लाँचिंगपूर्वीच Volkswagen Polo 2021 चे फोटो आणि फीचर्स लीक, 22 एप्रिलला नवी कार बाजारात

फोक्सवॅगनने (Volkswagen) त्यांची लोकप्रिय हॅचबॅक कार Volkswagen Polo 2021 अपग्रेड केली आहे. ही कार उद्या लाँच केली जाणार आहे.

लाँचिंगपूर्वीच Volkswagen Polo 2021 चे फोटो आणि फीचर्स लीक, 22 एप्रिलला नवी कार बाजारात
Volkswagen Polo
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 3:36 PM

मुंबई : फोक्सवॅगनने (Volkswagen) 2017 मध्ये ऑल न्यू पोलो (All New Polo) ही कार लाँच केली होती. आता कंपनीने ही लोकप्रिय हॅचबॅक कार अपग्रेड केली आहे. फोक्सवॅगन AG ने म्हटलंय की, त्यांनी आतापर्यंत जगभरात पोलोच्या 18 मिलियन युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीने 45 वर्षांपूर्वी पहिली पोलो कार बनवली होती. दरम्यान, कंपनीने अपग्रेडेड पोलोचा जो नवीन टीझर लाँच केला आहे. त्यावरुन स्पष्ट होतंय की, नवीन फोक्सवॅगन पोलोमध्ये तुम्हाला वेगवेगळे बदल पाहायला मिळतील. (Volkswagen Polo 2021 photos and features leaked, new hatchback global launch on April 22)

फोक्सवॅगन आपली न्यू जनरेशन पोलो उद्या म्हणजेच 22 एप्रिल रोजी लाँच करणार आहे. त्यासाठी कंपनी पूर्णपणे तयार आहे. मात्र या लोकप्रिय हॅचबॅकचे कारचे काही फोटोज कार लॉन्च होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच काही फोटोज कंपनीने टीझरच्या माध्यमातून सादर केले आहेत. त्यावरुन स्पष्ट होतंय की, या कारच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले आहेत. नवं मॉडल हे सध्याच्या पोलो व्हेरिएंटपेक्षा थोडं वेगळं असणार आहे.

नवी डिझाईन थीम

या कारच्या डिझाइन थीमबद्दल बोलायचे झाल्यास, आपल्याला या कारमध्ये नवीन एलईडी स्ट्रिप मिळू शकते, जी दोन्ही हेडलाइट्सना जोडली जाईल. VW लोगो देखील इल्यूमिनिटेड होईल. त्याच वेळी, डिझाइनर्सनी एलईडी हेडलाइट्समध्येदेखील बदल केला आहे. ही कार पर्पल पेंट स्कीममध्ये सादर केली जाऊ शकते. 22 एप्रिल 2021 ला ही कार भारतासह जगभरात लाँच केली जाईल. ही कार सर्वात आधी युरोपियन बाजारांमध्ये विक्रीसाठी सादर केली जाईल.

दोन इंजिनांचा पर्याय

या कारबद्दल फारशी माहिती कंपनीने जाहीर केलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार फोक्सवॅगन कंपनी ही कार दोन इंजिन पर्यायांसह सादर करु शकते. यामध्ये पहिला पर्याय 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनाचा असेल तर दुसरा पर्याय सीएनजीचा असेल. कारच्या केबिनमध्ये काय बदल केले जातील, याबद्दल फारशी माहिती सादर करण्यात आलेली नाही. परंतु यात ग्राहकांना वायरलेस चार्जिंग, सनरूफ, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजी मिळू शकते. लाँचिंगनंतर ही कार ह्युंदाय i20 ला जोरदार टक्कर देईल. करंट जनरेशन ग्लोबल पोलोमध्ये मोठी लेगरुम मिळणार नाही.

सध्या बाजारात जी फोक्सवॅगन पोलो उपलब्ध आहे, या कारमध्ये पेट्रोल इंजिनाचा पर्याय आहे. हे पेट्रोल इंजिन 999cc चं क्षमतेचं आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. पोलो कारचं मायलेज व्हेरिएंट आणि इंधन प्रकारानुसार 16.47 ते 18.24 किमी / ली इतकं आहे. पोलो 5 सीटर कार आहे. या कारची लांबी 3971 मिमी, रुंदी 1682 मिमी आणि व्हीलबेस 2470 मिमी इतका आहे.

इतर बातम्या

Volkswagen च्या ‘या’ शानदार SUV चं भारतात कमबॅक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Tata Safari Vs Hyundai Alcazar; कोणती SUV अधिक दमदार, कोणाचे फीचर्स टॉप क्लास?

Nissan च्या ‘या’ कारला तुफान मागणी, उत्पादन वाढवण्याचा कंपनीचा निर्णय, दर महिन्याला 3500 गाड्या बनवणार

(Volkswagen Polo 2021 photos and features leaked, new hatchback global launch on April 22)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.