AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc-जिओस्टार पार्टनरशीप ब्रेक? वर्ल्ड कप मॅच आवडत्या App वर पाहता येणार नाहीत? अंतिम निर्णय काय?

Jiostar and Icc Deal : बीसीसीआय आणि आयसीसीकडून ब्रॉडकास्टिंग आणि डिजीटल राइट्स घेण्यासाठी अनेकांमध्ये चुरस असते. जिओस्टारने आयसीसीकडून 2024 साली 2027 पर्यंत हजारो कोटी रुपये मोजून हक्क घेतले होते. मात्र जिओस्टार आर्थिक नुकसान झाल्याने ते हा करार मोडणार असल्याची चर्चा रंगली होती.

Icc-जिओस्टार पार्टनरशीप ब्रेक? वर्ल्ड कप मॅच आवडत्या App वर पाहता येणार नाहीत? अंतिम निर्णय काय?
Icc and Jiostar Broadcats RightsImage Credit source: Getty Images
| Updated on: Dec 13, 2025 | 2:04 AM
Share

आयसीसीने अवघ्या काही दिवसांपूर्वी आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे एकूण 7 शहरातील 8 स्टेडियममध्ये होणार आहेत. भारतातील 5 शहरात वर्ल्ड कप सामन्यांचा थरार रंगणार आहे. तर श्रीलंकेतील 2 शहरातील 3 स्टेडियममध्ये सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी ते मार्च 2026 दरम्यान होणार आहे. गुरुवारी 11 डिसेंबरपासून स्पर्धेच्या तिकीटांच्या ऑनलाईन विक्रीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे.

पार्टनरशीप कायम राहणार

वर्ल्ड कप स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु असताना आयसीसी आणि ब्रॉडकास्टर्स जिओस्टार्स यांची ‘पार्टनरशीप’ ब्रेक होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्थिक तोटा झाल्याने जिओस्टारने आयसीसीसोबतचा हा करार मोडल्याचं म्हटलं जात होतं. मात्र त्यानंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळालं आहे. आयसीसी आणि जिओस्टारने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे. आयसीसी आणि जिओस्टारची पार्टनरशीप कायम राहणार असल्याचं या प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट करण्यात आलं आहे. जिओस्टारकडे भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धेच्या ऑनलाईन प्रसारणाचे हक्क (Brodacasting Rights) आहेत.

आयसीसी-जिओस्टारचा 4 वर्षांचा करार

इकॉनमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, जिओने आर्थिक नुकसान होत असल्याने आयसीसी सोबत 2027 पर्यंत केलेला करार मोडणार असल्याचा दावा करण्यात आला होता. जिओस्टारने 2024 ते 2027 दरम्यान भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धेच्या ब्रॉडकास्टिंग राइट्ससाठी जवळपास 27 हजार कोटी रुपये मोजले आहेत.

इकॉनमिक टाईम्सच्या रिपोर्टमुळे क्रीडा वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. तसेच सामान्य क्रिकेट चाहत्यांना जिओस्टारद्वारे ठराविक मर्यादेपर्यंत मोफत सामने पाहायला मिळतात. तसेच काही रुपये मोजून सोयीनुसार जिओचं स्बस्क्रीपशन घेता येतं. मात्र जिओस्टारने हा करार रद्द केल्यास सामना पाहण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील, अशी चाहत्यांनी भीती होती. मात्र आयसीसी आणि जिओस्टारच्या प्रसिद्धीपत्रकामुळे चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे.

प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलं?

आयसीसी आणि जिओस्टारने संयुक्त प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे. जिओस्टार करारासाठी आणि जबाबदारीसाठी पूर्णपणे बांधील आहे. आयसीसी आणि जिओस्टार भारतीय चाहत्यांसाठी आगामी स्पर्धेचं विनाखंड कव्हरेज करण्याकडे लक्ष देत आहे”, अशी हमी या संयुक्त प्रसिद्धपत्रकात दिली आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.