AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाँचिंगआधीच MG Astor चे व्हेरएंट्स लीक, जाणून घ्या अपकमिंग SUV मध्ये काय असेल खास?

एमजी मोटर्सने ऑक्टोबर 2021 मध्ये लॉन्च होण्यापूर्वी MG Astor SUV सादर केली आहे. कंपनीची आगामी फोर-व्हीलर ही भारतातील पहिली आर्टिफिशियली इंटेलिजेंट (AI) कार असण्याची अपेक्षा आहे.

लाँचिंगआधीच MG Astor चे व्हेरएंट्स लीक, जाणून घ्या अपकमिंग SUV मध्ये काय असेल खास?
| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 11:36 AM
Share

मुंबई : एमजी मोटर्सने ऑक्टोबर 2021 मध्ये लॉन्च होण्यापूर्वी MG Astor SUV सादर केली आहे. कंपनीची आगामी फोर-व्हीलर ही भारतातील पहिली आर्टिफिशियली इंटेलिजेंट (AI) कार असण्याची अपेक्षा आहे. Astor गेल्यात आठवड्यात एमजी शोरूममध्ये प्रदर्शित झाली आहे. तथापि, ब्रँड लॉन्च होण्यापूर्वी या कारबद्दल अधिक तपशील शेअर करण्याची शक्यता आहे. भारतातील ग्राहक तांत्रिकदृष्ट्या MG Astor SUV लाँच होण्याची वाट पाहत आहेत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी कारचा प्रत्येक पैलू सादर करणार आहोत. (Variants of MG Astor leaked before launch, find out what will be special in upcoming SUV)

एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) नुकताच आपल्या MG Astor कारवरून पडदा हटवला आहे. कंपनीच्या सध्याच्या MG ZS EV ची ही पेट्रोल आवृत्ती आहे. पण कंपनीने त्यात अशी अनेक वैशिष्ट्ये दिली आहेत ज्यामुळे ती देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्स (AI) वाली कार ठरते. MG Astor मध्ये, कंपनीने पर्सनल AI असिस्टंट दिलं आहे. या कारच्या पर्सनल AI असिस्टंटला पॅरालिम्पिक खेळाडू आणि खेलरत्न दीपा मलिक यांनी आवाज दिला आहे. एसयूव्ही विभागातील ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्स (AI) कार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

एसयूव्ही लॉन्च करण्यापूर्वी Astor ची ट्रिम रेंज टाइप-अप्रूव्हल सर्टिफिकेटद्वारे ऑनलाइन लीक झाली आहे. MG Astor दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल, ज्यात 1.5 लीटर NA पेट्रोल मोटर (110 PS / 144 Nm) आणि 1.3 लीटर टर्बो-पेट्रोल मोटर (140 PS / 220 Nm) यांचा समावेश असेल. पहिल्या इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन किंवा 8 स्टेप सीव्हीटी असू शकते, तर नंतरचे 6 स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Astor 1.5L MT एकूण 6 ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध होईल, ज्यात स्टाईल, सुपर, स्मार्ट एसटीडी, स्मार्ट, शार्प एसटीडी आणि शार्प ट्रिम लेव्हल्सचा समावेश असेल.

मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये कांटे की टक्कर

मिड-साइज एसयूव्ही सेगमेंट भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात सर्वात स्पर्धात्मक आहे. क्रेटा ते सेल्टॉस आणि कुशक पर्यंत, येथे प्रत्येक वाहनाचा स्वतःचा एक यूएसपी आहे. अशा परिस्थितीत, एमजी मोटर इंडिया अॅस्टरला अद्वितीय वैशिष्ट्यांसह पॉवर-पॅक पर्याय म्हणून सादर करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

फीचर्स

ग्राहकांना तीन इंटीरियर थीममधून आवडती थीम निवडता येईल. त्यापैकी एक म्हणजे ड्युअल-टोन संगरिया रेड. MG Astor मध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. यामध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा समावेश आहे. इतर स्टँडर्ड फीचर्समध्ये JioSaavn अॅप, आणि MapMyIndia द्वारे मॅप्स आणि नेव्हिगेशन सेवा समाविष्ट आहेत.

एमजी मोटर इंडिया Astor ला हवेशीर फ्रंट सीट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल सारख्या सुविधांनी सुसज्ज करण्याची अपेक्षा आहे. एमजी मोटर इंडिया त्याच्या कारमध्ये इंडस्ट्रीमधील पहिला पर्सनल असिस्टंट ऑफर करत आहे जे अमेरिकन फर्म स्टार डिझाईनने बनवले आहे. या विभागात पहिली ऑटोनॉमस लेव्हल 2 टेक्नोलॉजी दिली जात आहे.

MG Astor ची किंमत

MG Astor ची किंमत आगामी सणासुदीच्या हंगामात जाहीर होण्याची शक्यता आहे. एसयूव्हीची किंमत 10 लाख ते 16 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस किंवा टाटा हॅरियरशी Astor ला स्पर्धा करावी लागेल.

इतर बातम्या

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी पेपर सोबत बाळगण्याचं आता नो टेन्शन, DigiLocker ला मिळाली मान्यता

Tata चा CNG गाड्यांच्या धडाका, अवघ्या 5 हजारात बूक करा किफायतशीर कार

(Variants of MG Astor leaked before launch, find out what will be special in upcoming SUV)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.