भारतात पहिल्यांदाच टोयोटाच्या हायड्रोजन कारची होणार रोड टेस्टिंग, रिफिलिंगला फक्त इतका वेळ
भारतात पहिल्यांदाच हायड्रोजन फ्युएल सेल कारची रोड टेस्टिंग सुरू होणार आहे. टोयोटाने काही वर्षांपूर्वी पहिली हायड्रोजनवर चालणारी कार सादर केली होती, परंतु आतापर्यंत तिची चाचणी घेण्यात आली नव्हती. चला तर मग आजच्या लेखात आपण या कारबद्दल जाणून घेऊयात.

टोयोटाने भारताच्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेशी (NISE)करार केला आहे. ज्यामुळे सरकारी संशोधन संस्थेला त्यांच्या हायड्रोजन इंधन-सेलमुळे टोयोटा मिराई कारची भारतात पहिल्यांदाच रोड टेस्टिंग सुरू करतील. कारण याआधी टोयाटो कंपनीने त्यांची पहिली हायड्रोजनवर कार सादर केली होती, परंतु आतापर्यंत तिची चाचणी घेण्यात आली नव्हती. तर याबाबतीत हा करार नवी दिल्लीत करण्यात आला. भारतात विविध प्रकारच्या ड्रायव्हिंग आणि हवामान परिस्थितीत हायड्रोजनवर चालणाऱ्या प्रवासी कारची चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
टोयोटाने काही वर्षांपूर्वी पहिली हायड्रोजनवर चालणारी कार सादर केली
NISE कारची चाचणी विविध पॅरामीटर्सवर करेल, ज्यामध्ये मायलेज, रेंज, ड्रायव्हिंग अनुभव, हायड्रोजन रिफिलिंग प्रक्रिया आणि वेगवेगळ्या रस्त्यांच्या परिस्थिती आणि तापमानात कामगिरी, तसेच धूळ, ट्रफिक आणि इतर सामान्य भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीचा कार टेस्टिंगमध्ये किती फरक पडतो हे देखील जाणून घेणार आहेत. यानंतरच कारची खास वैशिष्टये आणि लाँच बद्दल माहिती दिली जाईल.
टेस्टिंग हे मोठ्या योजनेचा एक भाग आहे.
हा पायलट प्रोजेक्ट हायड्रोजन-आधारित ऊर्जा प्रणालीसाठी सरकारच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. MNRE चे मिशन डायरेक्टर अभय भगरे यांनी सांगितले की, हा प्रकल्प जड वाहनांच्या पायलटपेक्षा जास्त हायड्रोजन ऊर्जा वाढवण्याची सुरुवात आहे.
एकाच वेळी 650 किमी धावतो
टोयोटाने NISE ला त्यांची दुसरी पिढीची मिराई कार दिली आहे, जी कॉम्प्रेस्ड हायड्रोजनवर चालते आणि फक्त पाण्याची वाफ उत्सर्जित करते. कंपनीच्या मते, ही कार अंदाजे 650 किमी प्रवास करू शकते आणि 525.4 किलो हायड्रोजन रिफिलिंगने फूल होते. तर हायड्रोजन रिफिलिंगला 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो, ही प्रक्रिया पेट्रोल किंवा डिझेल रिफिलिंगसारखीच आहे. या टेस्टिंगमधून निर्माण होणारा डेटा भारतात हायड्रोजनवर चालणाऱ्या कारवरील भविष्यातील धोरणे तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, कारण सध्या या क्षेत्रासाठी कोणताही व्यावसायिक मार्ग नाही. हा प्रकल्प अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे, परंतु भविष्यात हायड्रोजन प्रवासी कार स्वीकारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
हायड्रोजन कारची आवश्यकता का आहे?
कार्यक्रमात बोलताना टोयोटाचे कंट्री हेड आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट विक्रम गुलाटी यांनी सांगितले की, भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि भविष्यात ऊर्जेचा वापर लक्षणीयरीत्या वाढेल. ते म्हणाले, “जर आपल्याला ऊर्जा स्वावलंबी व्हायचे असेल, विकसित भारताचे ध्येय साध्य करायचे असेल आणि प्रदूषण कमी करायचे असेल तर रिन्यूएबल ऊर्जा आवश्यक आहे.” त्यांनी असेही सांगितले की, भारताच्या रिन्यूएबल ऊर्जा टार्गेटमध्ये गतिशीलता क्षेत्रात कार्बन कमी करण्यात हायड्रोजनची मोठी भूमिका असेल.
