Yamaha RX 100: बाईकची आवड असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 90 च्या दशकातील लोकप्रिय बाईक होणार रिलाँच

टेक्निकल अडचणींमुळे एकदम जुने जसेच्या तसे मॉडेल आणणे शक्य नसले तरी यामाहाकडून आरएक्स 100 च्या जुन्या ओळखीला आधुनिक स्टाइलमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आरएक्स 100 च्या नवीन मॉडेलला पॉवरफूल इंजिन आणि डिझाईनसह 2026 च्या जवळपास लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Yamaha RX 100: बाईकची आवड असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 90 च्या दशकातील लोकप्रिय बाईक होणार रिलाँच
Yamaha RX 100
Image Credit source: Twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 19, 2022 | 1:11 PM

भारतात अनेक दुचाकींनी आपला काळ गाजवला आहे. राजदूत, यामाहाच्या दुचाकी त्यापैकीच एक आहेत. एक काळ होता, की या दुचाकी आपल्या दारासमोर लागणे म्हणजे स्टेटस सिंबॉल ठरत होता. रस्त्यांवर काही दुचाकींची तर अक्षरश: मक्तेदारीच होती असे म्हणावे लागेल. 1980 च्या दशकापासून भारतीय रस्त्यांवर दिसून येणारी लोकप्रिय बाइक यामाहा आरएक्स 100 लवकरच पुन्हा येण्याची चिन्हे आहेत. यामाहा मोटर इंडियाचे चेअरमन ईशिन चिहानाने (Eishin Chihana) एक न्यूज वेबसाइटशी बोलताना सांगितले, की कंपनी आरएक्स 100 चे
(Yamaha RX 100) पुनरागमनाच्या प्रयत्नात आहे. परंतु काही टेक्निकल अडचणींमुळे एकदम जुने जसेच्या तसे मॉडेल आणणे शक्य नसले तरी यामाहाकडून आरएक्स 100 च्या जुन्या ओळखीला आधुनिक स्टाइलमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आरएक्स 100 च्या नवीन मॉडेलला (New model) पॉवरफूल इंजिन आणि डिझाईनसह 2026 च्या जवळपास लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काय आहेत टेक्निकल अडचणी?

यामाहा आरएक्स 100 ची वापसी एकदम जुन्या मॉडेलसारखी नसणार आहे. याचे दोन टेक्निकल कारणे सांगण्यात येत आहेत. पहिले म्हणजे आरएक्स 100 दोन स्ट्रोक इंजिनसह उपलब्ध होते. तर दुसरे कारण म्हणजे टू-स्ट्रोक इंजिनसह कधीही बीएस 6 ला अनुकूल इंजिन तयार केले जाउ शकत नाही.

2026 पर्यंत होणार लाँच

कंपनीचे चेअरमन ईशिन चिहाना यांनी सांगितले, की यामाहाजवळ 2025 पर्यंतची लाइनअपचे मॉडेल उपलब्ध आहेत. त्यामुळे आरएक्स 100 ला 2026 च्या आधी नव्या रुपात आणणे कठीण आहे. बिजनेस लाइनशी बोलताना चिहाना यांनी सांगितले, की कंपनीने आरएक्स 100 ला पुन्हा बाजारात आणण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे.

नवीन नावाचे दिले संकेत

ईशिन चिहाना यांच्या मते, कंपनी आरएक्स 100 च्या नावाचा वापर इतक्या सहज पध्दतीने करु शकत नाही. यामुळे आरएक्स 100 ची इमेजदेखील खराब होण्याचा धोका असल्याचे ते म्हणाले. आरएक्स 100 चे न्यू मॉडेल नवीन पध्दतीने तयार केले जाणार आहे. कंपनी आरएक्स 100 ला चांगल्या पद्धतीने लाँच करणार आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें