तुमचं कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण…जाणून घ्या एका क्लिकवर खास तुमच्या स्वप्नातील कार

मार्केटमध्ये कार कंपनींनी खास तुमच्या बजेटमध्ये असलेल्या कार आणल्या आहेत. खास सीएनजी कार ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सध्या सीएनजी किमत प्रती किलो 73 रुपयापेक्षा कमी आहे. जे तुमच्या खिशासाठी बेस्ट आहे.

तुमचं कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण...जाणून घ्या एका क्लिकवर खास तुमच्या स्वप्नातील कार
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 1:46 PM

मुंबई :  तुम्हाला कार (Cars) घ्यायची आहे, तर आज आम्ही तुम्हाला कमी किंमतीत कारचे मॉडल (Cars Model) सांगणार आहोत. वाढलेल्या इंधन दरवाढीमुळे सध्या दोन चाकी असो वा चारचाकी चालवणं कठिण झालं आहे. पण प्रत्येकांचं स्वप्न असतं आपल्या दारासमोर कार असावी. आज महिलासुद्धा नोकरी करतात. त्यांनीही आपलं स्वत:ची कार असावी असं वाटतं. पण इंधन आणि कारच्या वाढलेल्या किंमती पाहता, आपलं हे स्वप्न स्वप्नच राहतं. आज हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मार्केटमध्ये कार कंपनींनी खास तुमच्या बजेटमध्ये असलेल्या कार आणल्या आहेत. खास सीएनजी (CNG) ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सध्या सीएनजी किमत प्रती किलो 73 रुपयापेक्षा कमी आहे. जे तुमच्या खिशासाठी बेस्ट आहे. चला पाहूयात तुमच्यासाठी कुठली कार बेस्ट आहे.

ह्युंदाई ग्रँड आय10 निऑस

ही ह्युंदाईची सीएनजी कार सर्वात विकली जाणारी कार आहे. या कारचे फिर्चस तुम्हाला नक्की आकर्षित करतात. या कारचं इंजिन 1.2 लीटर आहे. तर 62ps इंजिन पॉवर आणि 95nm टॉर्क जनरेट करतात. ही सीएनजी कार 20.7km मायलेज देते. या ड्रीम कारची किंमत 7 लाख 7 हजार येवढी आहे.

ह्युंदाई ऑरा

ही सुद्धा तुमच्या बजेटची सीएनजी कार आहे. ही कार BS6 मानकावर आधारित असून 5 स्पीड गिअरबॉक्ससह 1.2 लिटरचं इंजिन आहे. हे इंजिन 83ps पॉवर आणि 114 Nm टॉर्क जनरेट करतो. तर या सीएनजी कारचे मायलेज 25.4 किमी आहे. आणि ही कार तुम्हाला मिळणार आहे 7 लाख 74 रुपयात.

मारुती सुझुकी अल्टो 800

मारुती या कंपनीच्या कार या सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी अल्टोचे 6 प्रकार मार्केटमध्ये आहेत. विशेष म्हणजे या सर्व मॉडलमध्ये सीएनजी उपलब्ध आहेत. ही दिसायला छोटीशी कार असली तरी या कारमध्ये 117 लीटर बूट स्पेस आहे. जर आपण इंजिनबद्दल बोलू तर या कारचं इंजिन 0.8 लीटर आहे. तर या इंजिनचं पॉवर 48 PS आणि टॉर्क 69 Nm जनरेट करतं. तर या कारच्या बेस्ट व्हेरियंटची किंमत 3 लाख 15 हजार रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 4 लाख 82 हजार इतकी आहे. मग चला महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ही कार बूक करा.

मारुती वॅगन आर

ही मारुतीचीही बेस्ट कार आहे. या कारमध्ये 7 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंटसह Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी आहे. यात विशेष व्होल्वो स्टाइल टेललाइट्स आहेत. तर या सीएनजी कारमध्ये 1.0 लीटर इंजिन आहे. हे इंजिन 5500 rpm वर 68ps पॉवर आणि 2500 rpm वर 90Nm टॉर्क जनरेट करतं. या कारची एक्स शोरुम किंमत 5.83 लाख आणि 5.89 लाख इतकी आहे.

ह्युंदाई सँट्रो

सीएनजी ह्युंदाई सँट्रो टॉप व्हेरिएंटची कार तुम्हाला 6 लाख 38 हजारात मिळते. तर बेस्ट व्हेरिएंटची कार 4 लाख 28 हजारापर्यंत आहे. या कारचं मायलेज 30.48km प्रति किलो आहे. ही तुमच्या आमच्या सर्वांच्या बजेटमध्ये बसणारी बेस्ट कार आहे.

संबंधित बातम्या :

Mahindra ट्रॅक्टरची चक्क Thar बनवून टाकली! आनंद महिंद्राना चकित करणारा तो ‘इंजिनियर’ कोण?

इंडियन मोटरसायकलने सादर केली त्यांची जबरदस्त अशी मोटरसायकल, जाणून घ्या त्यामध्ये काय काय असेल खास

महिंद्रा ते टाटा, ‘या’ आहेत देशातल्या 5 सर्वात सुरक्षित कार!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.