पुष्टी केली आहे की, पंच आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या अपोझिट जॅक-अप हॅचबॅकपेक्षा अधिक श्रेष्ठ असेल आणि या एसयूव्हीमध्ये अनेक दमदार फीचर्स असतील. कंपनीने सूचित केले आहे की, या कारमध्ये काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स मिळतील जसे की, ट्रॅक्शन मोड (सँड, रॉक, मड), हिल डिसेंट कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट, तसेच एसयूव्ही क्रेडेन्शियलसारखे काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स मिळतील. ही कार पुढच्या बाजूला 185 मिमीच्या हाय ग्राउंड क्लिअरन्स आणि 16 इंच अलॉय व्हीलसह येईल.

टाटा पंच ALFA-ARC (Agile Light Flexible Advanced Architecture) वर बनवलेली पहिली SUV असेल आणि त्यात Impact 2.0 डिझाईन लँग्वेजची योजना आहे. ही कंपनीच्या लाइन-अपमधील नवीन एंट्री-लेव्हल एसयूव्ही आहे आणि भारतातील नेक्सॉन सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या खाली सेट केली जाईल.

टाटाच्या सिग्नेचर स्प्लिट लायटिंग डिझाइनसह या कारचा फ्रंट एंड आक्रमक आहे. टाटा लोगोमधील काळ्या पॅनेलमध्ये ट्राय-अॅरो पॅटर्न देखील आहे, ज्याभोवती एलईडी डे-टाइम रनिंग लँप आहे. तर मुख्य हेडलॅम्प युनिट्स खाली स्थित आहेत, जे प्रोजेक्टर लाइटसह येतील. समोरचा बहुतेक भाग जड कव्हरने झाकलेला आहे आणि त्याला एक मोठा ट्राय-अॅरो डिझाईन ग्रिल आणि मोठे गोल फॉग लॅम्प मिळतात.

दमदार इंजिन

कंपनीने पंचचे स्पेसिफिकेशन्स उघड केले नाहीत, तथापि, काही वृत्तांमध्ये दावा करण्यात आला आहे की, नवीन पंच 1.2-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिनसह येईल, जे Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकला पॉवर देतं. पेट्रोल मिल 85 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड आणि पर्यायी AMT युनिटसह येण्याची शक्यता आहे. लॉन्च झाल्यावर, नवीन टाटा पंच मारुती सुझुकी एस-प्रेसो आणि रेनॉल्ट क्विडशी स्पर्धा करेल. गेल्या वर्षी ऑटो एक्स्पो दरम्यान टाटा मोटर्सने पंचला HBX कॉन्सेप्ट मायक्रो-एसयूव्ही म्हणून पहिल्यांदा प्रदर्शित केली. पंच एसयूव्ही मारुती सुझुकी इग्निस आणि आगामी ह्युंडई मायक्रो-एसयूव्हीला टक्कर देईल, या कारला कॅस्पर म्हटले जाण्याची शक्यता आहे.

टाटाच्या एसयूव्ही फॅमिलीत चौथ्या वाहनाची एंट्री

तथापि, कंपनीने येथे वाहनाबद्दल फारशी माहिती सादर केलेली नाही. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले की, “टाटा पंच, हे नावाप्रमाणेच, एक एनरजेटिक व्हीकल आहे ज्यामध्ये कुठेही जाण्याची क्षमता आहे. ते पुढे म्हणाले की, ही कार ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल. कॉम्पॅक्ट सिटी कारमध्ये एसयूव्ही फीचर्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार बनवण्यात आली आहे. पंच आमच्या एसयूव्ही फॅमिलीमधील चौथे वाहन आहे. अशा परिस्थितीत, आता आम्ही रेंज ऑप्शन वाढवण्याचा विचार करीत आहोत.

इतर बातम्या

गाड्यांच्या नंबर प्लेटवर MH ऐवजी ‘BH’ दिसणार, नव्या पॉलिसीचा ‘या’ वाहनधारकांना फायदा

मुंबई मनपाच्या ताफ्यात 5 नवी इलेक्ट्रिक वाहनं, स्वच्छ मुंबईसाठी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत व्हिजन-2030 ऑनलाईन सर्वेक्षण सुरु

डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करा; नितीन गडकरींच्या कंपन्यांना सूचना

(Tata Punch SUV can launch with new Features like Traction Modes and Hill Descent)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI