FAME-II सब्सिडी काय आहे? इलेक्ट्रिक वाहनं स्वस्तात खरेदीसाठी अनुदान कसं मिळवणार

अक्षय चोरगे

Updated on: Jan 30, 2022 | 12:40 PM

भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) बाजारपेठ हळूहळू वाढत आहे. परंतु, इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती आणि चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चरच्या (पायाभूत सुविधा) अभावामुळे लोकांना सध्या इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे आवडत नाही किंवा परवडत नाही.

FAME-II सब्सिडी काय आहे? इलेक्ट्रिक वाहनं स्वस्तात खरेदीसाठी अनुदान कसं मिळवणार
FAME-II subsidy सब्सिडी काय आहे?

मुंबई : भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) बाजारपेठ हळूहळू वाढत आहे. परंतु, इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती आणि चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चरच्या (पायाभूत सुविधा) अभावामुळे लोकांना सध्या इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे आवडत नाही किंवा परवडत नाही. मात्र फेम-2 (FAME-II) हे इलेक्ट्रिक वाहनांशी निगडीत नाव अनेकदा ऐकायला मिळते. ही एक प्रकारची सबसिडी आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सूट (discount on Electric Vehicle) मिळवता येते. FAME चा फुल फॉर्म Faster Adoption of Electric Vehicles in India (FAME) असा आहे आणि 2 म्हणजे दुसरी आवृत्ती. चला तर मग जाणून घेऊया FAME-II सबसिडी म्हणजे काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?

दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे आणि मोटार वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे अधिक श्रेयस्कर मानले जात आहे. लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबाबत जागरूकता आणि मागणी वाढवण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. यापैकी एक म्हणजे FAME-2 सबसिडी.

काय आहे FAME-2 सब्सिडी?

FAME-2 सबसिडी गेल्या वर्षीपासून लागू आहे आणि ती पहिल्यांदा 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. याद्वारे ग्राहकांना दिला जाणारा लाभ सुरुवातीला 10000 रुपये प्रति kWh इतका निश्चित करण्यात आला होता. परंतु जून 2021 मध्ये सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मर्यादा 15,000 रुपये प्रति kWh पर्यंत वाढवली.

इलेक्ट्रिक वाहन खरेदीचे काय फायदे आहेत?

Ather 450 Plus (Ather 450 इलेक्ट्रिक स्कूटर) ची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 1,71,520 रुपये आहे. तुम्ही Ather 450 Plus खरेदी केल्यास, भारत सरकार तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीवर 43,500 रुपयांची सूट देईल. त्यामुळे तुम्हाला या स्कूटरसाठी केवळ 1,28,020 रुपये मोजावे लागतील. इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार FAME-2 अनुदानाचा लाभ देत आहे. हे अनुदान ग्राहकांना खरेदीच्या वेळीच मिळणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या लाभांव्यतिरिक्त, विविध राज्ये इलेक्ट्रिक वाहनांवर वेगवेगळ्या ऑफर देत आहेत.

इतर बातम्या

इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये Tork बाईकची एण्ट्री, ई-बाईकमधील टॉप 4 ऑप्शन्स जाणून घ्या…

Maruti Suzuki : मारुतीची फेब्रुवारीमध्ये लॉन्च होणार ही खास कार, उत्पादन सुरू ही असतील वैशिष्ट्ये!

Toyota : टोयोटाने सादर केली दमदार नवीन SUV कार, फिचर्स पाहून थक्क व्हाल!

(What is FAME-II subsidy? How to get subsidy to purchase electric vehicle in lower price)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI