कारसाठी हवा ‘0001’ लकी नंबर तर मोजावे लागेल एवढी रक्कम, VIP नंबरची शुल्क वाढ
व्हिआयपी नंबर शुल्क वाढीमुळे राज्य परिवहन विभागाला 2017-18 या आर्थिक वर्षात 1,83,794 कार नोंदणीमुळे 139.20 कोटी रुपये मिळाले होते.
आपल्या कारसाठी व्हिआयपी नंबर मिळविणे आता चांगलेच महागात पडणार आहे. कारण आपली लकी नंबर कारच्या नंबरप्लेटवर येण्यासाठीची फि परिवहन विभागाने वाढविली आहे. अब्जाधीश आणि मोठे व्यावसायिक, राजकीय नेते आणि सेलिब्रिटी यांनी आपला लकी नंबर कारला ठेवण्याचा शौक असतो. तुम्हाला जर आता लकी नंबरप्लेट हवी असेल तर सहा लाख रुपये मोजावे लागतील. महाराष्ट्रात लकी नंबरप्लेटसाठी तगडी रक्कम मोजावी लागणार आहे.
व्हिआयपी नंबरची वाढती मागणी पाहून यातून कमाईचा मार्ग गवसल्याने राज्य परिवहन विभागाने व्हिआयपी नंबरची फी वाढविली आहे.या दरवाढीनंतर मुंबई, पुणे आणि अन्य जादा मागणी असणाऱ्या शहरात चार चाकी वाहनांत सर्वात लोकप्रिय ‘0001’ नंबरचे शुल्क आता सहा लाख रुपये केले आहे. हा निर्णय 30 ऑगस्ट रोजी एका अध्यादेशाद्वारे परिवहन विभागाने घेतला आहे.
नवी दररचना जुन्या दर रचनेपेक्षा अधिक आहे. चार चाकी वाहनांच्या ‘0001’ नंबरची फी 3 लाख रुपये होती आता ती वाढून 5 लाख रुपये झाली आहे. दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी ही फी आता सध्याच्या 50,000 रुपयांवरुन वाढून 1 लाख रुपये झाली आहे.मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, आणि कोल्हापुर सारख्या जादा मागणी असलेल्या शहरात चार चाकी किंवा जास्त चाकांच्या वाहनांना ‘0001’ ची फी पूर्वी चार लाख होती ती आता सहा लाख रुपये होणार आहे.
जर कोणाला ‘0001’ नंबर ऐवजी आपल्या वाहनासाठी सिरीजच्या बाहेरचा नंबर हवा असेल तर त्यासाठी 18 लाख रुपये भरावे लागणार आहे. ही किंमत एका मिड-सेगमेंट कारच्या किंंमती एवढी आहे. याआधी आऊट ऑफ सिरीजच्या व्हिआयपी नंबरसाठी 12 लाख रुपये फी होती.
दोन चाकी -तीन चाकी वाहनांना किती शुल्क ?
महाराष्ट्र सरकारने प्रत्येक रजिस्ट्रेशन सीरीजच्या 240 व्हीआईपी नंबरांसाठी उदा. ‘0009’, ‘0099’, ‘0999’, ‘9999’, आणि ‘0786’ सारख्या व्हीआयपी नंबरसाठीची फी देखील चार चाकी आणि अधिक चाकी वाहनांसाठी फी 1.5 लाख रुपयाहून वाढवून 2.5 लाख रुपये केली आहे. दोन चाकी आणि तीन चाकी वाहनासाठी ही फी 20,000 रुपयांहून वाढवून 50,000 रुपये केली आहे.
अन्य लोकप्रिय नंबरची फी देखील वाढली आहे. 16 लोकप्रिय नंबरसाठी नवीन शुल्क चार चाकी वाहनांसाठी 70,000 रुपयांवरुन वाढवून रु 1 लाख रुपये आणि दोन चाकी वाहनांसाठी 15,000 रुपयांवरुन वाढवून 25,000 रुपये केले आहे.या व्यतिरिक्त 49 अन्य नंबरासाठी देखील फीस वाढवून 50,000 रुपयांवरुव थेट 70,000 रुपये केली आहे आणि दोन आणि तीन चाकांच्या वाहनासाठी 15,000 रुपये केली आहे.