AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात टेस्लाचे पहिले शोरुम, 60 लाख रुपयांमध्ये मिळणार जबरदस्त कार

Tesla Showroom in Mumbai: भारतात टेस्लाची एंट्री सामान्य नाही. भारतात टेस्लाला चीनच्या बीवायडीसारख्या कंपन्यांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. बीवायडी भारतीय बाजारात आधीपासून आहे. आता टेस्लाला आपले स्थान निर्माण करावे लागणार आहे.

भारतात टेस्लाचे पहिले शोरुम, 60 लाख रुपयांमध्ये मिळणार जबरदस्त कार
| Updated on: Jul 15, 2025 | 2:39 PM
Share

Tesla Showroom in Mumbai: जगातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रीक व्हिकल कंपनी टेस्लाने भारतात पाऊल ठेवले आहे. टेस्लाने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स (बीकेसी) मध्ये देशातील पहिले शोरुम उघडले आहे. भारतीय ईव्ही मार्केटमध्ये ही कंपनीची दमदार एन्ट्री आहे. टेस्ला Model Yची किंमत, फीचर्स सर्व काही जाणून घेऊ या.

भारतात टेस्लाची सुरुवात Model Y SUV पासून होत आहे. त्याच्या Model Y Rear-Wheel Drive ची किंमत जवळपास ६० लाख रुपये आहे. तसेच दुसरे व्हेरिएंट Long Range Rear-Wheel Drive ची किंमत ६८ लाख रुपये आहे. या कार टेस्लाच्या शंघाई येथील कंपनीतून भारतात आणल्या जात आहे. कंपनीने ८.३ कोटी रुपयांची एक्सेसरीज, सुपरचार्जर आणि इक्विपमेंटसुद्धा चीन आणि अमेरिकेतून भारतात आयात केले आहेत. हे सुपरचार्जर मुंबईच्या जवळपासच्या भागात लावण्यात येणार आहे. ज्यामुळे ग्राहकांची सुविधा होणार आहे.

भारतात किंमत जास्त का?

टेस्लाचे सर्वात प्रसिद्ध Model Y SUV भारतात शंघाईमधून आयात केले जात आहे. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लागले आहे. प्रत्येक कारवर जवळपास २१ लाख रुपयांपेक्षा जास्त कर द्यावा लागत आहे. भारतात ही कार तयार झाली असती तर तिची किंमत ४० हजार डॉलरपेक्षाही (जवळपास ३५ लाख) कमी असती. कारण त्यावर सरळ ७० टक्के कर लागला असता. परंतु दुसऱ्या देशातून आयात केली जात असल्याने ही कार भारतात महाग आहे.

भारतात टेस्लाची एंट्री सामान्य नाही. भारतात टेस्लाला चीनच्या बीवायडीसारख्या कंपन्यांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. बीवायडी भारतीय बाजारात आधीपासून आहे. आता टेस्लाला आपले स्थान निर्माण करावे लागणार आहे.

टेस्ला Model Y ची ऑनलाइन बुकींग?

  • SUV Model Y ची ऑनलाइन बुकींग टेस्लाच्या ऑफिशियल वेबसाइट Tesla India वरुन करता येईल.
  • वेबसाइटवर जाऊन Model Y वर क्लिक करा. व्हेरिएंटची निवड करा. जसे Rear-Wheel Drive किंवा Long Range
  • कारचा रंग, इंटीरियर डिजाइन, व्हिल्स आणि सॉफ्टवेअर फीचर्स जसे FSD (Full Self Driving) ची निवड करा. बुकींगसाठी लागणारी रक्कम ऑनलाइन भरा.
  • पेमेंट केल्यावर ऑनलाइन कन्फर्मेशन मेल किंवा SMS येईल.
  • टेस्लाची टीम तुमचे टेस्ट ड्राइव्ह शेड्यूल करतील. कार उपलब्ध होताच तुम्हाला डिलिव्हरी तारीख सांगितली जाईल.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.