रॉयल एनफिल्डच्या तीन नव्या बाईक्स लवकरच बाजारात, टेस्टिंगदरम्यान ताशी 120 किमीच्या वेगासह दिसला शानदार लूक

रॉयल एनफिल्डच्या तीन नव्या बाईक्स लवकरच बाजारात, टेस्टिंगदरम्यान ताशी 120 किमीच्या वेगासह दिसला शानदार लूक (Three new Royal Enfield bikes to hit the market soon)

  • Updated On - 1:12 pm, Fri, 26 February 21
रॉयल एनफिल्डच्या तीन नव्या बाईक्स लवकरच बाजारात, टेस्टिंगदरम्यान ताशी 120 किमीच्या वेगासह दिसला शानदार लूक
रॉयल एनफिल्डच्या तीन नव्या बाईक्स लवकरच बाजारात

नवी दिल्ली : देशातील आघाडीची बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने बाजारात नवनव्या बाईक्स दाखल करण्याचा धडाका लावला आहे. ग्राहकांची बदलती आवड विचारात घेत कंपनी अद्ययावत बाईक्स बाजारात आणणार आहे. देशाच्या रस्त्यांवर लवकरच तीन नव्या बाईक्सची एण्ट्री होणार आहे. अलीकडेच कंपनीच्या चाचणीदरम्यान रस्त्यावर तीन नवीन बाईक्सचा शानदार लूक दिसला. तिन्ही बाईक्स सध्याच्या कॉन्टिनेंटल जीटी 650 आणि इंटरसेप्टर 650 सारख्या 650 सीसी प्लॅटफॉर्मवर आधारित असतील. (Three new Royal Enfield bikes to hit the market soon)

क्लासिक आणि मेटोरची 650 सीसी आवृत्ती असू शकते

विशेष म्हणजे कंपनी 650 सीसी क्रूझर बाइक्ससह दोन भिन्न दिसणार्या बाईक्सचीही चाचणी करीत आहे. या बाइक्सना रॉयल एनफील्ड मेटोर 650 आणि क्लासिक 650 म्हटले जात आहे. तथापि, कंपनीकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यात एक गोल एलईडी टेल लॅम्प आणि इंडिकेटर, पिलियन सीट आणि ग्रॅब रेल मेटोर 350 ची आठवण होते. आरई 650 सीसी क्रूझरमध्ये स्लो-स्लंग स्टाईल आणि एर्गोनॉमिक्स आहेत. या प्रकारात विंडस्क्रीन आणि क्रॅश गार्ड होते. इतर मॉडेलमध्ये क्रोम-फेन्डर उपलब्ध होते.

650 सीसीमध्ये क्रूझर बाइक लूक्समध्ये प्रिमियम

नवीन मोटरसायकल्स रॉयल एनफील्डच्या 650 सीसी इंजिनसह सुसज्ज आहेत. 650 सीसी क्रूझर मोटारसायकल्समध्ये अपसाइड फ्रंट फॉर्क व मागील बाजूस दोन शॉक अ‍ॅब्जॉर्बर असतील. बाईक्सच्या पुढच्या बाजूला 19 इंचाची चाके आणि मागील बाजूस 17 इंचाची चाके देण्यात आली आहेत. नुकत्याच पुढे आलेल्या व्हिडिओमध्ये 650 सीसी बाईकचा अत्यंत प्रीमियम लूक आहे. लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बाईकची बॉबर स्टाईल तयार केली आहे. ब्रेकिंगसाठी बाईकला दोन्ही बाजूंनी डिस्क ब्रेक आणि मानक म्हणून ड्युअल चॅनेल एबीएस मिळेल. नवीन मोटरसायकलला सेमी-डिजिटल इंन्स्ट्रूमेंट कन्सोल, तसेच ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टम आणि स्लिपर क्लचदेखील मिळेल.

ताशी 120 ते 130 च्या वेगाने टेस्टिंग

रॉयल एनफिल्डच्या नव्या बाईक्सची नुकतीच ताशी 120 ते 130 किलोमीटरच्या वेगाने चाचणी करण्यात आली़ कंपनीने स्पोर्ट केलेल्या मॉडेललाही ड्युअल एक्झॉस्ट दिले आहे. नव्या बाईक्स आरईच्या 650 सीसी इंजिनसह सुसज्ज आहेत. हे ट्विन-सिलेंडर इंजिन 47 बीएचपीची पॉवर आणि 52 एनएमचा टार्क तयार करण्यास सक्षम आहे. (Three new Royal Enfield bikes to hit the market soon)

इतर बातम्या

Video : बाॅलिवूडचा दबंग खान राखीच्याही मदतीला गेला धावून, आईने मानले आभार!

Pooja Chavan case : 18 दिवसात 18 योगायोग आणि 18 विसंगती!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI